सत्याग्राही संग्रामात!
सत्याग्राही संग्रामात!
सत्याग्रही संग्रामात
ध्वज विजयाचा उंच धरा रे
अजिंक्य भारत अजिंक्य जनता
ललकारत सारे --- धृ
इतिहासाच्या पानोपानी
शूर वीरांसवे लढली ही स्त्री
नारीशक्तीचा मोठा विजय
आपण सारे स्फूर्ती घेऊ या रे ---- १
धाडसी राणी, लक्ष्मीबाई
करुनी घोषणास्वातंत्र्याची
फुंकले रणशिंग हे
झाशीत फिरंग्या विरोधी रे ----२
सुरू जाहली होमरूल चळवळ
टिळकांसोबत अनी बेझंट
नवचैतन्याचा जोम उसळला
झंझावती दौर्याने ह्या रे ----३
सत्याग्रही संग्रामात
स्त्रियाच होत्या आघाडीवर
अवंतिका ,कमलादेवी
हंसाबेन,लीलावती रे----४
मनोबल हे खास असे हे
नारी शक्तीने दिले दावूनी
बहुसंख्य ह्या नारीच दिसती
प्रभात फेरीतूनी-------५
कस्तुरबाची नाही माघार
गांधीजींचा मोठा आधार
बहिष्कार जाहला
परदेशी मालावर रे ----६
बंदिवान ह्या कित्येक ललना
अत्याचारास ना डरल्या
धैर्याचा, सहनशक्तीचा
हा दाखला ललनांचा रे ----- ७
परदेशात झळकला झेंडा
स्वातंत्र्याचा खरा सोहळा
नारीरत्न हे मादाम कामा
भारतात ह्या ना रत्नांची वानवा---- ८
वृद्ध माता क्षीरोदवासिनी
शंचींद्र ह्या वीरपुत्राची
काकोरी खटात झाली फाशी
तरीही ना रडली रे----९
होडीङ्ग्जच्या खून खटल्यात
झाली फाशी बालमुकुंदास
देह सोडला पतीसवे लजवंती साध्वीने---१०
मृणालिनी अरविंदांची
पतीविरहात झुरली तरीही
साथ सोडली नाही त्यांची
बनली प्रेरणा भूमी लढ्याची रे--११
(चाल- ध्वज विजयाचा उंच धरा रे)