Rupali Kute

Romance Others

5.0  

Rupali Kute

Romance Others

Happy Birthday🎂

Happy Birthday🎂

7 mins
1.2Kमिराचा आज २५वा वाढदिवस. स्वाभाविकच, आज ती खुप खुश होती; कारण ह्या दिवशी अनेक surprises हे ठरलेले. मग काय cakes, chocolates, gifts, पार्ट्या आणि बरच काही.....

    .....आज आर्चित भेटणार होता पुन्हा. होय पुन्हा. ३ वर्षांपूर्वी ह्याच दिवशी मिरा आणि आर्चित एकमेकास पहिल्यांदा भेटले होते. हुरहूरत्या दिव्यांची लोभस, गुलाबी संध्याकाळ. धावपळ करणारं स्टेशनही आज नवीन काही अनुभवण्यासाठी आतुर होतं. बाहेरील थंड हवा उगाच आसुसलेलीे, आणि तो वाऱ्याच्या वेगानं आला; मिराच्या वाढदिवसाचं अवसान साधून. अगदी फिल्मी आणि हो, रोमँटिक भेट होती ती. मिराच्या आजही जशीच्या तशी लक्षात आहे.

    आर्चित दिसायला सांवळाच, मध्यमवर्गीय. ओठांवर एक बारीकशी मिशी आणि हनुवटीवर दाढीचा एक बारीक त्रिकोण, शरीरानंही बारीकच, आत सफेद टीशर्ट त्यावर चेक्सच शर्ट घातलं होत त्याचे अर्धे बटन्स खुलेच होते आणि निळ्या रंगाच्या टायगर वॉश जीन्समधे ते in केलं होतं. त्यावेळी आर्चित स्वतःला hero च समजायचा, खरं तर तो हिरो वगेरे टाइप चा न्हवताच, मात्र रुबाब तर एवढा होता शाहण्याचा, की आताच दोन फिल्म साइन करून आलाय, तेही लीड मधे बर का. पण त्याच्यात उगाचचाच confidence होता हेे मात्र नक्की. मिरा मात्र दिसायला गोरीपान, नाकी डोळी अगदी सुरेख, रेखीव. कुणालाही भुरळ पाडेल अशीच होती. तीने आज छान, साधासा मरून कलरचा पंजाबी ड्रेस घातला होता. खरं तर ती कोणत्याही कपडयात छानच दिसते. मात्र आर्चित तिला इम्प्रेस करेल असं वाटतं नाही.


A: छान दिसतेयस (अर्चित मिराच्या डोळ्याला डोळे भिडवत म्हणाला)

M:(मिरा गालातल्या गालात लाजून) अच्छा...

मग मिराच्या मनात अनामिक हुरहूर. आता दोघांनाही न बोलता बरच काही सांगायचंय. निदान आर्चितला तर नक्कीच. मग अर्चितन मिराला एक लाल गुलाबांचा गुच्छ देत, फिल्मी स्टाईल मध्ये म्हटलं....

A: हॅपी Birthday😊

M: Thank you 😊

मिरा फुलं हातात घेऊन, फुलपाखरासारखी तरल. पण अबोल.

मग पुन्हा आर्चितनं शर्ट मधून एक सुरेखस Birthday कार्ड काढून मिराला दिलं. आणि तिचा चेहरा टिपून घेत

A: हॅपी Birthday (तो पुन्हा हसून)

मिराही हसली. अगदी मनापासून. पण आता हळूहळू तिला जरा टेंशन येऊ लागलं. पहिल्यांदाच भेटतोय आम्ही आणि हे?, एवढं का करतोय हा सगळं?, ठीक आहे न हा?? जरा जास्तच होतंय ह्या हिरोचं!!

M: (तेच हसणं कायम ठेवत)Thank you again.


आर्चित सर्व काही प्लॅनिंग करूनच आलेला आणि ते आता मिराला स्पष्टच होत होतं. मिराला खरं आश्चर्य तर तेव्हा वाटल, जेव्हा आर्चित न, गाणं म्हणत एक छानसा केक मिरासमोर ठेवला. मिरा नुसती पाहत राहिलेली.

A: हॅपी birthday to u......! हॅपी birthday to u....! हॅपी birthday dear मिरा, हॅपी birthday to u..!!

M: (मिरा बावरली, पण) ohhh thank....thank you very much.

मिराला हे सारं अनपेक्षित होत, पण तितकंच हवं हवस...का कुणास ठाऊक, मनाच्या तळातून आनंदाच्या अगदी उकळ्याच फुटत होत्या. पण मुलांच्या ह्या अश्या जाळ्यात अडकणारी मिरा नाहीच. तीनं एखाद्या कसलेल्या अभिनेत्रीप्रमाणे चेहऱ्यावर काहीही भाव न दाखवता, अर्चितला अगदी निरागसपणे विचारलं,

M: तू, (थांबली) हे सगळं का करतोयस ?

A: (सहज) काही विशेष नाही, तुझा birthday celebrate करावासा वाटला म्हणून केला. अग birthday girl आहेस न तू आज, जास्त विचार नको, इतर दिवस आहेत त्यासाठी. चल हे घे..

मग प्लास्टिकचा चाकू मीराकडे देत

A: चला केक कापा.

मिराला कुणाला कापाव कळतं न्हवतं, शेवटी केकच कापला. तर लगेच एक तुकडा अर्चितन उचलला आणि चक्क मिराला भरवायला गेला. ती थोडस मागेच सरकली. तिला जरा odd च वाटलं. अरे... हा हिरो, खूपच पुढे चाललाय. तिने त्याला थांबवलं, पण अर्चित थांबणाऱ्यातला थोडीचं. कोणाचं ऐकणार तो, चुकीचं तर त्याला अजिबात वाटतं न्हवतं आणि मिरा तर आज कुणालाही दुखावणार न्हवती; शेवटी आर्चितने चान्स घेतलाच. भरवलाच केक मिराला. मिरा थोडी नाराज झाली पण मग दुर्लक्ष करत दोघांनीही गप्पा मारत केक खाल्ला. छान होता केक. पण इतका मोठा केक दोघांना काही संपता संपेना. आणि किती खाणार, मग तिथेच रस्ताच्या कडेला एक गरीब मुलगा होता, आर्चितन तो केक त्याला देऊन टाकला, मिराच्या सहमतीनेच. आणि मिरा त्याचकडे पाहून गोड हसली, आणि तोही कधी न्हवे तो निरागस हसला. मिरान निरोप घेतला आणि रिक्षा पकडून वेगानं निघून गेली.

    मिराच्या डोक्यात आजही आर्चितने केलेलं, ते वेगळं आणि unplanned celebration तसंच आहे. दोघांनी दोघांसाठी केलेलं, ते काही केल्या पुसलं जातं नव्हतं.


     आर्चितला मिरा,'भारी' आवडायची. म्हणजे मिराला तस वाटायचं, पण आर्चितच्या मनात काय चाललं होत कुणास ठाऊक? ......तस तो तिच्यासमोर व्यक्तही झाला होता. अगदी सहजपणे. पण मिराच्या तशा काहीच feelings नव्हत्या, निदान तेव्हा तरी. Friend वगैरे ठीक आहे पण याची ना ओळख, ना पाळख, या हिरो नसणाऱ्या हीरोपंतीला life partner कोण करणार? आणि कसा दिसतो हा!! यापेक्षा मिराला तिच्या कॉलेज मधला मुलगाच उत्तम वाटला होता. तो तिला आवडायचा, म्हणून तीन अर्चितकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच केलं. त्यानंतर खूपदा अर्चितन मिराचं मन वळवन्याचा प्रयत्न केला पण हिरोछाप आर्चितचे सगळेच प्रयत्न व्यर्थ. ह्याचे परिणाम उलटेच झाले. मिरा आर्चितला टाळू लागली. एक दिवस त्याच्याशी बोलणंच बंद केलं आणि नंबरही block करून टाकला.

    अर्चितचे प्रयत्न चालूच होते, शेवटी त्यानेही मिराला विसरण्याचा प्रयत्न केला. आर्चित खरंच दुखावला गेला असेल की त्यानं मिरा बरोबर timepass केला. मग पुढे काहीच का प्रयत्न केले नाहीत त्यानं? किंवा प्रयन्त केलेही असेल, पण मिराच्या मनापर्यंत कधी ते पोहोचलेचं नाहीत.    आज ३ वर्षानंतर मिरा आर्चित भेटणार होते. हो भेटणार होते. आर्चित मुळेच. आता दोघांच्याही आयुष्यात खूप बदल झाले होते. फार असे नाही पण आज ते दिसणार होते.

    दोघंही बऱ्यापैकी settle झाले होते. जबाबदाऱ्या आणि समर्पण होतं. मिराचा जॉब सुरू झाला होता. ती जॉब एक जॉब मध्ये आणि अर्चितही त्याच्या कामात गुंतला होता किंबहुना कामात गुंतून घेतलं होतं. दोघांनाही एकमेकांना आताच का भेटावंस वाटलं? काय कारण? किंवा काय साध्य???. अचानक एक दिवस facebook surfing करताना अर्चितला मिराचा profile दिसला आणि मग friend request पाठवली मग काय photo likes, comments, chatting आणि मग पुन्हा मिराच्या birthday च्या दिवशी ठरलेली ही भेट.
    दोघांनी मिराच्या ऑफिस जवळच्या restaurant मधे भेटायचं ठरवलं. मिराला सोयीस्कर पडावं म्हणून कारण तिला लगेच ऑफिसला जायचं होतं. ती येऊन restaurant जवळ उभी राहिली. तीनं राखाडी रंगाची फुलांची नक्षी असलेली पॅन्ट आणि त्यावर मॅचिंग टीशर्ट घातलं होत. केसांची straighting केली होती, जवळच्या बटा टिक टॅंक पिनने कानामागे लटकवल्या होत्या, डाव्या हाताच्या लांब सडक नखांना गडद गुलाबी रंगाची nail paint लावली होती. डोळयांच्या पापणीला liner आणि ओठांना हलकीशी लाल रंगाची लिपस्टिक लावली होती.

M: किती वेळ ह्याला यायला मला एकतर कुणाची वाट बघायला आवडत नाही. आणि ह्याची वाट बघायची म्हणजे जरा जास्तच. हा कोण मोठा लागून गेला. किती ऊन पडलंय, माझा makeup ohhh god help me..... आणि आज माझा birthday..... ह्या दिवशी कोण वाट बघायला लावत का?

    तेवढ्यात मिराला अर्चित लांबून चालत येताना दिसला त्याच्यात कपड्यान व्यतिरिक्त काहीही बदल झाला नव्हता. अगदी ३ वर्षांपूर्वी होता तसाच दिसत होता. मिशी काय ती नवीन वाटत होती. त्यानं plain shirt आणि jeans घातली होती. लांबूनच अर्चितन मिराला पाहिलं बहुदा संपूर्ण पाहिलं आणि smile करून hi""" केलं. अर्चितच्या हातात लाल गुलाबांच्या फुलांचा गुच्छ होता. त्यानं तो मिराच्या हातात देत तिला हॅपी birthday म्हटलं. तीनही तो thank you म्हणत स्वीकारला. त्यानंतर दोघेही restaurant मधे गेले. ३ वर्षानंतर भेटल्यावर काय बोलायचे कळत नव्हते. मिराच्या चेहऱ्यावरच तेज काही कमी झालं नव्हतं. थोडी मोटू झाली होती एवढंच. अर्चित किती तरी वेळ पाहत होता मग त्यानंच सुरुवात केली.

A: कशी आहेस ?

M: am fine. तू कसा आहेस?

A: मीही बरा आहे अगदी जसा तू मला सोडून गेली होतीस तसाच.

दोघांची नजरानजर होते, मीरा विषय बदलण्याचा प्रयत्न करते.

M: आपण ऑर्डर करू काहीतरी मला ऑफिसलाही निघायचं थोड्या वेळात.
मग बराच वेळ, काय ऑर्डर करायचं यावर discussion झालं, शेवटी मिराचा birthday म्हणून तीच ऑर्डर करते. पालक सूप. बहुधा अर्चितला ते आवडलेलं नाही पण काय करणार, birthday girl. बिच्चारा option नसल्यासारखा तोही पिऊ लागतो, पालक सूप. मिराला कळलय, हे सूप काही अर्चितला आवडलं नाहीय मग ती दुसरं काही ऑर्डर करू का तेही विचारते. अर्चित नको म्हणतो मग शेवटी ते fruit salad with जेली and ice cream मागवतात. अर्चित एक स्पून मधे ice cream घेऊन मिराला भरवण्याचा प्रयत्न करतो; ती आधी नकोच म्हणते मग आजूबाजूला कोणी पाहत तर नाही न, ह्याचा अंदाज घेत गुपचूप खाऊन घेते. (डोक्यावर हजारो आठ्या पाडून) कसा आहे हा, म्हणून ह्याला टाळते मीरा.

A: अरे तू birthday girl आहेस आज. म्हणून तुला...

M: पण कशाला? बघातायत ना सगळे?!

नंतर दोघेही एकमेकांची सगळी जुजबी माहिती काढतात. आज दोघांच्याही मनात काहीतरी वेगळंच चाललेलं आहे मात्र दोघांना अनेक बंधनही आहेत. मात्र हे नक्की, की ही कसलीतरी अनामिक सुरुवात आहे. दोघांनाही कळतय पण वळत मात्र नाहीय, निदान आज दोघही एकमेकास तसं दाखवत आहेत.

    दोघ अजूनही विचारात आहेत, का पुन्हा भेटलो? का भेटावस वाटलं? पुन्हा कधी भेटणार? ती आर्चितला पाहते, अर्चित तिला पाहत, तोच विचार करत होता. शेवटी, दोघेही एकमेकांचा निरोप घेतात, भरपूर प्रश्न मनात ठेवून आणि याक्षणी सारेच अनुत्तरित !!Rate this content
Log in