STORYMIRROR

Rama Khatavkar

Romance

3  

Rama Khatavkar

Romance

कविताच होते...

कविताच होते...

1 min
288

आज कसं आलं पहा दाटून हे धुकं,

आकाशात सूर्य नाही, सारं ओकंबोकं.

पहाटेची वेळ, आणि थंड थंड हवा,

अलवार धुक्याचा हा स्पर्श नवा नवा.


अलगद धुक्यातून कुणीतरी येते,

मंद मंद हसूनिया हात हाती घेते.

गुलाबी या गारव्यात शिरशिरी उठते,

आणि काय? काही नाही! कविताच होते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance