प्रेमाची आठवण
प्रेमाची आठवण
प्रेमाचे हळूवार स्वर ओठांवर रेंगाळत होते
कधी वाऱ्यावर उडत होते तर
कधी पाण्यावर तरंगत होते
काय झाले होते कुणास ठाऊक पण
त्या आठवणीत मन मात्र रमत चालले होते
का तिची सारखी आठवण मला येत होती
कधी स्वप्नात भेट देत होती तर
कधी काळजातुन आवाज देत होती
काय झाले होते कुणास ठाऊक पण
तिच्या आठवणीनं ती रात्र गुलाबी झाली होती
मनी तिच्या भेटीची ओढ का लागली होती
कधी समोर गाली हसत होती तर
कधी ईशाऱ्यानी खुणवत होती
काय झाले होते कुणास ठाऊक पण
ती आठवण एक प्रेमाची आठवण झाली होती

