Pallavi Kulkarni Sukalikar

Romance

3.0  

Pallavi Kulkarni Sukalikar

Romance

तू….तूच ती!!

तू….तूच ती!!

16 mins
10.7K


दिवस मावळतीकडे झुकला होता. सूर्याची किरणे तिच्या डेस्क वर खेळत होती. सहसा IT ऑफिस मध्ये सूर्य किरणांच दर्शन दुर्मिळ असतं. पण ती ह्या बाबतीत भाग्यवान ठरली होती. Live wallpaper प्रमाणे तिच्या डेस्क जवळच्या काचेच्या भिंतीतून ती निसर्ग पाहू शकायची आणि तिले हे खूप आवडायचं. पण आज तिचं ह्या कशाकडेच लक्ष नव्हतं. एक महत्वाची टास्क पूर्ण करायच्या मागे लागली होती ती. क्लायंट ला गुंडाळता येणं तिच्यासाठी सहज शक्य असला तरी ती प्रामाणिक होती. झपाटल्यासारखा तिने काम पूर्ण केला आणि कोड चेक इन केलं. आता अंधार पडला होता आणि एसी चा गारवा जास्तच जाणवू लागला होता. मात्र क्लायंट कॉल असल्यामुळे तिला थांबावे लागणार होते. ब्रेक घ्यावा म्हणून ती उठली. गरमा गरम वाफाळत्या कॉफीचा मग घेऊन तिने कॅफेटेरियात एक हवेशीर जागा निवडली. वाऱ्याची मंद झुळूक तिच्या केसांना हलकेच उडवून जात होती. आज नेमकी तिची टीम नव्हती नाहीतर तिने हा कॉफी टाइम मस्त एन्जॉय केला असता. एकटी असल्यामुळे तिच्या डोक्यात विचारांची चक्रे फिरायला लागली…

(“का आले मी इथे? सखोल ज्ञान मिळेल, शिकायला मिळेलया आणि मुख्य म्हणजे दादा म्हणाला म्हणून तुलनेने छोटी कंपनी जॉईन केली. पण इथे खरंच तसं होत आहे का? नशीब माझं काम नवीन टेकनॉलॉजि मध्ये आहे नाहीतर कठीण झालं असतं माझं. लोकं किती टाळाटाळ करतात. मी तर मन लावून काम करते तरीही सगळ्यांना बॉस कडून मिळणाऱ्या वागणुकीत फारसा फरक दिसत नाही. अति महत्वाचा काम असेल कि लगेच ह्यांना मी दिसते.आज हि तसाच झालं. मी इथे थांबली आणि सगळी मंडळी घरी पळाली.असू देत.मी नाही विचार करत आता. आपण भलं,आपला काम भलं”.)

कॉफी संपवून ती मीटिंग रूम मध्ये आली. कॉल घेतला आणि घरी जायला निघाली, तोच तिने हाक ऐकली. वळून पाहते तर तो. हो तोच.

(“अरे देवा, हे काय. हा कशाला भेटला आता. आदित्यच आहे हा. इतका हँडसम का आहे हा पण ? कोणतीही मुलगी फिदा होईल ह्याच्यावर. बरं, देवाने नुसतंच रूप दिलंय. अकलेचा पत्ता नाही. रिकामटेकडा नुसता.. फुशारकी करत फिरत असतो. थोडा स्मार्ट असता ना मी नक्कीच ह्याला घास टाकली असती.”)

तिच्या विचारांचं तिलाच हसू आलं.

(“शी.. घास काय..माझं मराठी बिघडत चाललंय हल्ली “)

आदित्य :हाय श्रु!!!

श्रुती: अरे तू थांबला आहेस का अजून. आणि प्लीझ मला श्रु नको म्हणूस रे.. श्रुती नाव आहे माझं..

आदित्य : माहित आहे गं ..पण मी प्रेमाने म्हणतो तसं..

श्रुती: काय, प्रेमाने ???

आदित्य : ही ही.. मग काय..सुंदर मुलींशी असंच बोलायचं असतं.

श्रुती:बास आता flirting.आज दुसरी कुणी भेटली नाही वाटतं.

आदित्य : कसं गं तुला सगळंच कळतं ..तुझ्यासोबत timepass ही करता येत नाही …by the way ..एवढा वेळ काय करतेस इथे?

