STORYMIRROR

Sudarshan Suryatal

Romance

4  

Sudarshan Suryatal

Romance

भेट

भेट

1 min
562

अशीच एकदा रस्त्यामध्ये तिची माझी भेट झाली,

पाहून तिने माझ्याकडे मुद्दाम पाहिले खाली.

ओळखीचे हास्य घेउन मीच नजर भिरकावली,

थोडी तिने पाठ फिरवून मान बाजूला गिरकावली. 


याचेच थोडे दुःख वाटले,

छातीमध्ये आभाळ फाटले,

डोळ्यामध्ये आसवांचे पाणावलेले मेघ दाटले.


अनोळख्या ह्या आरश्या आड ओळखीचे चेहरे मित्रा,

आयुष्याच्या शर्यतीतून थकून गेले शौर्य मित्रा.


खूप दिवसांनंतर पुन्हा एकदा तिची माझी भेट झाली,

हि अवस्था पाहून माझी थोडी जवळ आली.

डोक्यावरती पदोर होता , डोळ्यामध्ये टचकन पाणी,

दातांमध्ये ओठ दाबूनि बोलत होती रडकी वाणी.


विसरून जा आज सख्या तू नाद माझा सोड म्हणाली,

आयुष्याच्या सुखासाठी नातं कुठं जोड म्हणाली.

आवाजात आपुलकी आणि शब्दामध्ये जिव्हाळा,

परिस्थितीची खंत आणि आसवांचा पाणोळा.


मलाही आता कळले होते माझ्यावरती मरायची,

रात रात माझ्यासाठी कधी कधी झुरयाची.


सांग म्हणाली आज तू जेवण तरी केलस का?

मी म्हणालो,

आग तू गेलीस तेंव्हापासून रोज थोडं जगतोय मी,

तू गेली तेंव्हा पासून स्वतःलाच तर खातोय मी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance