Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rupali Kute

Fantasy

4.3  

Rupali Kute

Fantasy

हॅपी Journey 😍

हॅपी Journey 😍

9 mins
3.5K



सकाळचे ५.३० वाजले होते. एक एक्सप्रेस ट्रेन धूर सोडत ठिशss ठिश ss करत स्टेशन वर येऊन थांबली. स्टेशन तस बऱ्यापैकी रिकामच होत. ट्रेन आल्यावर थोडी वर्दळ दिसू लागली. एखाद दुसरा कुली ओरडत फिरताना दिसत होता. कोपऱ्यावर एक चहाची टपरी होती, चहाचा मस्त सुगंध दरवळत होता आणि बंद काचेच्या बरण्यांमधे बिस्किटस, केक्स, कुकीजही कोंबून भरले होते. त्याच्या बाजूला आंब्याच्या रिकाम्या लाकडी पट्यांवाल्या पेट्यांवर, फळ्या टाकून newspaper, magazines विकणारा बसला होता. आता वाढलेली वर्दळ हळू हळू कमी होताना दिसत होती. काही प्रवासी, घ्यायला आलेल्या नातेवाईकांसोबत तर काही ऑटो किंवा टॅक्सी पकडून निघून जात होते. तर ट्रेन मध्ये चढणारे सामान घेऊन चढायच्या तयारीत होते. ट्रेन तशी १०मिनिट स्टेशनवर थांबणार होती. इतक्यात एक तरुणी ट्रेन मधून उतरण्याचा कसोशीने प्रयत्न करत होती. तिच्याकडे २ बॅग्स होत्या छोटी बॅग खांद्यावर आणि भली मोठी बॅग हातात; मात्र ट्रेनमधून उतरताना ती बॅग दरवाज्यात अडकली त्यामुळे ट्रेन मध्ये चढणारे वैतागत होते.

प्रवासी : ट्रेन येऊन किती वेळ झाला. एवढा वेळ झोपला होतात का ? लोकं उतरून कधीची निघून गेलीयत आणि ह्या मॅडम आरामात उतरतायत.


ती तरुणी सुचित्रा. कमालीची सुंदर. आपले लांबसडक केस हाताने मागे सारत बोलू लागली

सुचित्रा : अहो ss आधी मला उतरू द्या, मग चढा. माझी बॅग अडकलीय, दिसत नाही का तुम्हाला ?

प्रवासी : हो दिसतंय ते, उतरा आता

सुचित्रा : तेच तर करतेय, मदत करायची सोडून नुसती आरडाओरड.


इतक्यात तिथं एक तरुण येऊन पोहोचला. युनिफॉर्म वरून तर रेल्वेचा कर्मचारी वाटत होता. अखेरीस त्यानं सुचित्राची दरवाजात अडकलेली bag काढली आणि प्लॅटफॉर्मवर ठेवली. समोर पहिले तर सुचित्रच मोहक रूप.... तिने सफेद रंगाचा चिकेन प्रिंट वाला पंजाबी ड्रेस घातला होता. त्यावर तिचे लांबसडक काळेभोर केस अगदी उठून दिसत होते. कानात ओक्साईडचे छोटेसे झुमके, नाकात डायमंडची फुल्ली आणि माथ्यावर चंदेरी टिकली. तिच्या केसांच्या बटा सारख्या चेहऱ्यावर येऊन गर्दी करत होत्या आणि ती सारख प्रेमानं हळुवारपणे त्यांना बाजूला सारत होती. सुचित्राला पाहून हा रेल्वे कर्मचारी मात्र मंत्रमुग्ध झाला होता. तो डेविड. उंच देखणा तरणाबांड handsome hunk. पाहताक्षणी प्रेमात पडेल असा रुबाब आणि बोलणे. नुकताच ह्या स्टेशनवर assistant म्हणून बदली झाली होती.

सुचित्रा त्याला न बघताच, bag काढली म्हणुन thank you म्हणाली आणि पुढे निघाली. डेविड मात्र तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या केसांमधून तीच मोहक रूप शोधत होता. त्याला ती काहीशी गोंधळलेली वाटली, खरं तर ती खूपच गोंधळलेली होती आणि घाबरलेलीही. सुचित्रा थोडं पुढे चालत जाऊन एका रिकाम्या बेंचवर बसली. आणि स्वतःशीच काहीतरी पुटपुटू लागली. डेविडचा लक्ष होताच, त्याला वाटल विचारून पाहावं, पण नको उगाच खूपच interfere केल्यासारख वाटेल म्हणून तो दुर्लक्ष करत समोरच असलेल्या त्याच्या केबिन मध्ये जाऊन निवांत बसला. बऱ्याच वेळांन, एक ट्रेन येऊन गेली. सुचित्रा अजून तिथेच बसली होती.

डेविडच अजूनही काहीकेल्या कामात पुरेसं लक्षच लागत नव्हत; सारख्या त्याच्या समोर त्या काळ्याभोर केसांच्या बटा उडत होत्या आणि ती तिच्या माथ्यावरची चंदेरी टिकली चमचम करत होती. त्याला पुन्हा फलाटावर जाण्याचा मोह झाला, तसा त्याचा round ही बाकी होताचं. गेली असेल का ती ? ट्रेन तर येऊन गेली ? गेलीही असेल ? छे !! एवढा वेळ उगाच कोण कश्याला थांबेल. तो तिचा विचार करत पुन्हा फलाटावर आला; पाहतो तर काय, तर ती तिथेच, बाजूच्या newspaper वाल्याशी काहीतरी बोलत होती. परत बेंचवर येऊन बसली. आता तर ती अधिकच अस्वथ वाटत होती. पण ही अस्वस्थता का असेल? आता न राहवून डेविड तिला विचारायचं ठरवतो. आणि तसाही तो रेल्वेचा कर्मचारी असल्यामुळे त्याला तेवढी authority तर होतीच. आता तो त्याचा पुरेपूर उपयोग करायचं ठरवतो.

डेविड : mam, do you need any help?

सुचित्रा: अ..... काय?

डेविड : तुम्हाला काही मदत हवीय का?

सुचित्रा: ना नाही ... ठीक आहे मी...

डेविड : madam तुम्ही खूप tention मधे दिसत आहात आणि गेला एक तास तुम्ही इथेच बसून आहात म्हणून विचारलं. तुम्ही कोणाचा wait करत आहात का? की तुमच्या पुढच्या ट्रेनला वेळ आहे, तस असेल तर तुम्ही waiting room मध्ये थांबू शकता.

सुचित्रा : sorry पण इथे बसलं तर काही प्रोब्लेम? की इथे बसणं allowed नाहीय. आणि मी एक तास इथे बसलीय हे तुम्हाला कसं कळल ? माझ्यावर नजर ठेऊन आहात तर ? By the way मी वाट पाहतेय कोणाचीतरी, येतीलच ते इतक्यात; मग जाईन मी इथून. तुम्ही जास्त काळजी करू नका, गरज नाही.

डेविडला जरा विचित्रच वाटल तीच बोलणं. तो पुढे काहीच बोलला नाही. 'sorry', म्हणून तसाच माघारी फिरला. पण तिला काहीतरी tension आहे हे डेविडच्या डोक्यात चालूच होत ति तशी बोलली नाही पण चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.

डेविड केबिनमधे जाऊन बसला पण डोळे प्लॅटफॉर्मवरच फिरत होते. तब्बल एक तासाने सुचित्रा डेविडच्या केबिनजवळ आली.

सुचित्रा : मी आत येऊ शकते का ?

विचारमग्न डेविड धाडकन उठला. समोर डेस्कवरच भरलेल्या ग्लासातून पाणी सांडल, एक दोन फाइल्सही खाली पडल्या त्यानं ते सावरत,

डेविड : 'yes please' म्हणत तिला बसायला खुर्ची पुढे केली.

सुचित्रा: sorry मी मघाशी जरा जास्तच......

ती खुर्चीत बसत बोलू लागली. डेविडला जराही वाटत नव्हत की तिने त्याची माफी मागावी. तीला थांबवत,

डेविड : its ok मला वाटल तुम्ही एकट्या आणि काही tension मधे बसला आहात म्हणून enquiry केली. बस एवढंच.

सुचित्रा: खर तर..., हो जरा tension तर आहेच.....

डेविड : तुम्हाला योग्य वाटत असेल तर, तुम्ही माझ्याशी share करू शकता. If u dont mind !

सुचित्राला थोड relief वाटण्यासाठी, डेविडने गरमागरम चहा मागवला. दोघंही चहा घेऊ लागले. चहा घेताघेता डेविड सुचित्राला न्याहाळतच होता. तिचे ते नाजूक गोरे हात. वेळवेट सारखे मऊ ओठ आणि सुचित्रा चहा संपवून बोलायला सुरुवात केली. डेविड भानावर आला.

सुचित्रा : माझं एका मुलावर प्रेम आहे. त्याच नाव सुहास.

हे ऐकताच डेविडच्या छातीत एक जोरात कळ येऊन गेली. आणि तोंड बारीक करून एक ग्लास पाणी प्यायला.

सुचित्रा: तुम्ही ठीक आहात ना?

डेविड : yes yes am okay ...

काय बोलणार बिचारा त्याच्या मनात बहरलेली पालवी क्षणात सुकून गेली होती. (म्हणून त्यावर पाणी.....)


सुचित्रा: मी त्याच्याबरोबर लग्न करण्यासाठी घर सोडून आले आहे आणि आम्ही स्टेशनवर भेटणार होतो. ट्रेन येऊन उभी राहिली पण तो वेळेत पोहोचला नव्हता. नेहमीची सवय. मी त्याला फोन केला तर तो पोहोचतोय म्हणाला. त्यांने मला ट्रेन मधे जाऊन बसायला सांगितलं. मी त्याला हेही सांगितलं की मी एकटी ट्रेन मध्ये नाही बसणार पण त्याने खूप आग्रह केला. नेहमीची सवय. तो म्हणाला, 'अग, ट्रेन सुटली तरी मी कसाही पुढच्या स्टेशनला येऊन बसू शकतो. तू आधी जाऊन बस. त्यानें आग्रहच केला आणि मी ट्रेनमधे बसली. तिकीट त्यानं आधीच मला दिल होत. ट्रेन सुरू झाली तरीही तो काही आला नाही. पुढचं स्टेशनही आलं, मला वाटलं आता नक्की येईल; म्हणून मी त्याला दिसावी यासाठी दरवाज्यात उभी राहिली. पण तो काही दिसलाच नाही. पुन्हा ट्रेन सुरू झाली. मग म्हंटल कॉल करून बघावं कदाचित दुसऱ्या डब्यात चढला असावा. सीट वर येऊन बॅगेत पाहिलं तर माझा मोबाईलही सापडत नव्हता. स्टेशनवर हरवला की ट्रेन मधे काही कळालाच नाही. मात्र हरवला हे नक्की.

सुचित्राचा बोलता बोलता घसा सुकला होता. आणि शब्द खूप मुश्किलीन बाहेर पडत होते. डेविडला तिला होणारा त्रास जाणवला आणि तो तिला जरा थांबा अस म्हणाला. त्यानं बेल वाजवून पाणी मागवलं. तिनं थरथरत्या हातानं पाण्याचं ग्लास उचललं आणि घटाघट पाणी पिऊन सुस्कारा सोडला.

डेविड : त्याचा नंबर...

सुचित्रा : हल्लीच नवीन कार्ड घेतलं होतं त्यानं. नंबर पाठ नाही. सुहास मला फोन करत असेल पण माझा मोबाईल..., मला कस कळणार. कुठे उतरायचं हे त्यालाच माहीत होतं. कुठे उतरणार मग इथं उतरले. या स्टेशन विषयी बोलला होता, कदाचित सुहास इकडे भेटेल अस वाटलं. पण तो इथेही नाही. मला फक्त बाबांचा नंबर पाठ आहे पण त्यांना फोन कस करू. ते मला आता घरातही घेणार नाहीत....

डेविड सगळं शांतपणे ऐकत होता मात्र त्याच्या round ची वेळ झाली होती. त्यानं सुचित्राला अजून एक चहा मागवला आणि round वर निघून गेला.


डेविडच्या डोक्यात विचारचक्र सुरूच होत. खरच ह्या दोघांची ताटातूट झाली असावी. तस असत तर तो मुलगा स्टेशनवर आला असता, हिला एकटीला का सोडलं असतं ? की त्याला यायचंय नव्हतं....??? नाही असं नसेल कदाचित, उगाच आपण काहीही विचार करतोय. आपण मदत करावी का तिला ? खरच त्या मुलाने तिला फसवलं असेल तर....?

वाईट वाटलं आणि थोडं हायसही वाटलं. डेविडला सुचित्रा पाहताक्षणीच आवडली होती. अगदी त्याच्या स्वप्नात दिसणाऱ्या पऱ्यांसारखी अलगद त्याचा आयुष्यात आली होती. हा योगायोग होता की खरच अस घडलं होतं. तो पुन्हा त्याच्या केबिन जवळ येऊन थांबला, कितीतरी वेळ सुचित्राकडे टक लावून पाहत होता. कुणास ठाऊक, पुन्हा ती दिसेल की नाही. ती गोंधळलेल्या अवस्थेत तशीच बसून होती आणि डेविडला ते बघवत नव्हतं. तो आत गेला आणि त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला.

डेविड: मॅडम मी तुच्यासाठी एवढंच करू शकतो, मी प्रत्येक स्टेशनवर कॉल करून तिथं तुमच्यासाठी कोणी काही messages ठेवलाय का ते विचारुन घेऊ शकतो. म्हणजे जर सुहास ने काही message ठेवला असेल तर तो आपल्याला कळेल.

सुचित्राने कसलाही विचार न करता होकार दिला. डेविडने लगेच प्रत्येक स्टेशनवर फोन करायला सुरुवात केली. सुचित्राही त्याच्याकडे आता टक लावून पाहत होती. अरे, हा खरच आपल्याला मदत करतोय. मी यांच्यासोबत किती चुकीची वागली; दुसरं कुणी असत तर खरंच मदत केली असती ? बरा माणूस आहे हा. डेविडची फोनाफोनी सुरूच होती पण काहीच निष्पन्न झालं नाही. सुहास नावाच्या माणसाने कुणाही वयक्तीच्या नावे कुठेही message ठेवल्याची काहीच बातमी नव्हती.

सुचित्रान हतबलपणे डेविडच्या डोळ्यात पाहिलं, खूप प्रश्न होते तिच्या त्या टपोऱ्या डोळ्यांत. डेविडला तिला होणारा त्रास पहावत नव्हता त्यालाही आता त्रास होऊ लागला होता. त्याला वाटलं किती मूर्ख माणूस असेल हा सुहास; हिला एकटीला सोडून दिलंय..., नक्की प्रेम वगैरे करतोय की नाही कुणास ठाऊक.? त्याच्या मनात क्षणभरासाठी प्रचंड राग आला. आणि वाटलं हे फुल जर माझ्याजवळ असत तर किती जपलं असत. पण असो after all destiny ज्याला जिथे पोहोचवायचय तिथे पोहोचवतेच.


आता डेविडकडे एकच option होत, सुचित्राला तिच्या स्टेशनच तिकीट काढून द्यायचं किंवा सुहासची वाट पहायची. त्यानं दोन्ही options तिला सांगितले. तर तिनं अजून थोडा वेळ वाट बघू अस सांगितलं कदाचित पुढच्या ट्रेन मध्ये येईल तो मला घ्यायला. डेविड ठीक आहे म्हणाला, त्यालाही कुठे घाई होती तिनं जावं म्हणून.

सुचित्रा डेविडच्या केबिन मधे कितीतरी वेळ बसून होती. डेविड अधून मधून तिरक्या नजरेनं तिची नजर चुकवत तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत होता. तिच्या आस लावलेल्या डोळ्यांकडे बघितल्यावर तीच सुहास वर खूप प्रेम आहे हे जाणवत होतं, त्यामुळे डेविडला जरा वाईट वाटलंच पण काय करणार जोपर्यंत तो भेटत नाही तोपर्यंत काहीच शक्य होणार नव्हतं.

तेवढ्यात फोनची ring वाजली आणि पलीकडून ....... स्टेशन मास्तर सुचित्राला विचारत होता. ते ऐकून डेविडच्या काळजात एकदम धस्स झालं. आता ती जाणार या भीतीनं तो तिच्याकडे टक लावून पाहू लागला. सुचित्रालाही काहीतरी जाणवलं ती धावत डेविडजवळ आली आणि विचारलं माझा फोन आहे का?, मला कुणी विचारतय का? नेहमीची सवय... तेवढ्यात डेविडन फोन तिच्या हातात दिला आणि तो बाहेर निघून गेला. जर तो तिथे थांबला असता तर त्याला तिचा आनंद बघवला नसता.

डेविड प्लॅटफॉर्म वर एका बेंचवर बसला होता. जवळ जवळ १० मिनिटांनी सुचित्रा डेविड जवळ आली, बसली. त्याला आश्चर्य वाटलं ही परत का आली. मग ती म्हणाली "माझे बाबा होते फोनवर. बाबांना सर्व सांगितलं, सुहास ने त्यांना फोन केला होता. की मी कदाचित या स्टेशनवर असेल आणि असंही बोलला की फक्त सुचित्राची इच्छा होती म्हणून आम्ही हे पळून जायचं decision घेतलं होत. मला तसा काही ह्या सगळ्यात एवढा काही interest नव्हता. त्यावरून त्याच माझ्यावर जराही प्रेम नव्हतं हे कळलं" सुचित्रा खूप रागात होती. मग म्हणाली "बाबा चिडले नाही, बाळा, तू फक्त घरी लवकर ये; आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतोय अस म्हणाले." मला माझ्या घरी जायचंय, बाबांकडे जायचंय, तुम्ही मला सोडायला येऊ शकता का प्लिज ?



डेविडला काय बोलावं कळत नव्हतं, ड्युटीही संपत होती आणि आतून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.

डेविड : (खात्रीवजा म्हणाला) कोण मी ??

सुचित्रा: हा म्हणजे तुम्हाला जमणार असेल तर....

डेविड : Yes sure, why not! फक्त माझी ड्युटी संपायला अर्धा तास आहे तोवर तुम्ही तुमचा मूड fresh करू शकता का ?!!!

सुचित्रा :(खूप दिवसांनी गोड smile देऊन) 'yes sure, why not', म्हणाली. दोघेही मनमोकळे हासले.


मग सुचित्राच स्टेशन येईपर्यंत डेविडने काय काय पापड बेलले असतील हे काही आता वेगळं सांगायला नको 😊


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy