STORYMIRROR

Swapnil Sarde

Romance

4  

Swapnil Sarde

Romance

प्रेम

प्रेम

1 min
398

कधी कधी उदास वाटत

   वाटत कधी संगतीन फिरावं,

कोणीतरी प्रेयसी म्हणून

   माझ्या संगतीला यावं ।।


तिने गप्पा गोष्टी करत

   माझ्या मनामध्ये बसावं,

अन मोराच्या पिसार्यासारखं

   हास्य तीच फुलाव ।।


वाटेवर माझ्या जीवनाच्या

   तुझी सावलीच चढाव,

सैराट होऊन दोघांनी

 नवरंगी फुलपाखरासम उडाव ।।


तिचे दुःख मी वाटून घेईल

  माझेही दुःख तिने वाटावं,

येणारे कोणतेही संकट

  एकत्र येऊन पेलावं ।।


तिच्या स्वप्नी मी दिसेल

   माझ्याही स्वप्नी तिने यावं,

दोघांनाही पंख फुटून

     जग सार बघाव ।।


श्रावणात रिमझिम पावसामध्ये

  सुखाच्या क्षणांचे थेंब झेलाव,

थेंबा-थेंबाची तळे साचून

   प्रेमाच्या सागरात पोहाव ।।


सप्तरंगी इंद्रधनुष्यावर

   जाऊन दोघांनी बसावं,

हिरवी मखमल चादरेसम

   मंद निसर्गात शिराव ।।


मरता क्षणी सुद्धा दोघांनी

  सजवलेल्या शिडीवर शांत मंद झोपावं,

सदा सात जन्मी आम्हीच दोघे

  प्रेयसी प्रियकर व्हावं ।।


Rate this content
Log in

More marathi poem from Swapnil Sarde

Similar marathi poem from Romance