Komal R

Inspirational

2  

Komal R

Inspirational

वुमन्स डे

वुमन्स डे

3 mins
99


      8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो . महिलांच्या सशक्तिकरण या हेतूने हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या युगात आपण जर पाहायला गेलो तर असे जाणवते की महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आपलं एक विशिष्ट स्थान पण संपादन करत आहेत. एवढंच नाही तर असं कोणतंच क्षेत्र नाही जिथे स्त्रिया कार्यरत नाहीत . अर्थात सर्व क्षेत्रांमध्ये त्या निपुण आहेत आणि त्यांची कामगिरी प्रामाणिकपणे कष्टाने आणि स्वकर्तुत्वाने पार पाडत आहेत. मग ते क्षेत्र कोणतेही असो उदाहरणार्थ; इंजिनियर, डॉक्टर, राईटर, सिंगर, बिझनेसवुमन, ड्रायव्हर एवढंच नाही तर आता त्यांनी गरुडझेप घेत अंतराळयान, विमान, पॉलिटिक्स अशा एक ना अनेक ठिकाणी कर्तुत्वाचा ठसा उमटवलेला आहे .आणि स्वतःला सिद्ध करून गरुड झेप घेतलेली आहे... परंतु तेवढे होण्यासाठीबराच काळ लोटला कुठलीही गोष्ट लगेच घडत नसते. प्रत्येक गोष्टीला सुरुवात ही असते. इतिहास असतो .


असंच काहीतरी या 8 मार्च बद्दल ही आहे . आपण जर आपला इतिहास पाहण्यात आला तर..... आपल्याला समजेल की ही समाजाची भावना बदलण्यासाठी बराच काळ लोटावा लागला. कोणी तरी पुढाकार घ्यावा लागला. तेव्हा आणि तेव्हाच जाऊन आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून आपल्याला साजरा करताना दिसतात.


*इतिहास*

     

      8 मार्च बद्दल जर आपण दीडशे वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर ..महिला या एका सामाजिक बंधनात बांधल्या गेल्या होत्या. त्यांना कोणत्याही प्रकारचे हक्क नव्हते .ना नोकरी करण्याचा हक्क ,ना बोलण्याचा हक्क, आपले मत प्रदर्शित करण्याचा हक्क ,ना मतदानाचा हक्क, नाही शिक्षणाचा हक्क अशा बरेच बंधनांनी त्या बांधल्या गेल्या होत्या .आणि कोणत्याही प्रकारचे हक्क त्यांच्याकडे नव्हते कितीही कष्ट केलं किंवा मेहनत जरी केली तरी त्याचा मोबदला मागण्याचा हक्क ही त्यांच्याकडे नव्हता .आणि जरी मोबदला मिळाला तरी हक्काची रक्कम ही पुरुषांच्या तुलनेत कधीच जास्त नव्हती. या बरोबर तिला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते अशा पारतंत्र्यात स्त्रिया जगत होत्या .परंतु आयुष्यात असे चढ-उतार असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक घटनेमागे ही चढ-उतार असतात. त्याचप्रमाणे 1908 मध्ये 15000 स्त्रिया एकत्रित आंदोलन केले. स्त्रियांनी मिळून एक मजुरांचे आंदोलन केले हे आंदोलन अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरांमध्ये झाले.  याचे कारण असे की कामांमध्ये कामाचे तास कमी करण्यासाठी, आणि प्रत्येक स्त्रीला मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी, आणि त्याबरोबर कामाप्रमाणे चांगले वेतन मिळण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यानंतर एक वर्षानंतर सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका पहिल्यांदाच या दिवसाला महिला दिवसाची *महिला दिनाची* घोषणा केली आणि त्यानंतर 1910 मध्ये डेनमार्क मध्ये एका भाषणांमध्ये हा दिवस अंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करण्याचे सुचवले म्हणून या दिवसाला *अंतरराष्ट्रीय महिला दिवस* पण म्हटले जाते


*दृष्टिकोन*

     

     8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करणे या दिवसाबद्दल प्रत्येकाचे वेगवेगळे प्रतिक्रिया व वेगवेगळे मत आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आपण हा दिवस साजरा करतो कशासाठी ?


      आपल्या देशामध्ये बऱ्याच महिला आहेत. त्यांचा आदर व्हावा, त्यांना योग्य ते अधिकार प्राप्त व्हावे, तसेच त्यांना कोणत्याही हक्कापासून वंचित केले जाऊ नये, स्त्री पुरुष समानता होण्यासाठी आणि समाजात स्त्रियांची किंमत सगळ्यांना समजण्यासाठी 8 मार्च हा दिवस साजरा केला जातो. आपल्याला माहिती स्त्रीची विविध रूपे आहेत. त्यामध्ये आई, पत्नी, बहीण, जाऊ अशा अनेक रूपांमध्ये त्या आपल्याला रोज भेटते. परंतु तिचं अस्तित्व नसताना आपल्याला जास्त समजतं. तरी ह्या गोष्टींचा बारकाईने विचार करून त्यांचा आदर मान सन्मान केला पाहिजे. आई वरून केलेले अपशब्द यांचा त्याग केला पाहिजे. थोडीशी जाणीव प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात रुजली पाहिजे. हे महत्त्वाचं कारण आहे आणि प्रत्येकाने जर याकडे लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच सर्व देशांमध्ये चुकीचे प्रकार घडणार नाहीत. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational