Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

marathi bhupali

Classics

2  

marathi bhupali

Classics

दशावतारांची भूपाळी

दशावतारांची भूपाळी

1 min
7.5K


जन म्हणा हो श्रीहरि । प्रातःकाळी स्मरण करी ।

तेणे तराल भवसागरी । हा निर्धार भंरवसा ॥ ध्रु ॥


वेद नेले निशाचरी । मत्स्यरुप झाले हरी ।

कार्य ब्रह्मयाचे करी । शंखासुर वधोनिया ॥ १ ॥


दैत्य मातले भूमंडळी । पृथ्वी नेली रसातळी ।

कूर्मरुपी हो वनमाळी । पृष्ठी धरिली मेदिनी ॥ २ ॥


मही डळमळी पहा हो । देव झाले वराह हो ।

मग वधियेले दैत्य दानवो । पृथ्वी दाढे धरोनिया ॥ ३ ॥


पुत्र पित्याने गांजिला । तो हा नरहरि स्मरता झाला ।

स्तंभी अवतार धरियेला । भक्त रक्षिला प्रह्‌लादा ॥ ४ ॥


याग करिता झाला बळी । इंद्र कांपिन्नला चळचळी ।

वामनरुपी हो वनमाळी । धाली पाताळी बळीराजा ॥ ५ ॥


रेणुके उदरी भार्गव झाले । राजे समस्त संहारिले ।

राज्य ब्राह्मणा दीधले । सुखी केले भूदेव ॥ ६ ॥


सूर्यवंशी रघुनंदन । वानर सैन्य मिळवून ।

सागर पाषाणी बांधून । संहारिले राक्षसा ॥ ७ ॥


कारागृही अवतरले । श्रीकृष्ण गोकुळी वाढिन्नले ।

कंसचाणूर मर्दिले । राज्य स्थापिले उग्रसेना ॥ ८ ॥


बौद्ध अवतार धरियेला । जन हा बहुत कष्टी झाला ।

मग कलीस वरा दीधला । आपण राहिले निद्रिस्थ ॥ ९ ॥


पुढे कलंकी होणार । ऐसा शास्त्राचा निर्धार ।

मग फिरेल भवसंदेह । या हो विश्वजनाचा ॥ १० ॥


दशावतारांची भूपाळी नित्यस्मरा प्रातःकाळी ।

दास म्हणे हो भूमंडळी भाग्यवंत होतील ॥ ११ ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics