STORYMIRROR

meena Rajput

Romance

3  

meena Rajput

Romance

साथ तुझी

साथ तुझी

1 min
558

तुझी माझी प्रीत

लग्न बंधनात अडकली

क्षण आनंदाचा आला

रेशीमगाठ जुळली


सहवास तुझा लाभला

आयुष्य माझे मोहरले

सुखी संसाराचे आपले

स्वप्न पूर्ण झाले


संकटे अनेक जीवनातली

तुझ्या साथीने पेलली

 सदैव तुझी सोबत

 कठीण समयी लाभली


साथ राहो तुझी

जीवनाच्या अंतापर्यंत

जन्म जन्मांतरीची जोडी

 राहू दे सात जन्मापर्यंत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance