सखी माझी
सखी माझी
आज काय कविता करावी म्हणून मी शोधत बसलो शब्द,
स्वप्नात शेजारी येऊन सखी माझ्या बसली होती स्तब्ध,
तिले पाहून मनाले पडली थोडी भूल,
तिचा तो हसरा चेहरा, नजर कातील पाहून झालो ना मी गुल
डोळ्यावर होती बट तिच्या डोळे
काळे-काळे,
गाल तिचे लाल-लाल भलतीच येल पाडे
घालून आली नऊवारी साडी, नाकात नथनी कानात झुमक्याची वडी,
आवाजात तिच्या होती आज लयच गोडी
रंग तिचा गोरा गोरा दिसे लय भारी,
मनात आलं हिला घेऊन जाऊ आता पंढरीची वारी,
तिले बघून मन माझं दूध ऊतू आलं कसं,
ती म्हणे तू बघितलं का रे आधी मले असं,
म्या म्हतलं तिले कुठी निघाली नटून, थटून ती म्हणे दुकानावर जात होती इथून,
मले बोलली दुकानावर पोहे आन्याले जाय,
तिले विचारलं आज स्पेशल काय,
ती बोलली आज मले पाहुणे पायाले येणार हाय,
पुरता पोपट झाला राव....

