स्वप्न
स्वप्न
आपल्या पैकी प्रत्येक जणच स्वप्न बघत असतो आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठीच जगत असतो.
स्वप्न, मग ते काहीही असो, एक छानसा टुमदार बंगला आणि अंगणातुन दिसणारा निळाशार समुद्र, नारळी पोफळी, आंब्या ने सजलेली आणि वेगवेगळ्या रंग बिरंगी फुलांनी नटलेली बाग, वाऱ्याच्या वेगा शी स्पर्धा करणारी महागडी कार, प्रत्येक महीन्याला पुरेशी रक्कम खात्याला जमा व्हायलाच हवी अशी आर्थिक सुबत्ता आणि सुरक्षितता, युरोप-अमेरिका दर्शनवारी, नाहीच जमले तर किमान आयुष्यात एकदा सिंगापुर – मलेशिया तरी अनुभवण्याची अनामिक ओढ. अवतीभवती अशा अनेक यशस्वी व्यक्ती असतात की विनासायास यशाच्या शिड्या सर करुन नव नव्या उंची गाठतात. झपाटल्यासारखं काम करतात, स्वप्न जगतात आणि सत्यात आ्णतात. यशस्वी माणसं जिद्दी असतात, कल्पनेच्या आकाशात, स्वप्नाचे पंख लावुन उ्त्तुंग भराऱ्या मारत बिनधास्त संचार करतात. जग हसेल, नाव ठेवेल, असे मानुन ते उड्डाण थांबवत नाहीत. झोपेत (आणि जाग्रत अवस्थेतही) ते स्वप्न पाहतात, कल्पनांतच रमतात, आवडत्या गोष्टी मनात घोळवतात, प्रचंड परीश्रम करतात, इतके करतात की शेवटी नियती हार मानते आणि त्यांच्या जिद्दीला कंटाळुन त्यांच्या स्वप्नाला सत्य बनवते….
यशस्वी होण्यासाठी तीन सोप्या पायर्या असल्याचं मानतात. इच्छा – ज्या मरण्याच्या आधी पुर्ण व्हायलाच हव्या, भरवसा ठेवा कि – तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर खऱ्या होणार आहेत, सर्व इच्छा मनासारख्या घडतीलच, पण लागलाच थोडा वेळ तर उतावीळ व्हायचं नाही….
स्वप्न साध्य करण्यासाठी, अजून एक गोष्ट करणे गरजे चे आहे ती म्हणजे आभार प्रदर्शन – रोज रात्री झोपण्याआधी, दिवसभरात घडलेल्या चांगल्या घटनांची उजळणी करायची आणि त्याबद्दल मना पासुन देवाचे, आई वडिलांचे, गुरुंचे आभार मानायचे ………
आयुष्य म्हणजे योग्य ती निवड करणे. दुखी राहायचे कि आनंदी राहायचे, आपल्या ला हवे आहे त्या साठी लढायचे कि जे मिळालेय त्यात समाधान मानायचे, आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थितीला हसत मुखाने समोर जायचे कि, पाठ फिरवायची, चिंता करत पूर्ण आयुष्य घालावयाचे की चिंतन करायचं, परिस्थितीला दोष देऊन रडत बसायचं? का मनस्थिती प्रसन्न ठेवुन हसतं खेळत राहायचं…. निवड करणं आपल्या हातात असत. आणि योग्य ती निवड करून आपल्या आयुष्यात यशस्वी झालेल्या बऱ्याच वक्ती आपण रोज बघतो. सगळ्या अडचणी वर मात करून यशाच्या पायऱ्या चढताना दिसतात..आपल्या वाटत तितके अश्या लोकांचे आयुष्य सुखकर नसते...अनेक अडी अडचणींना तोंड देत खंबीर पणे ते यशाची वाटचाल करतात.
आज मी अश्याच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी तुमची ओळख करून देणार आहे, ती व्यक्ती म्हणजे शेफ अभी.
लहानग्या अभी ने पण एक स्वप्न बघितले होते खूप लहानपणी...एक जगप्रसिद्ध शेफ बनायचे. असा म्हणतात कि, जगात अनेक प्रकार च्या भुका असतात, कोणाला पैश्याची भुक असते, कोणाला जमनीची भुक असते, कोणाला डाग दागिन्यांची भुक असते, कोणाला मान सन्मान मिळवण्याची भुक, ह्या टाळी एकही भुक कधी च भागात नाही, पण एकच भुक अशी आहे अन्नाची भुक अशी आहे कि माणूस पोट भरल्यावर तृप्त होउन म्हणतो पुरे आता पुरे ... अभी ची आई म्हणायची हे खूपच पुण्याचं काम आहे...असे हे पुण्याचं काम करायची जिद्ध आणि स्वप्न उराशी बाळगून होता अभी लहानपणापासून!!.....
एक मध्यम वर्गीय कुटंबात त्याचा जन्म झाला, त्याच्या पाठीवर अजून दोन भावंडे. वडिलांची कमाई अगदी मोजकीच.
त्या मुळे तशी बेताचीच परिस्थिती होती. ... अश्या परिस्थिती तीन मुलांना वाढायचे म्हणजे तारे वरची कसरत! पण ती माउली हे काम हसत मुखाने पार पाडत होती. बहुतेक शेफ अभी आपल्या आई वर गेले असावेत त्यामुळे च प्रतिकूल परिस्थिती पण कसे हसतमुख राहायचे ते त्यांना बरोबर जमते. …पण असे असून सुद्धा .. सुखा समाधानाने आयुष्य जगत होते ते कुटुंब. अभी लहान असल्या पासून आई च्या मागे मागे असायचा. त्याचे मित्र त्याला आई चे शेपूट म्हणून चिडवत असत. पण त्याला त्याची लाज वाटत नसे. भावंडे लहान होती, म्हणून मग आई च्या स्वैपाकघरातील छोट्या मोठ्या कामांत तो मदत करायचा. त्या चिमुकल्या हाताने जेव्हा तो भाजी निवडायला बसायचा तेव्हा आई ला हसून हसून पुरेवाट व्हायची. पण त्या माउली ला खूप कौतुक होते त्या गोषीटीचे, शेजारी पाजाऱ्यांना सांगायची, एवढासा आहे पण मला मदत करतो.आपली आई च आपली पहिली शिक्षिका आणि पहिली समीक्षक असते. भावंडे लहान होती म्हणून बाजारतुन किंवा भाजी मंडई तुन काही बारीक सारीक वस्तू आणायच्या असल्या कि आई अभी ला च पाठवायची. आज हि कधी हा विषय निघाला कि शेफ अभी सांगतात पुढे जाऊन मला ह्या चा फायदा मेनू प्लांनिंग मध्ये झाला. ..किती छोट्या छोट्या गोष्टी असतात, बघितले तर खूप छोट्या पण आपल्या आयुष्य वर आपला प्रभाव सोडून जातात…
ह्या च गोष्टीचा प्रभाव असेल किंवा आई कडून उपजत च शेफ अभी ना सैंपाक करायची हळू हळू गोडी लागली. आई च्या हाताला चव होतीच ती चव शेफ अभी च्या हाताला आहे. ते सांगतातच माझा हा गुण मला आई कडून मिळाय म्हणून. हि आवड पुढे जाऊन त्याचे पॅशन कधी बनले हे त्याला कळलंच नाही.
त्या वेळी शेफना आजच्या सारखे सन्मानाने बघत नसत. आज च्या मितीला ह्या व्यायसात यायला सगळेच धडपड करतात कारण आता ह्यात मान सन्मान आणि पैसे आहे. नोकरी साठी बरेच पर्याय आहेत. परदेशात जायच्या संध्या आहेत. पण काही वर्षा पूर्वी असे नव्हते, इतका मान सन्मान आणि पैसे ह्या व्यायसात नव्हता.. शेफ ला आचारी म्हणून चिडवत असत. शेफ म्हणजे आचारी, त्यात काय शिकायचे? …… लोक म्हणत असत आमच्या आई आणि आज्या काय सैंपाक शिकायला गेल्या होत्या का येतोच ना त्यांना सैंपाक? कालच एका मित्रा चा फोन आला होता, मुलाला शेफ साठी ऍडमिशन घेऊन दिली, १.५ करोड खर्च केले.... हि तफावत आहे ...
पण सैंपाक हि एक कला आहे एक शास्त्र आहे. त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे गरजे चे आहे. त्या काळी हि गोष्ट खूप कमी जाणाना माहित होती.
