भरून
भरून
माझा अहंकार प्रेमात जळाला
मेलेल्या आत्म्याला जीव मिळाला
तुझ्या प्रेमात बसलो आहे सारं हरून....
जीवनाची नाव अडकली प्रेमात
अशीच माझी साथ दे राणी जोमात
तुझ्या प्रेमात मन आलं आहे भरून.....
माझ्या जीवनाचे मोल होते सस्ते
दाखवले तू प्रेमाच्या आशेचे रस्ते
माझं दुःख तू टाकलं आहे मागे सारून.....

