एक रोपटे लाव
एक रोपटे लाव
कळतो मजला ग
तुझ्या मनाचा ठाव ।
वाटे मलाही का
तुझीच अशी हाव ।
मनही घेते माझे
तुझ्याकडेच धाव ।
कोरले अंतरात आता
तुझेच मी नाव ।
देऊस नको ना तू
हृदयावर माझ्या घाव ।
अंतरात माझ्या तूच
एक रोपटे लाव ।