म्हणूनच जेव्हा अभी ने त्याची आवड, त्याचे पॅशन त्याने व्यायसाय म्हणून निवडला तेव्हा बऱ्याच जणांना नाही रुचले..
म्हणून च जेव्हा अभी ने पुढच्या अभ्यासाठी कॅटरिंग कॉलेज मध्ये प्रवेश घायचे ठरवले तेव्हा सगळ्यांनी त्याला वेड्यात काढले.घरात विरोध होताच, मित्रांनी पण चेष्टा करायला सुरुवात केली. आचारी बनायला चालाय म्हणून त्याची खिल्ली उडवली. वडिलांनी तर साफ नाही सांगितले.
पण ह्या सगळ्या मध्ये त्याची आई त्याच्या पाठीशी ठाम पणे उभी राहिली, ती म्हणाली तू जा पुढे शिक. घरातल्याच्या विरोधाला जुमानले नाही, समाजाची पर्वा नाही केली. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ते अगदी खरंय. बहुतेक तिने तेव्हाच ओळखले होते कि आपला मुलगा ह्या क्षेत्रात खूप नाव कमावेल.
घरात पैश्याची चण चण होतीच, वडील ज्या कंपनीत कामाला होते ती बंद पडली होती, त्या मुळे घरात महिन्याचा पगार येणे बंद झाले होते, लहान भावंडं शिकणारी होती. हे सगळं जरी खऱ असले तरी पुढचा मार्ग एवढा सोपा नव्हता, कॅटरिंग कॉलेज साठी दुसऱ्या शहरात जावं लागणार होते. कॉलेज ची फीस, तिथे राहायचे पैसे, ह्या सगळ्या साठी बराच पैसा लागणार होता. कुठून आणणार एवढे पैसे?काय करणार काही च सुचत नव्हते...एकीकडे शिक्षण आणि एकीकडे पैश्याची समस्या ..एकीकडे आवडते क्षेत्र तर एकीकडे घरातली परिस्थिती...खूप च द्विधा मनस्थिती होती त्या वेळी शेफ अभी ची..त्यांना एकच आधार दिसत होता ती म्हणजे आई...पण ती तर काय करणार होती... पण आई ने धीर नाही सोडला त्याला काही पैसे दिले आणि म्हणाली जा तू पुढे शिक. तो आई ला नमस्कार करायला खाली वाकला आणि आई ने आशीर्वाद साठी हात पुढे केले तर त्याला दिसले कि काल पर्यंत तिच्या हातात असणाऱ्या सोन्याच्या बांगड्या कुठे दिसत नाही. त्याने आई ला विचारले ती म्हणाली सोनारा कडे दिल्यात पोलिश करायला, पण अभी समजला काय समजायचे ते. त्याला आता आई चे मन मोडायचे नव्हते. तिची काय इच्छा आहे ते त्याला कळले होते. मनात एक दृढ निश्चय करून तो घराच्या बाहेर पडला.
आणि एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली होती. जिथे प्रवासाची सुरुवात तर माहित होती पण शेवटचं स्टेशन कोणते आहे ते माहित नव्हते...हे हि माहित नव्हते कि शेवटचे स्टेशन येई पर्यंत प्रवास चालू राहील कि प्रवास मधेच सोडून परतावं लागेल..पण आई चा आशीर्वाद त्याच्या पाठीशी होता आणि त्याचा पूर्ण विश्वास होता कि ..नक्कीच यश मिळणार..आशिर्वादा च्या भांडवला बरोबरच प्रबळ इच्छाशक्ती पण होती... अभी चे शिक्षण सुरु झाले. नवीन शहर, नवीन कॉलेज खर्चाचा मेळ बसेना मग त्याने छोट्या मोठ्या नोकऱ्या करायला सुरुवात केल्या पण शिक्षण चालू ठेवले. रात्री कामे करायचा, हॉस्टेल वर सकाळी नाश्ता असायचा तेवढेच खायचा, रात्रीचे जेवण म्हणजे वडा पाव. कधी ते पण नाही...पण घरी कधी पैसे नाही मागितले..आणि मागून मिळणार पण नव्हते याची खात्री होती... त्यातून हि तो बचत करून काही ना काही घरी पाठवत होताच. असेच दिवस गेले त्याचे शिक्षण पूर्ण झाले.
