उत्तुंग भरारी
उत्तुंग भरारी


मनात धैर्य आणि प्रचंड इच्छाशक्ती असेल तर कुठल्याही अडचणी तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. या जगात खूप सारे लोक आहेत ज्यांनी कठीण परिस्थितीवर मात करून स्वत:च अस्तित्व निर्माण केले आहे. आज मी आपल्यासमोर एका अशा मुलीची कहाणी सांगत आहे जी लहानपणी पोलिओग्रस्त होती पण दृढ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर तिने ओलिंपिकमध्ये तीन तीन गोल्ड मेडल जिंकले.
ही कहानी आहे विल्मा रुडोल्फची, जिचा जन्म 23 जून 1940 रोजी अमेरिकेमधील टेनेसी प्रांतातल्या एका गरीब परिवारामध्ये झाला. तिची आई लोकांच्या घरची कामे करायची आणि वडील कुली होते. विल्माचा जन्म वेळेअगोदर झालेला असल्याने ती लहानपणापासून आजारी राहायची.
चार वर्षांची असताना समजले की विल्माला पोलिओ आहे. पण तिची आई खूप हिंमतवान आणि सकारात्मक विचारांची होती. ती नेहमी विल्माचं मनोबल वाढवत असे. पोलिओग्रस्त लोकांना आज ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या सुविधा त्याकाळी उपलब्ध नसल्याने दूर कुठेतरी एखाद्या विशिष्ट ठिकाणी दवाखाना असायचा. विल्माची आई तिला तिच्या घरापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या दवाखान्यात इलाजासाठी घेऊन जायची.
जवळपास 5 वर्षे इलाजानंतर विल्माची तब्येत हळुहळू सुधारत होती. विल्माने हळुहळू केलिपर्सच्या मदतीने चालायला सुरुवात केली. पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की, विल्मा केलिपर्सच्या मदतीशिवाय कधी चालू शकणार नाही. पण म्हणतात ना ध्येयाने पेटलेले कितीही अडचणी आल्या तरी हार मानत नाहीत. विल्माच्या आईने डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकले पण ती विल्माला असे अर्ध्यावर सोडायला तयार नव्हती. तिने विल्माचे ऐडमिशन एका स्कूलमध्ये केले.
एकदा शाळेत क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आली. ते पाहून विल्माने तिच्या आईला विचारले की, ‘मी पण असं खेळू शकेल का?’
विल्माच्या आईने खूप छान उत्तर दिले, ‘जर तुझ्यात जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर सर्व काही शक्य आहे.’
आता विल्माच्या मनात खेळाप्रति रूची वाढू लागली होती पण केलिपर्समुळे व्यवस्थितपणे चालता येत नव्हते. शेवटी एके दिवशी तिने मन धीट करून केलिपर्स काढून टाकले आणि चालण्याचा प्रयत्न करू लागली. या चालण्याच्या प्रयत्नात ती जखमीसुद्धा झाली पण ती खचली नाही. असे करता करता 2 वर्षे संपली. आणि जेव्हा विल्मा 11 वर्षाची झाली तेव्हा ती कुठल्याही प्रकारची मदत न घेता चालू लागली. ही गोष्ट जेव्हा विल्माच्या आईने डॉक्टरांना सांगितली डॉक्टर आश्चर्यचकित झाले आणि तिला भेटायला तिच्या घरी आले. त्यांनी विल्माला शाबासकी तर दिलीच पण तिचे मनोबलसुद्धा वाढविले. डॉक्टरांनी दिलेल्या शाबाशीने विल्मामध्ये एक नवीन ऊर्जा आली. चालत तर होतीच पण तिने निश्चय केला की धावपटू होणार. पोलिओ प्रभावित पायासाठी तिने एक उंच एड़ीचा शूज बनवले आणि तिने धावण्यास सुरूवात केली. विल्माच्या आईने मुलीची इच्छा पाहून पैशाची तंगी असतानादेखील तिच्यासाठी एका प्रशिक्षकाचे नियोजन केले. शाळेतल्या लोकांनीसुद्धा पोलिओग्रस्त मुलीला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले.
1953 मध्ये जेव्हा विल्मा 13 वर्षाची होती तेव्हा तिने एका अंतरविद्यालयीन प्रतियोगितेमध्ये भाग घेतला होता पण तिचा नंबर शेवट आला होता. त्यात ती निराश झाली नाही तिने स्वत:च्या चुका लक्षात घेऊन त्या सुधारण्याच्या प्रयत्नात लागली.
विल्माला सलग 8 वेळी अपयश आले पण शेवटी 9व्या वेळी तिला यश संपादन झाले. वयाच्या 15व्या वर्षी विल्मा ने पुढील शिक्षणासाठी विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे तिला एड टेम्पल नावाचे कोच भेटले. जेव्हा विल्माने त्यांना धाविका बनण्याची इच्छा असल्याचे सांगितले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला व त्यांनी विल्माला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर विल्माने दिवस-रात्र एक करून परफाॅरमन्स सुधारण्याकरीता मेहनत केली आणि शेवटी तो आनंदाचा क्षण तिला तिच्या देशाकडून ओलिंपिक खेळण्याचे सौभाग्य लाभले.
1956 रोजी ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या प्रतियोगितेत विल्मा रुडोल्फने कांस्यपदक जिंकले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. 1960 रोजी रोम येथे झालेल्या ओलिंपिक स्पर्धेत विल्माचा सामना जुट्टा हेन नावाच्या एका अशा धाविकेशी होता जिला आजपर्यंत कोणी हरवू शकले नव्हते. पहिली रेस 100 मीटरची होती ज्यात विल्माने जुट्टाला हरवून सुवर्णपदक जिंकले. दूसरी रेस 200 मीटर झाली. ज्यात तिचा सामना पुन्हा एकदा जुट्टा सोबत झाला, विल्माने याही सामन्यात तिला हरवून सुवर्णपदक जिंकले.
आता वेळ होती 400 मीटर रिले रेसची ज्यात तिचा सामना पुन्हा एकदा जुट्टासोबतच होता. विल्माच्या टीममधील पहिल्या तीन धाविकांनी बेटन सहजरित्या बदलले पण विल्माची जेव्हा वेळ आली तेव्हा तिचे हात थरथरले आणि बेटन हातातून निसटले पण विल्माने जेव्हा हे पाहिले तिने बेटन उचलले जोरात धावत 400 मीटरची रेस पण नावे केली आणि इतिहास रचला. विल्मा सतत 3 गोल्ड मेडल जिंकणारी पहिली अमेरिकन खेळाडू ठरली. जगभरातील वृत्तपत्रात तिचा ‘Fastest woman on Earth’ या Tagline ने गुणगौरव करण्यात आला. एवढेच नव्हे तर तिच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्यात आले आणि कित्येक पुस्तकेसुद्धा लिहिली गेली.
कथेचा सारांश : “कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती…”