करू नको तू परका मजसी
करू नको तू परका मजसी
मनाने मी हा झालो तुझा
विचार असतो मनात तुझा ।
बंध म्हणू की ऋणानुबंध
आस मनाची आभास तुझा ।
चाले निरंतर एकच ध्यास
सांगते स्वप्नही निरोप तुझा ।
हसली रुसली मनात बसली
जगतो आठवत श्वासही तुझा ।
करू नको तू परका मजसी
हवा मजला सहवास तुझा ।

