Hanmant Chavan

Others

5.0  

Hanmant Chavan

Others

"आशा"

"आशा"

1 min
484कुठुन तरी एक आशेचा किरण येतो,

आणि आयुष्य उजाळून टाकतो

नैराग्यतेने माथरलेल्याच्या आयुष्यात,

नवचैतन्य घेऊन येतो

जीवन प्रकाशमय करतो,

जेव्हा सर्व काही संपले असे वाटते,

तेव्हा मदतीला आशेचा किरणचं येतो.


कधी कधी आपण विचार करतो की आपण ताण तणाव, नैराश्यता आणि आपल्यावर आलेल्या कठीण अडचणी यांच्या सामोरे कसं जायचे या विचाराने त्रस्त असतो.आपल्याला वाटते आपण तर वाटेल ते प्रयत्न केले पण त्यातून काही समाधान मिळाले नाही अशावेळी कामी येते जिद्द आणि नवीन आशा.

आशेचा किरण कुठुनही येऊ शकतो , जो की आपलं आयुष्य नवचैतन्याने प्रकाशित करण्यासाठी मदत करतो. हताश होण्याचे काही कारणे नसतात, फक्त मनावर संयम ठेवायचे आणि प्रयत्न करत राहायचे.जर सतत प्रयत्न करत गेले तर एक दिवस यश नक्कीच मिळणार कारण ज्यावेळी सर्व पर्याय संपुष्टात येतात त्यावेळी उरते ती म्हणजे फक्त आणि फक्त आशा.

मन छोटं करून घेण्याचे काही कारण नाही, थोडा संयम ठेवायचा आणि निर्भिडपणे आयुष्याशी झुंज देत राहायचे.म्हणतात ना, "टाकिचे घाव सोशल्याशिवाय दगडाला पण देवपण येत नाही" अगदी असंच आहे आपलं आयुष्य सुख दुःखानी आणि अडचणीनी भरलेलं. अडचणींमुळे आपल्या यशाच्या मार्गात कधीच अडथळे निर्माण होत नाही निघतात ती म्हणजे पर्याय आणि सुयोग मार्ग .


Rate this content
Log in