अश्रु
अश्रु
कधी आनंदच्या क्षणांत
तर कधी इवल्याशा ऋदयात दडलेल्या भरमसाठ दुःखात
कधीकाळी चुकूनच झालेल्या चुकीमधे तर कधी
मुद्दामुन मोहात मात्र बुद्धी हरवुन बसल्यावर जेव्हा तू स्वत:ला एकटं पाहते
कधी त्या प्रसंगांमध्ये जे नकळतच अस्तिवात येतात
तर कधी उघळ्या डोळ्यांनी पाहलेली स्वप्ने प्रत्यक्षात समोर पाहिल्यावर
आनंदानी मन भरून मन तुझे येते
किती प्रामणिक पणाने निभवतात नं हे
एक वेळ केलेली त्याची निस्वार्थ मित्रता
कितीही चुका करो तू
कधी साथ सोडण्याच्या भितीला चेह-यावर उमलू देत नाही तुझ्या
दोन अक्षरांनी जरी त्यांची व्याख्या पुर्ण होत असेल
तरीसुद्धा जिवनभर तुझ्या सहवासात राहण्याची ग्वाही तुला देत
तुझ्या सोबतच ते जन्माला येतात
तुझ्या सोबतच सर्व तुझा जिवनकाळ बघतात
दुःखात तुला सात्वना तर सुखात तुला अभिनंदन करत
तुझे म्हणुन हेच अश्रू तुला पूर्ण करण्यात नेहमी यशस्वी ठरतात........!!!
