मृद्गंध पावसाचा
मृद्गंध पावसाचा
ओल्या मातीचा
स्वर्गीय सुगंध
मोहवी मृद्गंध
असे प्रीतीचा
तृषार्त धरा
पावसात न्हाली
चिंब चिंब झाली
शोभे सुंदरा
कण मातीचा
भिजूनिया गेला
चिंब झाला शेला
तो अवनीचा
झाला गंधित
परिसर सारा
मंद मंद वारा
मन हर्षित
मृद्गंध कसा
वेड लावी मना
भिजू या सजना
झेलू पावसा