STORYMIRROR

Ujawla Devi

Classics Others

4  

Ujawla Devi

Classics Others

मृदगंध पावसाचा

मृदगंध पावसाचा

1 min
209

श्रावण मास घेऊन येतो

आकाशात ढग घनघोर,

 वारा येई‌ घेऊन वेचून

थेंब टपोरे धरणीवर !


श्रावणाची रिमझिम सर

क्षणात मोसम मस्त होतो,

येतो मृद्गंध पावसाचा

श्वासाश्वासात भरून जातो !


अवचित इंद्रधनूतुनी

कधी‌ बिजलीचा बाण सुटे,

जशी बावरली वेडी राधा

माझा कान्हा हरवला कुठे !


हिरवळीची नेसून साडी

जशी नवरी सृष्टी सजते,

पक्षी किलबिल वृक्षावरी

आनंदाची लहर उठते !


खळखळ वाहणार्या नद्या

दिसती आवखळ तरूणी,

मनाला मोहवित जाते

पर्वतरांगा मधून झरणी !


प्रत्येक अंगणात अनेक

रंगीबेरंगी फुले फुलती,

उत्साह भरून जातो नवा

छोटी फुलपाखरे झुलती !


मोर नाचतो अती आनंदे

कुहूकुहू करतो कोकीळ,

कृष्णाच्या अधरी मुरलीचे

सूर येती कितीरे मंजुळ!


निसर्गाचा अनमोल ठेवा

रंग प्रेमाचे सांगतो थेट,

आनंद द्या आनंद मिळेल

जीवनी होते सृष्टीची भेट !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics