देव
देव
तू असतो प्रत्येकात मग दिसत का नाही?
मलाच हा प्रश्न पडतो कि प्रत्येकाला पडतो,
ही द्विधा मनस्थिती घेऊन कुठे जाऊ, कधी भेटशील का मला? कधी दिसशील का मला? मी सारे तुला सांगतो. तू आहेस मला असे नेहमी वाटते पण खरेच दिसशील का मला? मी केलेल्या चांगल्या कार्यात असशील ना? त्या संता सारखे मला दर्शन देशील का? देवा कधी भेटशील मला.? मी मूर्ख मनुष्य तुला कुठे कुठे शोधू? कधी माझ्या प्रश्नांची उत्तर मिळेल का मला?...
