पाऊस आणि ती
पाऊस आणि ती
तो पाऊस, तो गारवा
अंगावर झोंबणारी हवा
तिचा तो स्पर्श नवा
कायमचा हवा हवा
पहिल्या पावसात
बुलेट वर स्वार वारी
मागे ती बसलेली
घट्ट मिठी खरीखुरी
पहिला पाऊस
उत्साहाला पूर
सरीवर सरी अन
मनात उठे काहूर
पावसाची संध्याकाळ
कारमध्ये दोघे छान
रफी ची गाणी अन
खांद्यावर तिची मान
धो धो पावसात ती
चिंब चिंब भिजलेली
पाहता पाहता तिला
उर्मी आतून दाटलेली
येता पाऊस पाऊस
विचारांचे उठे रान
सांगा तिला कोणी तरी
उरले नाही आता भान
..सुरू..

