प्राणवायू
प्राणवायू
1 min
151
ईश्वराने जीवन दिले
जन्मापासून घेतो श्वास,
फुकटच्या त्या श्वासांची म्हणून
किंमत आम्हा कळली रे
बंगला गाडी खूप कमाई
श्रीमंतीची झाली घाई,
वृक्ष तोडूनी शहरे वसली
आज चूकती नडली रे!
लाख रुपये मोजून जेंव्हा
प्राणवायू मिळत नाही,
आता वृक्षसंवर्धनाकडे
बुध्दी आमची वळली रे !
ज्या नात्यांनी प्रेम दिले
श्वासावाचून ती कळवळली,
नातलग ते सोडून जाता
घमेंड आमची जळली रे !
उशीरा का होईना देवा
जाग आली मानवाला
क्षमा कर लेकरांना
कोरोनाला पळवी रे!!
