STORYMIRROR

Shital Jadhav

Romance

3  

Shital Jadhav

Romance

वर्षा

वर्षा

1 min
253

ओठांत शब्द माझ्या 

स्पर्शात चिंब झाले

काजळ नयनांचे 

आठवणींनी तुडुंब न्हाले

स्वप्नांत रंगला तु राधेच्या 

कृष्णसखा तु माझा 

मनात पिसारा फुलवून गेलास

उलटून गेली ती रात्र

विरहात भिजलेली

वाट पाहते मी

मंद पावलांनी सजवेल कधी 

तु माझं आंगण

बिलगण्यास तुजला 

ह्दय कधी ओलावणार

अश्रू विरहाने भरलेली पहाट

प्रेमाने कधी न्हाहाळणार

मी अशीच तुझी 

तुला जपणारी

तुझ्याचं सुखाने 

मी हसणारी

मनात माझ्या तुला जिवंत ठेवणारी

विरह मुक्तीचा सुगंध घेऊन येशील

तु माझ्या अंगणा

वर्षा प्रेमींचा मोरपिसारा 

मिळून शहारुया

बाहुंत लपलेलं जग 

डोळ्यांत साठवूया

स्वप्नातले गाणे 

जिवणात गुणगुणुया.


Rate this content
Log in

More marathi story from Shital Jadhav

Similar marathi story from Romance