STORYMIRROR

sbhash Manwatkar. निळं पाखरु

Romance Classics

4  

sbhash Manwatkar. निळं पाखरु

Romance Classics

*मला ठाव नाही*

*मला ठाव नाही*

1 min
439

किती वार केले, तरी घाव नाही

वरावे मला तू, मुळी हाव नाही


कुठे सांग झाली, कशी हार माझी

मला जिंकले तू, असा डाव नाही


कसा सांग घेऊ, तुझा पक्ष मी ही

घसरला अजूनी, तुझा भाव नाही


लपविलेस का तू, खरे नाव पत्ता

उरी कोरले तू, खरे नाव नाही


कुठे सांग शोधू, सुखाचा ठिकाणा

मला ओळखीचे, असे गाव नाही


मळे राखले मी, तुझ्या संगतीने

पुढे काय झाले, मला ठाव नाही


सुभाष मानवटकर (निळं पाखरु)

हिंगणा नागपूर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from sbhash Manwatkar. निळं पाखरु

Similar marathi poem from Romance