STORYMIRROR

Vanita Bhogil

Tragedy

4  

Vanita Bhogil

Tragedy

उन्हाळी लाट

उन्हाळी लाट

6 mins
184

शिरपा... आर ए शिरपा....

 जी मालकीनबाई!!

    आर जी मालकीनबाई म्हणून काय ईचारतोस?

  पोर उठायची यळ झाली, कधीच्यांन शेतावर जायचा, आमराईत लय पाड पडलं असत्याल ,जाऊन लगोलग घेऊन ये बर..

       पोर उठली की तुझ्या मागण समदी निघतील हिरीवर पवाय....

  बर मालकीनबाई....

     आजीच्या या खणखणीत आवाजानं माझी झोप मोड झाली..

 उशाशी ठेवलेलं अलार्म घडयाळ पाहिलं तर पहाटेच्या पाच वाजलेल्या...

  ..  डोळे चोळत उठून बसलो, तेवढ्यात आजी वर आली..

 वर म्हणजे माळवदावर..माळवद म्हणजे आमची पूर्वीची गच्ची असायची ,

मातीच्या घरावर मजबूत बांधकामाच मातीतच प्लास्टर असायचं..

   उन्हाळी सुट्टी लागली की आम्ही आजीकडे असायचो, मग काय मजाच मजा असायची,विहिरीवर पोहन काय आणि पाडाचे आंबे ,,,अगदी मनमुराद सगळच...

  खाण ही मनमुराद आणि सगळ्यांच प्रेमही मनमुराद मिळे,त्या प्रेमाला दिखाऊपणा कसलाच नसे...

   ... आजी शेजारीच दामू काका राहायचे,त्यांची हर्षदा मुलगी जेमतेम आम्ही सारखेच वयाने..

..मी गेलो की ती आमच्याकडेच असायची,, म्हणजे मी माझी भावंड आणि हर्षदा सगळे असे राहायचो जणू एकाच कुटुंबातले असल्यासारखे...

   हे दर वर्षी च ठरलेलं असे...

  दिवस कसे भराभर जात होते,दिवसागणिक आम्हीही मोठे होत चाललेलो...

 मला आठवत माझा दहावीचा निकाल लागला तेव्हा मी आजीकडेच होतो...

  माझा निकाल बाबा शाळेत जाऊन बघून आले, 

    आजीच्या गावात बाबूच्या दुकानात एकच एसटीडी फोन होता,त्या फोन वर बाबांनी फोन करून मी पास झाल्याचं बाबू कडेच सांगून निरोप दे म्हणून सांगितलं...

  बाबू धावतच घरी आला, मी दहावी पास झालो म्हणून सांगू लागला,

       आजीला अभ्यासातील काही कळत नव्हतं पण मेट्रिक पास म्हणजे युद्ध जिंकल्यासारखं त्या वेळेस वाटे,, 

  आजीला तेवढंच समजलं,आजीने डब्यातून मूठभर साखर आणून माझ्या तोंडात घातली.....

    मी धावतच हर्षदाकडे गेलो,

ती ही दहावीला च होती,त्यामुळे तिला किती मार्क पडले याची मलाही उत्सुकता होती आणि मी पास झाल्याचं सांगायचं पण होतच....

.. 


 मला बघून तिने चक्क मला मिठी मारली, राजू मी पास झाले माझा तालुक्यात पहिला नंबर आला....

    तिने मारलेल्या मिठीत वेगळ काही जाणवले ,जे आजपर्यंत कधीच जाणवले नव्हते,...

    काही क्षणात ती बाजूला झाली, आणि म्हणाली तू पास झालास न?? मी पण काय विचारते तू पासच होणार होतास, हुशार आहेस तू .....

... 

 मी म्हणालो !!

  हो मी पण पास झालो...

  तुला तेच सांगायला आलो होतो ,पण......

   मग तिच्या कुठे लक्षात आलं की मिठी मारल्याच...

..

लगेच ती म्हणाली सॉरी ह राजू, खूप आनंदी होते ,तू माझा चांगला मित्र आहेस न म्हणून .....

