आठवण
आठवण
कशी करू सखे तुझी
मनामध्ये साठवण
पावसाच्या सरीसंगे
येते तुझी आठवण
भिजल्या गं रानवाटा
धरा चिंब चिंब झाली
तुझ्या आठवांची सर
मन ओलावून गेली
पाऊस तुझ्या आवडीचा
तसा माझ्या आवडीचा
आनंद वेगळाच होता
तुझ्यासंगे भिजण्याचा
आज तुझी माझी वाट
जरी झाली न्यारी न्यारी
नाव तुझेच कोरले
माझ्या मनाच्या गाभारी
थेंब थेंब पडायचा
तुझ्या माझ्या अंगावर
तेव्हा यायचा गं सखे
आपल्या प्रीतीला बहर
आज पावसाची सर
जवा पाहतो नयनी
तुझी प्रतिमा पाहतो
पडणाऱ्या थेंबातूनी
पडणाऱ्या थेंबातुनी

