आई
आई
एखाद्या पदचारी प्रवासीला सावली भेटली तर ........
एखादया तहान लागणाराला पाणी भेटलं तर ....
जर ह्या आनंदाची कुठंच तुलना नाही
तर आई तुझ्या शिवाय जगात कुठंच सुख नाही .
तुझे अस्तित्व विसरून गेलीस, मला मोठं करण्यात,
पंख दिले माझ्या स्वप्नाला, मदत केलीस उडण्यात,
शोधत राहिले तुझ्या आकांशा, पण कधीच सापडले नाही,
आई तुझ्या शिवाय जगात कुठंच सुख नाही .
मन माझे वाचून घेतेस, तू आजही
कुशीत तुझ्या आनंद येतो, मला आजही,
तुझे केलेले सर्व बलिदान, कधीच फेडू शकणार नाही
आई तुझ्या शिवाय जगात कुठंच सुख नाही.