आता नोकरीचे प्रयत्न सुरु झाले. केलेली मेहनत आणि कष्ट वाया जात नाहीत, केलेल्या कष्टाचे कधी ना कधी फळ मिळते, असं म्हणतात ते अगदी बरोबर आहे. ... एक चांगल्या हॉटेल मधून नोकरी साठी कॉल आला.त्या वेळी काही जास्त पगार नसत.त्याची नोकरी सुरु झाली फक्त ८०० रुपया वर.त्या वेळी अननुभवी कर्मचारींना १२- १२ तास १४ -१४ तास काम करावे लागत असे. वरिष्ठ लोक, काम शिकायचे असेल तर पडेल ती कामे करा म्हणून दम पण द्यायचे. दसरा नाही दिवाळी नाही ..रवीवारी ची सुट्टी नाही, कारण सण असले कि सुट्या असतात लोक बाहेर मजा करायला बाहेर पडतात, मग काय हॉटेल मधून खाऊनच घरी जाऊ अशी होम मिनिस्टर ची ऑर्डर येते ..मग काय सगळे हॉटेल मध्ये गर्दी करतात ...अशीच १० वर्षे कधी निघून गेली कळलंच नाही.
पण मध्यंतरीच्या काळात त्याने स्वतःलाच दिलेले वचन पूर्ण केले, स्वतःच्या पगारातले पैसे आई ला घर खर्च आणि भावंडांच्या शिक्षणासाठी दिल्या नंतर पण काही पैश्याची बचत तो करत होताच...त्या तूनच त्याने एका दिवाळीला आई साठी सोन्या च्या बांगड्या केल्या..लक्ष्मी पूजनाच्या वेळी ज्या वेळी त्याने त्या आई समोर पुढे केल्या तेव्हा आई च्या डोळ्या चे पणी थांबेचना..
ज्या हॉटेल मध्ये अभी काम करत होता तिथूनच त्याला परदेशात जायची संधी मिळाली. स्वतःला बाहेरच्या जगात सिद्ध करणे तसे सोपे नसते फारच कठीण काम आहे, पण हे काम पण तेवढ्याच सहजतेने करून, आपल्या परिश्रमाने मिळालेल्या संधी चे सोने केले आणि मग त्या नंतर त्याने कधी मागे वळून बघितले नाही. यशाच्या एका नंतर एक पायऱ्या तो चढतच गेला. पण दुःख एकच होते कि त्याचे हे यश बघायला त्याची आई आता ह्या जगत नव्हती..काळाने अवेळी अचानक घात केला. आणि त्याची आई त्याला सोडून गेली… त्याच्या आयुष्यात कधी हि न भरणारी पोकळी निर्माण करून गेली…. पण नक्कीच तिचे आशीर्वाद शेफ अभी च्या पाठीशी नेहमीच असणार…
आज अभी अत्यंत यशस्वी शेफ आहे. ते जेवढे यशस्वी शेफ आहेत तेवढेच यशस्वी लेखक आहेत. परदेशात राहण्याची संधी येऊन सुद्धा परत भारतात येणे पसंद केले. कारण इथल्या लोकांसाठी काही तरी करायचे मनात होते... अफाट आणि विस्थिर्ण अश्या अनुभवा चा उपयोग आज च्या पिढीला मिळावा म्हणून बरीच पुस्तके लिहिलीत, बऱ्याचश्या नियतकालिका आणि मासिका तुन हि लिखाण चालू असते.
बऱ्याच टीव्ही शो मध्ये पण सहभाग घेतला आहे. बरेच शे अवॉर्ड्स त्यांच्या पदरी जमा आहेत. वैशिट्ये पूर्ण म्हणजे त्यांना फेवरीट शेफ म्हणून पण नावाजण्यात आलेले आहे. शेफ अभी च्या आई ची आठवण म्हणून त्यांना गरजू गृहिणी ज्या उत्तम सैंपाक करतात त्यांच्या साठी रोजगार सुरु करायचा आहे. त्यांना त्याची हि कला पुढच्या पिढी साठी जिवंत ठेवायची आहे. अश्या ह्या हुरहुन्नरी कलावंतला माझे शतशः प्रणाम!!!
आज च्या पिढी साठी शेफ अभी निश्चितच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे…..
