काय सांगू तुला...
काय सांगू तुला...
काय सांगू तुला हाल माझ्या हृदयाचे
वाटेकडे डोळे तुझ्या नेहमीच लागायचे
न असता तू काहूर मनी दाटायचे
अन दिसता तू शब्दच सारे विरायचे
काय सांगू तुला हाल माझ्या हृदयाचे...
दिवस रात्र सतत डोळ्यात
तुझीच छबी साठवतो
अन सोबत तू नसताना
तिलाच सोबत वागवतो
काय सांगू तुला हाल माझ्या हृदयाचे...
कोर्या कोर्या कागदावरती
भावना मनीच्या लिहीत जातो
काळजाच्या प्रत्येक ठोक्यांवरती
नाव तुझेच कोरत जातो
काय सांगू तुला हाल माझ्या हृदयाचे...

