उन्नती - प्रवास स्वप्नपूर्तीचा
उन्नती - प्रवास स्वप्नपूर्तीचा


" Hello उन्नती...मी काय म्हणत होते काव्यवाचनस्पर्धा आयोजित केलीये आमच्या ग्रुपने तू कर ना participate त्यात...खूप छान लिहितेस तू अगं...म्हणून तुला फोन केला..." उन्नतीची मानलेली मामी अर्चना तिला बोलताना म्हणाली...पण उन्नतीने उदास होत उत्तर दिलं , " नाही नको मामी...Sorry पण मला नाही जमणार स्पर्धेत भाग घ्यायला..." मामीला काही कळलचं नाही ती अशी नाही का म्हणतेय...ती म्हणाली , " अगं नाही का म्हणतेय...? किती छान लिहितेस तू...! आणि हे बघ तुलाही खूप मजा येईल आणि आत्मविश्वासही वाढेल तुझा...कर तू participate..." उन्नती घाबरत म्हणाली , " Sorry मामी , पण मी नाही काव्यवाचन करु शकत...बाबांना नाही आवडणार..."
( उन्नतीचे बाबा विश्वासराव तिच्या कवितालेखनावरुन तिच्यावर खूप चिडले होते...कारणही तसचं होतं...दहावीपर्यंत अभ्यासू आणि टॉपर असलेली उन्नती बारावीला NEET परिक्षेत यशस्वी होऊ शकली नाही...आणि तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न कधीच तुटलं होतं...आणि परत नातेवाईकही तिला जे नाही ते बोलले होते...कविता लिहिते म्हणून तिच्या संस्कारांवर आले होते...कविता लिहिणं हे संस्कारी मुलींना शोभत नाही असं त्या लोकांनी बोलून दाखवलं होतं जे तिच्या बाबांच्या मनावर कोरलं गेलं होतं...आणि उन्नतीला सक्त ताकीद भेटली होती कविता न लिहिण्याची आणि जर लिहिली तर शिक्षण बंद करण्याची...त्यामुळे उन्नती आता कुठलंही पाऊल उचलायला घाबरत होती...आता तर तिच्या आईनेही ठरवलं होतं तिला स्वयंपाक शिकवण्याचं...तिला मारझोड करुन स्वयंपाक शिकवला जात होता...जी आई मनाने इतकी प्रेमळ आणि आधार देणारी होती ती आता राग मनात धरुन तिला कामाला लावत होती...त्यामुळे उन्नतीचा कोंडमारा झाला होता...)
मामी परत म्हणाली , " अगं , बाबा कशाला रागवतील...कविता करणं ही एक कला आहे...नैसर्गिक देणगी आहे ती तुझ्याकडे...आणि आपल्या मनातलं पेनात उतरवण्यात काय चूक...? उलट बाबांना अभिमान वाटेल तुझा की तू काहीतरी चांगले गुण जोपासतेय...कलेमध्ये पारंगत आहेस...आणि कविता लिहिणं प्रत्येकालाच नाही जमत...Don't worry...बिनधास्त भाग घे...जो होगा देखा जाएगा...I am with you..." किती जरी नाही म्हणत असली तरी उन्नतीच्या मनात कविता सादर करण्याची ईच्छा झालीच...कारण कलेवर कोणाला बोट उचलू देणार्यांमधली ती मुळीच नव्हती...तिने भाग घ्यायचं ठरवलं तेही नातेवाईकांच्या उर्फ विरोधकांच्या नाकावर टिचून...तिने मामीला नाव नोंदवायला सांगितलं स्पर्धेसाठी...आणि स्पर्धेची तयारी सुरु केली लपूनछपून...
उन्नती पहिल्यांदाच घरच्यांना न कळवता कोणत्यातरी स्पर्धेत भाग घेत होती...खोटं बोलणं आणि लपवणं तिला कधीच जमलं नाही पण म्हणतात ना जरं खोटं बोलल्याने कोणाचंतरी भलं होणारं असेल तर खोटं बोलण्यात काही गैर नाही...तिने कविता लिहायला सुरुवात केली...कवितेमध्ये शब्द एकमेकांशी खेळू लागले...ते आपापली जागा घेत होते...काही सुंदर शब्द कवितेला सुंदर बनवत होते...ती यमक जुळवत लिहित होती...दोन वर्षांनंतर तिने पहिल्यांदाच लिहायला घेतलं होतं...काही क्षणांतच कविता तयार झाली...पण ती चांगली जमलीये की नाही हेच तिला कळेना...तिने तिच्या एका मित्राला ( सुशांत नाव त्याचं...) ती कविता पाठवली...त्याने ती वाचली...तिच्या मनात धाकधूक सुरु होती जमली असेल की नाही कविता...पण समोरुन आलेला रिप्लाय बघून तिच्या चेहर्यावरचे रंगच बदलले..." Awesome...Superb...काय लिहिलसं यार...!अप्रतिम..." तिला मेसेज बघून विश्वास बसलाच नाही...तिने त्याला विचारलं , " सुशांत , मस्करी करतोय का माझी...?" तो म्हणाला , " नाही...मुळीच नाही...कसलं भारी लिहिलसं यार...I liked it...तू इतकी छान कविता लिहितेस हे अकरावी - बारावीलाच का नाही सांगितलसं...?" उन्नती म्हणाली , " अरे बाबा , NEET ची तयारी करायची होती तेव्हा...इकडे कुठे लक्ष होतं माझं...?" सुशांत म्हणाला , " बरयं...आता यानंतर मला पाठवत जा अशा कविता...मला आवडतील वाचायला..." उन्नतीला त्याचं बोलणं ऐकून खूप छान वाटलं...तिचा हुरूप वाढला...मनामध्ये आनंदाने उकळ्या फुटू लागल्या...तिने मनाशीचं ठरवलं स्पर्धेत तीच कविता सादर करायची...
स्पर्धेच्या दिवशी आईला कसंबसं convince केलं तिने...आई खूप घाबरलेली होती...कारण बाबांचा राग खूप भयंकर असायचा...ते काय करतील याचा भरोसा नसायचा...तरीही आईने हिंमत करुन तिला पाठवलं...स्पर्धेच्या ठिकाणी गेल्यावर तिला थोडी भीती वाटत होती...कारण तिथे मोठमोठे कवी आलेले होते...त्यांच्यासमोर टिकाव लागणं कठीण होतं...तिचं नाव घेतलं तशी ती घाबरली पण तिने आत्मविश्वासाने काव्यवाचनाला सुरुवात केली...
तुझी माझी मैत्री अतूट आणि खास होती...😍
निखळ अशा मनासाठी आनंदाची रास ☺होती...
मैत्रीच्या या नात्याला प्रेमाचीही 💝जाेड होती...
एकमेकांना बोललेल्या प्रत्येक शब्दात खोड😜 होती...
भांडण किती केले जरी भावनांना किंमत😀 होती...
काही चूक झाली तर एकमेकांना रागावण्याची 😠हिंमत होती...
विश्वासाला तडा न जाऊ देणारी आपली मैत्री 😇होती...
नजर लागेल मैत्रीला कुणास खात्री होती...
एक दिवस अचानक तू मला बोललाच नाही...
विचार केला मी या अबोल्यामध्ये आहे का तथ्य काही...
दिवसांमागून दिवस उडत गेले...
अन् आपल्या मैत्रीलाही जणू तडे पडत गेले...
मनाला विचारते मी मैत्री तोडावी की नाही...
आणि तू पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही...
भीती वाटते मला आधीसारखी होईल का आपली मैत्री😬...
आमची मैत्री खूप भारी अशी देऊ शकेल का मी खात्री😎...
कविता सादर होताच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या...उत्कृष्ट कवींना पारितोषिक देण्यात आले...आणि सहभागी कविंना प्रमाणपत्र...मामींनी आज उन्नतीचं भरभरुन कौतुक केलं...आज उन्नती खूप खूश झाली...तिचा आत्मविश्वास वाढीस लागला...मामींनी उन्नतीच्या बाबांना फोन केला...
मामी - नमस्कार भाऊजी...अभिनंदन...
बाबा - धन्यवाद...पण कशासाठी...?
मामी - उन्नतीने किती सुंदर कविता सादर केली आज स्पर्धेमध्ये...Certificate पण भेटलयं तिला...
बाबा - अरे वा...! पण मला सांगितलं नाही तिने काही...
मामी - घाबरत होती ती जरा...मीच तिला भाग घ्यायला सांगितला होता...खरचं खूप हुशार आहे हं तुमची मुलगी...अभिमान वाटतो मला तिचा...
बाबा - धन्यवाद...!
बाबांनी फोन ठेवला...आज ते चिडले नाही कारण त्यांना त्यांची चूक लक्षात आली होती...घरी गेल्यावर त्यांनी अभिनंदन पण नाही केलं आणि ओरडले पण नाही...पण त्यांच्या चेहर्यावरच्या हावभावांवरुन कळलं होतं की ते चिडले नाही आणि त्यांना कौतुक वाटलं त्यांच्या लेकीचं...त्यामुळे घरातले सगळे खूश झाले...उन्नतीनेही ठरवलं कविता लिहणं सोडायचं नाही अजून लिहित राहायचं , प्रगती करायची आणि लोकांच्या नाकावर टिचून त्यांना यशस्वी होऊन दाखवायचं...तिच्या मानलेल्या मामींनी तिला सपोर्ट केला हेच तिच्यासाठी खूप होतं...नातेवाईकांपेक्षाही मार्गदर्शनाची भूमिका अर्चना मामींनी छान पार पाडली...त्यामुळे उन्नतीने तिचं ऐकायचं ठरवलं...