पहिल्या नजरेतील प्रेम
पहिल्या नजरेतील प्रेम
सवय तुझी झाली इतकी,
दिवस माझा सरत नाही,
तुझा चेहेरा पहिल्या शिवाय,
शांत मला राहवत नाही.
गोंडस मऊ चेहेरा तुझा,
दिवस भर पाहत राहीन,
पानिदार सुंदर डोळे तुझे,
मन भिजेतोेवर त्याना पाहत राहीन.
रागीट-प्रेमळ स्वभाव तुझा,
आंबट-गोड लोणचेे जणू ,
आपल्या पुढील सुखं साठी,
पाया आपण मजबूत खानु.
पडलेला चेहेरा तुझा पाहून,
मन माझे अस्थिर होते,
प्रेमळ दोन हृदयाचे,
आपले हे प्रीतीचे नाते.
सुगंध तुझा प्रेमाचा,
विसरवतो मला सर्व काही,
तू समोर येताच माझा,
मला तुझा शिवाय दुसरे काही दिसत नाही.
पडव्याचा सना सारखा,
करू सगळे सन आपण साजरा,
प्रत्येक सणाला माझा अंतरा साठी,
घेऊन येईन मी मोगऱ्याचा गजरा.
देवा कडे मागणी करतो,
आपली जोडी अशीच कायम ठेव,
तुझा शिवाय मी जणू,
शेव-पुरी without शेव,
पोट भरलेले असले तरी,
तुझा हातचा दोन पोळ्या जास्त खाईन,
आणि तू जेवली नाहीस हे समजता मला,
मी देखील तसाच उपाशी राहीन.
तुझा हातांमध्ये,
प्रेमाची उब जशी मला जाणवते,
तुझा हात धरलेला सोडताना,
हा हात मी कसा सोडू
या विचाराने माझे डोळे पाणवते.
विचार दोघांचा,
हुबेहु जुळतोे,
इतका करतो आपण विचार सारखा,
दोघे एकत्र एकाच वाक्य बोलतो.
तुझा माझा बादल बोलू तितका कमी आहे,
तुझा शिवाय मी आंधळा,
आणि माझा शिवाय तू अपुरी,
अशी आपली गत आहे.
शब्द प्रेमाचे मांडता मांडता,
तुझा आठवणीत मी हरवून जातो,
माझांतल्या तुला शोधण्यासाठी,
आरसा समोर मे उभा राहतो.
तुझा उत्तरा साठी,
मी अता वाट पाहतो,
तू पण माझा साठी
दोन ओळी लिहिशील,
याच धुंदीत मे कायम राहतो,
विश्वास आहे तुझावर,
तू नक्की लिहिशील मला,
प्रेमात दोन ओळी लिहून तर बघ,
सगळं जग त्या दोन ओळीत दिसेल तुला.
शब्दांची ही महिफिलीला
इथेच मी रोकतो,
वर लिहिलेल्या प्रत्येक शब्दात,
फक्त आणि फक्त
तुलाच मी बघतो,
तुलाच मी बघतो...

