The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

rakshanda kunghadkar

Others

2  

rakshanda kunghadkar

Others

लॉकडाऊन - एक सुवर्णसंधी

लॉकडाऊन - एक सुवर्णसंधी

3 mins
295


 लॉकडाऊन...!! लॉकडाऊन...!! आणि फक्त लॉकडाऊन...!! दुसरा कोणता विषयच नाही हल्ली बोलायला...कोरोना आल्यापासून ना सगळं जीवनमान बदललयं...सकाळी उठा, कामं करा, जेवण आटपा, झोपा, उठून बातम्या बघा, नवीन काहीतरी पदार्थ बनवा, खा आणि परत झोपा...अशीच दिनचर्या झालीये सगळ्यांची...काय करावं सुचत नाही... मग चिडचिड, वाद आणि बरचं काही...पण गंमत अनुभवलीये का कोणी...?


बघा तर मग...सकाळी बाबांना मॉर्निंग वॉकला जायची सवय पडलेली...मग काय मुलं झोपलेली बघून बाबांचा सकाळी सकाळी आवाज येतो, "उठा रे मुलांनो पटापट... सुसरासारखे झोपून राहतात... सगळ्या घाण सवयी लावून घेतल्या..." बस बाबांच्या या आवाजाला किरकिर समजून मुलं कसेबसे उठतात... किती जरी कंटाळा आला तरी तयार व्हायचं आणि जेवण करायचं आणि मग काय आईबाबांचे वाद बघत बसायचे... बाबा म्हणतात, "ये टरबूज काप बरं थोडसं...थंड वाटेल जरा..." मग मोठ्या आवाजात आई म्हणते, "काय एकावर एक खात राहतात...नुसती धावपळ होतेय या कोरोनामुळे..." या सगळ्या गोंधळामध्ये ना मुलांना फोन हाती घेता येत ना भावंडांसोबत खेळता येत...काय अवस्था झालीये...घर आलं म्हणजे भांड्याला भांडं लागणारच...पण मनात वितार येतो की एवढा गोंगाट कशासाठी...!! जरा धिंगाणा करा...मस्ती करा...

        

कोरोना इफेक्टमुळे सगळे घरीच...बाहेर जाण्याची सवय असल्याने घरात येतो कंटाळा...मग काय आतातर सुट्टी असल्यामुळे मुलं घरीच...त्यामुळे आईबाबांना येतं टेन्शन ते पोरांच्या अभ्यासाचं...मग काय रोजचे बोलणे...अभ्यासावरुन...मग मुलांना वाटतं आपलं कॉलेजच बरं...मग बोरिंग वाटणार्या कॉलेजची येते आठवण...हे सगळं अनुभवताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीये का...?

        

 आपल्या आयुष्यात प्रत्येकाचं काही ना काही महत्त्व असतं हे कळतं...एकाच व्यक्तीसोबत आयुष्य काढणं खूप रटाळवाणं होऊन जातं...मग ते मित्र असो की नातेवाईक...जे लोक रोज बाहेर जातात, मित्रमंडळींसोबत असतात त्यांना वाटतं आपण कुटुंबासोबत वेळ घालवावा पण आता त्यांनाच असं वाटू लागलयं की घरात किती बोर होतं बाहेर जायला हवं...म्हणजे अप्रत्यक्षपणे आपण दोन्ही बाजूंनी जोडले गेले आहोत...घरच्यांसोबत सध्या वेळ घालवतोय पण तेवढीच मित्रमंडळींची पण आठवण येतेच ना...!! त्यामुळे रोज काहीतरी नवीन पदार्थ बनवून आपण त्याचे फोटो मित्रमंडळींना पाठवतो आणि रिप्लायची वाट बघत बसतो... पण हे कनेक्शन खूप भारी आहे... दुराव्यामुळे माणसं जोडली जातात शेवटी हे खरचं...दूर असल्यावर माणसं जोडली जातात आणि जास्त वेळ जवळ असली की दुरावली जातात...त्यामुळे या सगळ्यांचा मेळ कसा साधायचा हे जाणून घेण्याची संधी आपल्याला भेटतेय..."रामायण", "महाभारत" बघण्याच्या निमित्ताने सगळं कुटुंब एकत्र येऊ लागलं...विचारांची देवाण घेवाण करु लागलं...शिवाय वाद पण होतात अगदी मारामारीपर्यंत...पण अचानक कोणीतरी विनोद करतं आणि हास्यकल्लोळ माजवतं...सगळं कसं जमून आलयं...


        एवढचं नाही तर आपल्यातला कलाकार या निमित्ताने जागा होऊ लागला...आपला छंद जोपासण्याची वेगळीच संधी मिळाली...नाव घेण्याचा काहीतरी वेगळाच खेळ लोक खेळताय...धमाल करताय...लॉकडाऊनमध्ये कोणी आचारी तर कोणी तत्त्वज्ञानी झालयं...त्यामुळे बऱ्याच संधी मिळताय हे सत्य नाकारता येऊ शकत नाही...या संधीचा पुरेपुर फायदा उचला...


        लॉकडाऊनमुळे सगळे जवळ येताय...बाँडींग वाढतयं...नातं दृढ होतंय...दुरावलेली मनं पुन्हा जुळताय...छंद जोपासायला मिळताय...आपुलकी निर्माण होतेय...स्वार्थी माणूस आता कुटुंबासोबत राहू लागला...आपुलकीने वागू लागला...काही घटना ऐकल्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या ते बघून वाटतंय की हे मनुष्य तर नाहीच...त्यांच्यापेक्षा प्राणी बरे...असो...दे आर फ्रॉम डिफरन्ट प्लॅनेट...पण आपण मात्र संधीचा पुरेपुर फायदा उचला...पैसा काय नंतर कमावता येईल आता संधी भेटलीये ती माणसं कमावण्याची...गरजूंना शक्य झाल्यास मदत करा...संधी पुन्हा मिळेल की नाही खात्री नाही... घरीच राहा...सुरक्षित राहा...काळजी घ्या...या लढाईत कोरोनाला हरवू या...


Rate this content
Log in