पहिला पाऊस
पहिला पाऊस
गार गार थंड वारा माळरानावर पसरला
त्याच्या हातात असलेला तिचा हात शहारला
पावसाचे दोन टपोरे थेंब तिच्या गालावरून ओघळले
आणि इतका वेळ सावरलेले त्याचे मन विरघळले
नवीन होते दोघे अगदी एकमेकासाठी
काल-परवाच तर जुळल्या होत्या त्यांच्या रेशीम गाठी
घरच्यांच्या पसंतीने लग्न होउन गेले
इतक्या गडबडीत मात्र तिच्याकडे बघायचे राहून गेले
ती जाम खुश होती अस्सा पाउस येण्यावर
तोही मनापासून भुलला होता तिच्या गोड हसण्यावर
पाउस असा एन्जॉय करणे त्याला कधीच माहित नव्हते
पावसात चिंब भिजणे, त्याच्या हिशोबच्या वहीत नव्हते
तरीसुद्धा तिच्यासाठी तो पावसात भिजला होता
प्रेमाचा एक नितळ थेंब त्याच्या मनात रुजला होता
आता तिथे हिशोब नव्हता, फ़क्त होती भिजण्याची हौस
आयुष्यच बदलले होते त्याचे अनुभवताना पहिला पाउस