 पुढे काहीच न बोलता खाली मान घालून आत निघून गेली....

..

मी तिथेच अजून उभा होतो...

  मला आज एकदम मी मोठा झालो अस काहीतरी वाटायला लागल..

..

     त्या वर्षी मला जास्त दिवस नाही राहता आलं, कॉलेज ऍडमिशन साठी लवकर परत फिरावं लागलं..

..

   कॉलेज चालू झाली ,,मामाकडून समजलं तिनेही सायन्स घेतले म्हणून...

 तिला डॉक्टर बनायचं होत..

    बारावी पर्यंत एकदाच आजीकडे जाता आलं...

पण त्या भेटीत तो अल्लड पणा मुळीच नव्हता, आम्ही खूप समजदार असल्यासारखं वागत होतो..

..

  असच एक दिवस आम्ही विहिरीवर गेलो, 

    पण आता सोबत पोहण्याचा धाडस झालं नाही...

  दोघेही विहिरीच्या काठावर बसून गप्पा मारत होतो..

..

मला तिला काहीतरी सांगायचं होत.

मी म्हणालो हर्षु मला काहीतरी सांगायचंय ,, तेवढ्यात ती पण म्हणाली मलापण काहीतरी सांगायचय.......

....  पण तू बोल आधी,,,

 मी म्हणालो नाही तू अगोदर बोल नंतर मी ...

   बर म्हणून ती म्हणाली...

  राजू तू माझा अगदी जवळचा मित्र आहेस,,

  तीच ते ऐकून मला माझ्या मनातील जे आहे ते तिलाही वाटत असावे असा वाटलं,, 

     हो मग.... मी आहे तुझा खास मित्र आणि पुढेही कायमचा राहील...

  बोल काय बोलणार आहेस तू?

     राजू...

 अण्णांनी माझ्या लग्नासाठी स्थळ आणलं आहे,

 मला तिच्या या एका वाक्यावर एवढं दूर नेहुन ठेवलं होतं...

    ती पुढे म्हणाली...

 मुलगा डॉक्टर आहे अमेरिकेला,, 

  घरची परिस्थिती उत्तम आहे.....

  मी म्हणालो मग,,तुझं काय मत आहे?

  तर ती म्हणाली, अण्णा म्हणतात चांगलं स्थळ हातातून का जाऊ द्यायचं??

  अग पण तुला तर पुढे खूप शिकून डॉक्टर बनायचं आहे न??

    हो रे,, पण अण्णा म्हणाले मुलांकडचे पुढे शिकवू म्हणत आहेत...

   हर्षु तुझ स्वतःच मत काय आहे??

मला अण्णांनी मुलाचा फोटो दाखवला ,तसा बरा वाटला रे...

  ..

  ए सांग न राजू मी काय करायला हवं??

    यावर मी काय बोलू मला काहीच सुचत नव्हते..

   तिला मी म्हणालो तुझ सुख ज्यात असेल तो निर्णय घे..

   आणि मी उठून निघालो,तेवढ्यात ती म्हणाली राजू मुलगा मला पसंत आहे ......

   माझ्या मनाचा मलाच ठाव लागत नव्हता,मी तिला आज माझं प्रेम व्यक्त करून सांगणार होतो,पण नशिबात अजून काही दुसरंच होत...

    मी मागे न वळता तिला उत्तर दिलं,, तू खुश आहेस न ? मग झालं तर...

  मागे न बघता तसाच पुढे निघालो...

  त्यानंतर आजीकडे गेलोच नाही...


 मला मेडिकल ला स्कॉलरशिप मिळाली आणि बंगलोरला नंबर लागला...

.. कॉलेज चालू झाली,

  मी माझ्या अभ्यासात व्यस्त झालो,झालो म्हणण्यापेक्षा होता होईल तेवढं स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करू लागलो....

     मनात विचार येई , बरच झाल मी तिच्याकडे व्यक्त नाही झालो ते...

 मी तिची पसंती नव्हतोच ,,पण यात मैत्रीत गैरसमज झाला असता...

    तिच्या लग्नाचं आमंत्रण आलं पण माझ्यात हिम्मत नव्हती तिच्या समोर जायची.....

.. 

ती लग्न होऊन अमेरिकेत गेल्याच समजलं...

दुसऱ्या वर्षाची परीक्षा देऊन गावाकडे आलो, आईच्या आग्रहाखातर आजीला भेटायला गेलो...

आता आजीही खूप थकली होती...

..

    ज्या माळवदावर आमचं सोबत बालपण गेल ते आता भकास लागत होत....

      दामू काकांकडे हर्षदाची चौकशी केली, ते म्हणाले जास्त नाही कधीमधी करते फोन, खुश आहे म्हणून सांगते....

..

 त्यांचं ते ऐकून तिचा निर्णय योग्य होता अस मला त्या क्षणी वाटल..

..

 त्यानंतर कोणत्याच उन्हाळी सुट्टीला मी आजीच्या गावी गेलो नाही , अस वाटे की मी आयुष्यातील बरच काही हरवल होत म्हणून जाण टाळत असे....

  आजी आजारी पडली, आईचा फोन आला ....

   शेवटच्या वर्षाची परीक्षा जवळ आली होती...

  येता येत नव्हतं...

  परीक्षा झाल्या तस मी आजीच्या गावची वाट धरली, 

     आजी जास्त आजारी होती...

.. पाच वर्षांच्या शिक्षणाचा अनुभव थोडाफार होता,गेलो त्याच दिवशी 

आजीची मी घरच्या घरीच ट्रीटमेंट चालू केली.....

   संध्याकाळी सगळे अंगणात बसलो होतोत, तेवढ्यात जोरात किंचाळण्याचा आवाज आला....

  मी आणि मामा धावत बाहेर अलोत,

   आवाज शेजारून येत होता...

मामाकडे पाहून मी विचारले कोण रे मामा??

      मामा म्हणाला दामू काकांची हर्षु......

...   काय झालं हे मी विचारायच सोडून माझे पाय दामुकाकाच्या घराकडे धावत सुटले...

......  

 समोरच दृश्य पाहून मला धक्काच बसला...

  हर्षदा मोठ्याने किंचाळत होती...

  केस मोकळे ,,  विचित्र परिस्थिती होती...

..मी तिच्या जवळ गेलो,मला पाहून ती अजूनच किंचाळू लागली..

   काका मला म्हणू लागले राजू तू बघ न हिला,,तू डॉक्टर आहेस न??

 मग बघ न आपल्या हर्षुला....

..

 मी हो म्हणून, हर्षुचा हात हातात घेतला,,, पण ती घाबरून जास्तच रडत होती...

मी धावत घरी आलो, मेडिसिन बॉक्स सोबत घेऊन गेलो, एक इंजक्शन दिल, मी ही नवीन असल्यामुळे नेमकं काय ते कळत नव्हतं, तिला गुंगी आली तिला मी आणि काकांनी उचलून पलंगावर झोपवली.....

  ..

मी काकांसोबत बाहेर आलो,,,

  दामू काका माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागले...

  मी त्यांना पाणी दिल थोडं शांत झाल्यावर मी विचारलं,,, 

हर्षदा अमेरिकेत होती मग हे अस ????

ते सांगू लागले !!!

हो स्थळ चांगलं म्हणून मीच आग्रह केला, तिला नव्हतं लग्न करायचं...

  तिला खूप शिकायचं होत...

..  माझ्यामुळे सगळ झालं,

   मी म्हणालो ....पण मग अस??

   लग्न चांगलं थाटामाटात लावून दिल...

....

लग्न झाल्यावर हर्षुला ती लोक अमेरिकेत घेऊन गेले...

   काही महिन्यानंतर हर्षदला समजलं की मुलाला नको ती व्यसन आहेत...

     इज्जती पोटी तिने आम्हाला काहीही कधीच सांगितल नाही,,, काही महिन्यानंतर त्याचे वेगळेच रंग दिसू लागले, तो कसा आहे हे त्याच्या घरच्याला माहीत होत....

..  माझ्या हर्षुला पुढे शिकवू म्हणाले ,डॉक्टर करू म्हणाले पण कसल काय.....

   पोरीच्या आयुष्यच वाटोळं केलं मी माझ्या हाताने, अस म्हणून काका परत रडू लागले....

..   त्यांना कसबस समजावलं,,,

   मी न राहवून पुन्हा विचारलं, हर्षदाची अशी अवस्था???


.. राजू तुला काय सांगायचं, त्या मुलाने अगोदरच तिकडच्या मुलीशी लग्न केल होत....

  आपल्याला फसवल,,,का तर मुलाच्या वडिलांची इच्छा होती सून भारतीय हवी म्हणून....

        राहिला पहिल्या लग्नाचा विषय तर त्यांचं अस म्हणणं होतं की इकडे बाहेरच्या देशात सगळ चालत....

     हे सगळ हर्षदला समजले तेव्हा दोन वर्षे उलटून गेली होती,,, 

घरातील कामवाली म्हणून तिचा वापर होत होता,....


  ती प्रत्येक वेळेस हक्क दाखवण्याचा प्रयत्न करत होती पण त्या लोकांनी तीच काहीच चालू दिल नाही...

       तिथेच एका आपल्या भारतीय मुलासोबत हर्षुची ओळख झाली...

   तो हिला प्रत्येक वेळेस धीर द्यायचा, 

  एक दिवस तो काही मित्राना घेऊन घरी आला, 

   ,, त्यांच्यासमोर हर्षदाला खूप मारहाण केली, 

   तेव्हा कुठे हर्षुने आम्हाला हे सगळं फोन करून कळवले,,,

    मी तेव्हाच निर्णय घ्यायला हवा होता, तेव्हा मी म्हणालो , बाहेरच्या लोकांसाठी हे सगळ चालत तू नको काळजी करू , सुधारतील जावई बापू....

  मला कुठे माहीत होतं पुढे अस काही होईल म्हणून...

     पुढे त्यांच मारणं त्रास देण जास्तच वाढल.....

.  आणि शेवटी तिला चारित्र्यहीन ठरवून सगळे मोकळे झाले, हर्षदाला हा आघात सहन झाला नाही,आणि तीच मानसिक संतुलन बिघडत गेलं....

    त्यांनी तिला वेडी ठरवून माझ्या दारात आणून सोडून निघून गेले.....

...  मी काय ऐकत होतो ते ही मी जिच्यावर प्रेम करत होतो तिच्या बाबतीत हे सगळं घडाव आणि मला काहीच कळू नये....

  माझा माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता....

  स्वतःला कसबस सावरून उभा राहिलो....

   परत आत जाऊन हर्षु झोपली होती तिच्या जवळ उभा राहिलो, तिचा निरागस चेहरा,,, कस सोसल असेल हिने सगळं,, डोळे भरून आले, तेव्हा वाटलं शेवटची उन्हाळी सुट्टी तीच ऐकून न घेता मी आधी बोललो असतो तर या आयुष्याच्या अग्नीझळा तिला सोसाव्या लागल्या नसत्या...

 त्याक्षणी विचार केला आता वेळ हातातून सोडायची नाही...

..

  काकाजवळ जाऊन बसलो,,,

 काका मी काय म्हणतो ,मी हर्षदाला शहरात घेऊन जातो...

  आपण मोठ्या स्पेशालिस्ट ला दाखवून घेऊ....

     त्यावर काका म्हणाले आता फक्त पोरीत जीव गुंतला आहे, देवाला शेवटची इच्छा की पोरीला चांगली कर....   

 मी म्हणालो काका काही काळजी करू नका ,आपण हर्षु ला नीट करू...

..

 त्या घटनेला पाच वर्षे झालीत...

आता कुठे हर्षु मला ओळखायला लागली, 

        दामू काकांसारखीच माझिपन शेवटची इच्छा की उर्वरित आयुष्य हर्षदा सोबत काढायचं आहे मला....

  पुन्हा तिला उन्हाळी लाटांचा स्पर्श होता कामा नये,, श्रावणातली हिरवळ बनून राहायच आहे तिच्या आयुष्यात.............


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy