STORYMIRROR

Ankita Writer

Romance

3  

Ankita Writer

Romance

आठवणीतील ती...!

आठवणीतील ती...!

1 min
270

हो पान तर एकच होतं

शब्द मात्र अनेक होते

साठवणीतील आठवणी

अनंत होत्या


       शब्दांमागच्या भावना

        निर्मळ होत्या

        पण त्या तिला

        कुठं कळल्या


आठवणींचे ओझे घेऊन

फिरतो आहे आता

तिला कधी कळेल का

जीवघेणे जगणे काय असते


        नाही कळणार कधी तिला

        अन् नाही कळवणार मी तिला

        तुझ्या प्रेमात सखे

        झालो होतो वेडा


हळूहळू सावरतो आहे

दिल्या शब्दाला जागतो आहे

परत कधी येतील हे दिवस

माहीत नाही


पण,


        सुखाच्या आनंदाच्या वेळी

        तूच नक्की आठवशील गं

        नाही विसरू शकणार

        मी तुला...!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance