STORYMIRROR

Janmala Kulkarni

Classics Others

3  

Janmala Kulkarni

Classics Others

बाई ग तू अशी कशी?

बाई ग तू अशी कशी?

1 min
201

बाई ग तू अशी 

बाई ग तू तशी 


किती राबलीस तरी

तुझ्याविषयी तक्रारच कशी ??


बाई ग तू अशी 

बाई ग तू तशी 


आला पाहुणा गेला पाहुणा 

अतिथ्य करुन दमतेस ना जराशी ??


बाई ग तू अशी 

बाई ग तू तशी


कुणाला काय हवं काय नको 

लक्षात तरी तू ठेवतेस कशी ??


बाई ग तू अशी 

बाई ग तू तशी 


रूढी आणि परंपरा 

जपतेस अगदी जशीच्या तशी 

तरीसुद्धा 


बाई ग तू अशी 

बाई ग तू तशी 


स्वतः साठी जग जरा 

स्वप्न घेऊन उराशी !!


बघ जरा डोकावून अंतर्मनात

आणि जग कधी तरी हवी तशी!!


किती चौकटीत राहिलीस तरी 

जग म्हणेल 

बाई ग तू अशी कशी??

बाई ग तू अशी कशी??


Rate this content
Log in

More marathi poem from Janmala Kulkarni

Similar marathi poem from Classics