हर्ष बळीराजाचा
हर्ष बळीराजाचा
1 min
251
मेघ दाटले आकाशात
नयनात आनंदाश्रू साठले
खूप केली प्रतिक्षा
बळीराजाचे मन सुखावले
अनुभवला मृदगंध पावसाचा
धरतीच्या पहिल्या सुगंधाचा
मयुराच्या नृत्य कलेचा
साक्षात्कार सृष्टीच्या सौंदर्याचा
राने झाली हिरवीगार
ओढे नाले तुडुंब भरले
जलधारांच्या भेटीने
धरणीमातेचे अंग शहारले
फुलांनी सर्वत्र घातले
विविध रंगांचे सडे
आकाशी इंद्रधनू उमटले
जणू नभाचे सप्तरंगी कडे
शिवार भरले मोत्याच्या दाण्याने
घास दिला धरणी मातेने
बळीराजा नतमस्तक जाहला
आशीर्वाद दिला काळ्या आईने
