Komal R

Others

2  

Komal R

Others

ज्ञान

ज्ञान

1 min
2.8K


    आपल्याला कुठे जॉब करायचा असेल तर आपल्याला हायर क्वालिफिकेशनची गरज असते क्वालिफिकेशन म्हणजे पुस्तकी ज्ञान! आपण लहानपणापासून आजपर्यंत शिक्षण घेत आलेलो आहोत. खरं पाहता सुशिक्षितपणा ही या काळाची गरज आहे हे विधान खरे आहे. परंतु पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त सामाजिक ज्ञान हे पण खूप महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे एका नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञान आणि सामाजिक ज्ञान हे दोन आपल्या जीवनातील विविध पैलू आहेत आणि आजच्या युगात जगायचं तर आपल्याला जनरल नॉलेज असं खूप महत्त्वाचा आहे.

 

उदाहरणच द्यायचं झालं तर मी असं सांगेन की एका मेडिकल क्षेत्रातली व्यक्तीची गाडी मध्येच सुनसान ठिकाणी बंद पडली तर त्याच्या मोबाईलमधल्या मेकॅनिकला फोन करून बोलावून घेईल आणि ती गाडी दुरुस्त करण्यासाठी त्याला पैसे देईल परंतु तेही विचार करणार नाही की हे आपण स्वतः करू कारण त्याच्याकडे फक्त त्याच्या क्षेत्रामधलं पुस्तकी ज्ञान आहे. मेकॅनिक त्याचे काम माहीत नसल्या कारणाने जी गोष्ट दोनशे रुपयांमध्ये होऊ शकते त्यासाठी 24000 घालवायलाही तयार होतो. हीच तर तफावत आहे ना!      


Rate this content
Log in