मधुसिंधू काव्य - प्रभात
मधुसिंधू काव्य - प्रभात
1 min
598
प्रभातकाळी
फुले उमलली
सृष्टी गंधाळली
ईश्वर माळी........१
पूर्व दिशेला
रवि उगवला
दिवस जाहला
हर्ष धरेला...........२
निशा सरली
काळोख लोपला
प्रकाश पडला
सृष्टी जागली........३
पक्षी जागले
कुंजन करती
नभी विहरती
गाऊ लागले..........४
रोज नव्याने
दिस उगवतो
तम पळवतो
नव तेजाने..........५
सूर्य नभीचा
जीवना आधार
सृजन साकार
मित्र पृथ्वीचा.........६
