STORYMIRROR

bhondla bhondla

Classics

0  

bhondla bhondla

Classics

ऐलमा पैलमा

ऐलमा पैलमा

1 min
630


ऐलमा पैलमा गणेश देवा,

माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा


माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी,

पारवं घुमतय पारावरी


गोदावरी काठच्या उमाजी नायका,

आमच्या गावच्या भुलोजी बायका


एविनी गा तेविनी गा


आमच्या आया तुमच्या आया,

खातील काय दुधोंडे

दुधोंडयाची लागली टाळी ,आयुष्य दे रे भामाळी


माळी गेला शेता भाता,

पाऊस पडला येता जाता

पड पड पावसा थेंबोथेंबी,

थेंबोथेंबी आडव्या लोंबी,

आडव्या लोंबती अंगणा

अंगणा तुझी सात वर्षे,

भोंडल्या तुझी सोळा वर्षे


अतुल्या मतुल्या चरणी चातुल्या,

चरणी चारचोडे, हातपाय खणखणीत गोडे

एकेक गोडा विसाविसाचा,

साड्या डांगर नेसायच्या

नेसा गं नेसा बाहुल्यांनो, अडीच वर्षे पावल्यांनो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics