माझे प्रेम
माझे प्रेम
कधी-कुठे नकळत आमची झाली होती भेट ।
भेट घडवून आणणारे आमचे मित्र भलतेच ग्रेट ।।
ग्रेट-भेट सोहळ्यानंतर सुरू झालं आमचं चॅट ।
आणि 2 अनोळखी व्यक्तिंचं जमलं, हे भलतंच गॅट-मॅट ।।
रोज लेट नाईट चॅटिंग ने, आमचे डोळे व्हायचे रेड ।
तरी, कॉलेज अटेंड करण्याचे, आता लागले होते वेड ।।
कॉलेजच्या त्या गर्दीमध्ये, डोळेच आमचे बोलायचे ।
ओठी शब्द नसले तरीही, मनाला ते समजायचे ।।
निस्सिम अशा प्रेमाचे आता सुरू झाले 'डेटिंग' ।
आणि सेटिंग केलेल्या मित्रांनाच आता आमचे फोन लागे वेटिंग ।।
"पहिल्या डेट" ला जाणवलं, आमचं फ्युचर दिसतंय ब्राइट ।
आणि सेटिंग करणार्या मित्रांची आम्हाला, चॉईस वाटली राईट ।।
लवली अशा या जोडीची, वाटलं काय सुंदर असेल ना लाईफ ।
म्हणून, शेवटी मीच तिला विचारलं "होशील का माझी वाईफ ?"
तिच्या हास्यरुपी होकाराने दिली मला साद ।
आणि, रेशीमगाठी बांधायला, आता उरला नव्हता वाद ।।
सर्वांच्या शुभाशीर्वादाचे बळ होते आमच्या पाठी ।
कारण, मित्ररुपी देवानेच होत्या बांधल्या आमच्या गाठी ।।