श्रुती: अरे क्लायंट कॉल होता..sprint संपली ना काल.. खूप improvements दिल्यात त्याने माझ्या mudule ला आणि project ला पण. बरेच inputs मिळाले बघ .

आदित्य : तू का एवढी serious होतेस.. बघून घेऊ..क्लायंट ला कुठे कळतंय technically कसं असतं सगळं ते.. चिल मार तू.. मोठे लोक आहेत टीम मध्ये ते बघून घेतील. त्यांना काळजी नाही आणि तुझं काय

श्रुती: अरे पण..जाऊ दे.. आपली विचारशैली वेगळी आहे (ह्याला काय कळणार प्रामाणिकपणा, नुसत्या वशिल्याने काम होतात ह्याची, गोडबोल्या नुसता ) , anyways , मी निघते. उशीर झालाय. bye

आदित्य : drop करू का तुला ? आणि मला भूकही लागलीये खाऊ मस्त बाहेर काहीतरी आपण. नाहीतरी तुला कोण विचारणार असं डिनरसाठी. scholar मुली असतात ना कॉलेज मध्ये , एकदम टिपिकल तशी आहेस तू …

श्रुती: नो thanks.. कंपनी ची कॅब असते आपल्या .. जाते मी कॅब ने .. (“आला मोठा मला डिनर ला नेणारा, वरणभात मिळतो का त्यात हॉटेलमध्ये, गरम गरम, त्यावर तुपाची धार आणि चटकदार लोणचं , आहा !!, पटकन घरी जाते आणि वरणभात चापते, ह्याला नाही कळणार त्यातली गम्मत, आईला सांगायला हवं निघाले ते, काळजी करत असेल ती ” )

आदित्य: काय ग..कुठे हरवलीस.. माझ्याबरोबर येण्याच्या विचाराने तुझ्या मनात लड्डू फुटत असतील नाही?

श्रुती: (“काहीही काय.. ह्याच मराठी ना , कान धरून सुधारायला हवं, लड्डू म्हणे “).. माझा चॉईस साधारणपणे बरा आहे आणि तो तू नाहीस ..सो chill.. आणि बाय.. (“इथे भेटलास वर भेटू नकोस “)

दुसऱ्या दिवशी श्रुती नेहमीप्रमाणे ऑफिस ला आली. आदित्य एका सहकाऱ्याला चहा पिण्यासाठी म्हणून बाहेर घेऊन गेला होता आणि नेमकी त्यावर dependancy असल्यामुळे श्रुतीचं काम अडलं होतं. ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. श्रुती चिडली. आदित्य आल्यावर तिने दोघांनाही जोरदार झापलं.

चांगलीच वादावादी झाली दोघांची.. खूप जणांना वाटलं श्रुती ने एवढा overreact व्हायला नको होता कारण आदित्य तास सगळ्याशी मिळून मिसळून वागायचा. श्रुती तेव्हढ्यास तेवढं वागणारी होती त्यामुळे तिच्या वागण्यामागे काय कारणं आहेत ते समजून घेण्याच्या भानगडीत कुणी पडलं नाही. एक मात्र झालं, सगळे श्रुतीशी फटकून वागू लागले. तिनेही कामापुरतेच बोलायचं असाच पवित्र आधीपासून घेतला असल्यामुळे विशेष फरक पडू दिला नाही. मात्र कधी कधी तिला फार एकटं वाटल्या लागलं. आदित्य ने एकदोन वेळा तिच्याशी बोलण्याचा, तिला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. पण ती बधली नाही. आदित्यलाहि वाटायचं, आपण जास्त काम न करताही आपला मस्त चालू आहे आणि ही बया एवढा काम करते, कंपनी ला प्रॉफिट मिळवून देते तरी एकटी पडलीये. कधी कधी हा अभिमान त्याच्या बोलण्यातून डोकवायचा त्यामुळे आधीच अबोल असणारी श्रुती जास्त कोणाशी बोलेनाशी झाली.मुळात ती आदित्य चा द्वेष करायला लागली आणि तो तिच्यात डोक्यात गेल्यामुळे त्याच्याशी बोलणाऱ्या सगळ्यांनाच ती टाळू लागली. हे चुकीचा आहे हे समजून सुद्धा तीच हेच चालू होतं. आदित्यचा राग असण्याचं मूळ कारण म्हणजे त्याचा कामचोरपणा असा तिला वाटायचं आणि तिच्याही नकळत ती त्याच निरीक्षण करत असते आणि त्याच्याबद्दल मनात असणाऱ्या समजावर शिक्कामोर्तब करत असे. हे सगळं तीच routine झालं होतं . तिच्या कामाची आणि हुशारीची आता सिनिअर्स नी दखल घेतली होती.. आता ती अधिक जबाबदारीने काम करायला लागली होती. पण perosnal front वर तिला आता ऑफिस बोअर व्हायला लागलं होतं.

एके दिवशी सकाळी सकाळी श्रुती walk ला घराजवळ च्या गार्डन मध्ये होती. आणि तिचा फोन वाजला. बघते तर आदित्य.

आदित्य : श्रुती लवकरात लवकर ऑफिस ला ये आज. काहीही प्रश्न विचारू नको. पटकन आवर आणि ये. हवं तर मी पिक करतो.

श्रुती : नको मी येईन , bye

आणि तिने कॉल कट केला. ह्यावर विश्वास ठेवावा का असा विचार करतच ती घरी आली, अभावीतपणे तिने आवरलं आणि scooty घेऊन निघाली ऑफिस ला.

आदित्य चं आपण का ऐकलं असावं ह्यावर तिचंच मन तिला valid reason देत नव्हतं.

श्रुती ऑफिस ला पोचली. पार्किंग मध्ये तुरळक गाड्या होत्या. कुणीच आलं नसणार. ही थट्टा असू शकते असा विचार करत ती लिफ्ट मध्ये शिरली. ऍक्सेस कार्ड पंच करून तिच्या odc मध्ये शिरताच तिला आश्चर्याचा धक्का बसला!!!!

——————————————————

श्रुती ऑफिस ला पोचली. पार्किंग मध्ये तुरळक गाड्या होत्या. कुणीच आलं नसणार. ही थट्टा असू शकते असा विचार करत ती लिफ्ट मध्ये शिरली. ऍक्सेस कार्ड पंच करून तिच्या odc मध्ये शिरताच तिला आश्चर्याचा धक्का बसला!!!!

बाहेर कोणीच नसल्यामुळे कॉन्फरेन्स रूम चं दार उघडं होतं. श्रुतीने आत काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु केला कसलीतरी मीटिंग होती. आदित्य चा आवाज येत होता. अगदीच फॉर्मल डिस्कशन वाटत होतं. अजून कोण आहेत ते बघण्यासाठी ती हळूच किंचित डोकावली. तिच्या टीम मधली सिनियर मंडळी नव्हती कोणी. फक्त लवकर येणारी सौम्या आली होती. कोणीतरी तिला प्रोजेक्ट विषयी माहिती विचारत होते आणि फ्रेशर असलेली सौम्य बावरली होती आणि अडखळत होती. प्रश्न विचारणारे त्या क्षेत्रातले तज्ञ वाटत होते. कोण असतील ह्याचा विचार करत असतानाच तिची ट्यूब पेटली.

“अरेच्चा, हे तर अखिलेश सर आहेत, त्यांना अशा अचानक भेटी द्यायला आवडतं, त्यामुळे प्रोजेक्ट चं खरं स्टेटस समजतं अशी त्यांची धारणा आहे, असं ऐकलं होतं आणि आज त्यांना प्रत्यक्ष पाहत आहे मी. पण, हे काय !, सौम्याला फारसं माहिती नाहीये. त्यामुळे आपल्या टीम चं impression बिघडू शकतं. आपण भरपूर काम केलंय ते त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. शेवटी ते कंपनी चे Co Founder आहेत. पण आदित्यला कसं समजलं ते येणार आज. Anyways , मी जाते आत. असंही नुकतंच मी presentation तयार केलंय. तेही दाखवता येईल “.

श्रुतीने दरवाज्यावर टकटक केली. परवानगी घेऊन धीटपणे ती आत शिरली. आदित्य मिश्कीलपणे तिच्याकडे पाहत होता. त्याने तिची ओळख करून दिली होतीच . त्याच्याकडे एक कटाक्ष टाकून तिने मीटिंग चा ताबा घेतला. अखिलेश सरांना पूर्ण माहिती तर दिलीच शिवाय अजून काय करता येईल ह्याविषयीच्या नवनवीन ideas पण मांडल्या. त्यांना तीच आणि पूर्ण प्रोजेक्टचं काम खूप आवडलं , थोडक्यात सुधारणेच्या काही सूचना देऊन ते तिथून गेले. आदित्य त्यांच्या सोबत गेला.

इकडे श्रुती मात्र विचारात पडली होती. एवढ्या वेगवान घडामोडी घडल्या त्यात तिला काहीतरी वेगळं वाटत होतं.काहीतरी गडबड जाणवत होती. दिवसाची सुरुवात तर छान झाली होती. सगळ्या घटनांचा विचार करत तिने तिचा pc चालू केला. pc तर चालू झालाच आणि तिचं विचारचक्र सुद्धा!

“आदित्यचं ऐकलं हे बरं केलं मी. त्याच्यामुळेच आज मी अखिलेश सरांशी प्रत्यक्ष बोलू शकले. त्यांचं मार्गदर्शन मिळालं. अजून प्रगती करू शकेन मी आता. शिवाय काय काम करते हेही त्यांच्यापर्यंत पोचवता आल्यामुळे visibility विषयी जी शंका होती तीही मिटली. पण काय गडबड झालीये देव जाणे. पण एवढ सगळं चांगलं घडून सुद्धा काहीतरी चुकल्यासारखं वाटत आहे. नक्कीच आदित्य मुळेच अस्वस्थ वाटत आहे. पण आज चांगल्या कारणासाठी! अरे देवा, पण काय केलं मी हे आज! साधे आभार सुद्धा मानले नाहीत आदित्यचे! त्याला धन्यवाद द्यायला हवेत. पण तो जर वेडंवाकडं बोलला तर डोकं सरकेल माझं! काय करू? ह्या सौम्याचं एक बरं आहे. मला हीच वेळ सोयीची आहे असं सांगून लवकर येते आणि लवकर जाते. ठीकच आहे म्हणा असं ही पकवते ती ” तिच्या विचारांचं तिलाच हसू आलं आणि श्रुती स्वतःशीच खुदकन हसली.

सोम्या: “हे ,हाय.आज लवकर आलीस तू. पण बरं झालं आलीस ते. कसली भारी बोललीस गं मीटिंगमध्ये, एकदम हवा केलीस आपल्या प्रोजेक्टची ! आणि by the way, आदित्य छान दिसतो ना. मला माहितेय तू त्याचा विचार करत होतीस आणि हसलीस, हो ना , चोरी पकडली एका मुलीची !!!”

श्रुती: “काहीही काय अगं, मला आमच्या कॉलेज मधला एक किस्सा आठवला. म्हणून हसले. बोल ना तू ”

सोम्या: “तू आदित्य बरोबर काम करतेस ना ,आमची पण मैत्री झालीये आता. तुला एक गम्मत सांगू का ? हा आदित्य म्हणजे विचित्र वल्लीच आहे. सतत बडबड. एके दिवशी तर तुझीच स्तुती आरंभली होती राजांनी. ”

श्रुती: “स्तुती नाही निंदा असेल. आम्ही बोलत नाही माहित आहे ना तुला”

सोम्या: “अगं खरंच. विश्वास ठेव. तो असा आहे ना कि बस. सगळ्यांसोबत जमतं त्याच गुळपीठ. जवळपास सगळेच त्याला मित्र मानतात आणि तो मैत्री निभावतोही! ”

श्रुती: “पण तू हे सगळं मला का सांगत आहेस?”

सोम्या:”तुझा गैरसमज दूर व्हावा आणि तू त्याच्याशी बोलावसं म्हणून. खरं सांगते, तो वाईट नाहीये आणि तुही छान आहेस. बघतेस ना रोज, एक अदृश्य ताण असतो सगळ्यांच्या मनावर. घाबरतात सगळे तुझ्याशी बोलायला, मैत्री करायला. मला हे तुला कधीपासून सांगायचं होतं. पण संधी मिळत नव्हती. तुला नाही आवडत ना तो , ठीक आहे. पण केवळ हाय हॅल्लो पुरता तरी बोल. अशी अढी ठेवू नको गं. तो तुला तुमच्या त्या दिवशीच्या भांडणानंतर सॉरी म्हणायला आला होता. तू त्याला टाळून निघून गेलीस. हे माहित आहे का तुला? ”

श्रुती: “बरं, आता हे आदित्यपुराण बंद कर आणि माझ्याबरोबर नाश्त्याला चल. मी बघते काय करायचं ते. ”

सोम्या: “तू ऐकणार आहेस थोडीच. बघ माझं काम होतं तुला समजावण्याचं , म्हणून मी बोलले. Anyways ,खाऊया काहीतरी. पोहे छान मिळतात खाली भैयाकडे, एकदम गरम गरम!. आज माझी ट्रीट. ऐश करूया!! ”

“माणसाने जगावं तर खाण्यासाठीच असं माझा स्पष्ट मत आहे. वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खाणे आणि त्याचा आनंद घेणे ह्यालाच तर सुखी जीवन म्हणतात. कसले चटकदार पोहे केले होते भैयांनी!! खरपूस तळलेले कांदे, शेंगदाण्याची आरास, कोथिम्बिरीची बरसात, शेवेची सजावट आणि लिंबाची फोड!! वाह ! जगावे खवय्याने मनमुराद तर पुण्यातच ! भैयाजी देव तुमचं भलं करो!! ”

श्रुती नुकत्याच चापलेल्या पोह्यांच्या आठवणीत रमली होती. ती खमंग चव तिच्या जिभेवर रेंगाळत होती. आता दुपारी जेवणात काय खावं ह्याचे विचार तिच्या मनात घोळायला सुरुवात झाली होती. “foodie” लोकांचं एक बरं असतं, आयुष्यातल्या समस्त चिंता बाजूला सारून ते खाण्याची आणि चवींची स्वप्न बघत असतात. श्रुतीचा स्वभाव अगदी असाच होता आणि हो आदित्यचाही !! ह्या दोघांमध्ये असणारा हा सध्यातरी एकाच कॉमन धागा होता. आदित्य आज श्रुतींच्याच odc मध्ये बसला होता. नेमका त्याचा डेस्क तिच्या समोरच्या cubical मध्येच allot झाला होता. आदित्य आता श्रुतीच्या प्रोजेक्ट मध्ये असणार हे तिला mail द्वारे समजला. तो तिच्या प्रोजेक्ट मध्ये आला ह्याचा तिला काही प्रॉब्लेम नव्हता. पण खरी गोची पुढेच होती. अखिलेश सरांनी टीमला आदित्यचे inputs घ्यायला सांगितले होते आणि हे वाचून श्रुतीच्या अंगाचा तिळपापड झाला होता. ती नुसतीच सुन्न होऊन स्क्रीन कडे बघत बसली होती. खरे पाहता आता श्रुतीने आदित्य बरोबर संपर्क ठेवणे ही गरज बनली होती आणि त्यात काही गैर नव्हतेच. त्याने तिला नुकतीच मदत केली होती. पण आता श्रुतीचा इगो आडवा येत होता आणि तिला आता ही परिस्थिती कशी हाताळावी हे समजत नव्हते. हा प्रश्न आपोआपच सुटला. आदित्य चा बोलघेवडा स्वभाव सहज पणे सगळ्या गोष्टींवर मात करून गेला. त्याने हसत जाऊन श्रुती ला ग्रीट केला आणि कॉफी ऑफर केली. आजच सकाळी बरा अनुभव आल्यामुळे श्रुती सुद्धा हसून हाय म्हणाली आणि कॉफी साठी आदित्य सहीत टीम बरोबर कॅफेटेरियात गेली. मस्त गप्पा मारत कॉफी चे घुटके घेत टीम ने ब्रेक ची मजा घेतली.

एक वेगळ्या प्रकारचं सॅंडवीच लाँच झालं होतं आणि आदित्य ने सगळ्यांना ट्रीट दिली. आज त्याचा ह्या प्रोजेक्ट मधला पहिला दिवस म्हणून!! श्रुती तर खुशच झाली पण तिने चेहऱ्यावर तसे काही दाखवले नाही. तिने ट्रीट बद्दल त्याचे आभार मानले, टीम मध्ये स्वागत केला आणि डेस्क वर परतली.

त्या दिवसानंतर आदित्य काय करतो ह्याचे निरीक्षण करण्याचा श्रुती ला छंदच जडला. हळू हळू तिच्याही नकळत तिला तो आवडायला लागला होता. एकदोनदा सौम्या ने हटकले देखील. पण श्रुती ने ताकास तूर लागू दिले नाही. प्रोजेक्ट development बऱ्यापैकी वेगात चालली होती. क्लायंट ने critical deadlines दिल्या होत्या. त्यात श्रुती ची भूमिका अत्यंत महत्वाची असल्यामुळे तिला ऑफिस मध्ये जास्त वेळ बसून काम करावं लागत होतं. ती आता संध्याकाळी उशिरा घरी जायला लागली होती. काहीही करून तिला ह्या प्रोजेक्ट मध्ये extensions नको होत्या आणि bug fixing ला वेळ लागत असल्यामुळे जास्त काम करावं लागत होतं. श्रुतीच प्रोजेक्ट बद्दल आणि overall technical knowledge चांगलं असल्यामुळे टीमला तिच्या मदतीची गरज होती. ती सुद्धा प्रोजेक्ट यशस्वी व्हावा म्हणून चौफेर लक्ष देत, मदत करत, स्वतः चंही काम करत होती. सुरुवातीला तिच्याशी कमी बोलणाऱ्या टीम चं आता तिच्याशिवाय पान हालत नव्हतं. एकच व्यक्ती ह्या गोष्टीला अपवाद होती. अर्थातच आदित्य!! तिला काहीच न विचारता त्याचं काम चाले. तो नेमका काय काम करतो हे कोणालाही माहित नव्हतं. leads ना त्याने केव्हाच गुंडाळून ठेवलं होतं. श्रुतीला आता आदित्य विषयी भलताच संशय यायला लागला होता. तो रात्री ऑफिस मध्ये बसून कसले तरी कॉल्स घेत असे. क्लायंट मात्र नेहमीच आदित्य ला appreciate करत असे. तो काहीच काम करत नसून सुद्धा क्लायंट का appreciate करतो ह्याचं कोडं श्रुतीला उलगडत नव्हतं. इतर कोणालाच आदित्य विषयी सुतराम शंका नव्हती. ह्याच कारण म्हणजे सध्या टीमला खूप काम

होतं आणि एकमेकांशी जुळलेले सूरही त्याला कारणीभुत होते, त्यात आदित्यने सगळ्यांना चांगलंच पटवलं होतं. उंचापुरा आदित्य आपल्या मधाळ हसण्याने,बोलण्याने आणि बोलबच्चन स्वभावाने कुठल्याही कंपूत सहज मिसळत असे. मुली तर त्याच्या आजूबाजूला घुटमळत असायच्या. तो माझ्याशी बोलला, ही कोणत्याही मुलीसाठी आनंदाची गोष्ट झाली होती. श्रुती मात्र काय करावे ह्या संभ्रमात पडली होती. काहीतरी वेगळा शिजत आहे असं तिला सारखं वाटत होतं. नेमका काय ह्याचा एकीकडे शोध घेणं ही गरज होऊन बसली होती. तिच्या प्रश्नांची उत्तरे तिला लवकरच मिळणार होती.

खरेच आहे नाही का! कुठल्याही गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यात यश मिळतेच. आणि यश मिळाले!! प्रोजेक्ट यशस्वी झाला !!

क्लायंट ने सगळ्यांना appriciate करणारी भली मोठी मेल पाठवली. श्रुतीचं विशेष कौतुक केलं होतं. अखिलेश सरांनी कॉल करून personally श्रुतीचं अभिनंदन केलं. ह्या यशानिमित्त अखिलेश सरांनी एक पार्टी जाहीर केली!! सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं !! ड्रिंक्स घेणारे तर हवेत तरंगायला लागले, न पिताच! आतापासूनच!! फुकटची ढोसायला मिळणार होती ना.. अनलिमिटेड!! चर्चा रंगात आल्या होत्या जिकडेतिकडे ! बहुतकरून मुलींच्या गप्पा ड्रेस आणि लुक विषयी, आणि मुलांच्या ड्रिंक्स विषयी सुरु झाल्या होत्या!! श्रुतीला ह्या कशातच काडीचाही रस नव्हता. तिला आनंद ह्या गोष्टीचा झाला होता की तिला आता शोधमोहीम व्यवस्थित करता येणार होती, पुढचं काम सुरु व्हायला वेळ होता. आदित्य नेमका काय करतो ह्याचा छडा लावुनच पार्टीचा आनंद लुटायचा असे तिने ठरवले होते . ती संधीच्या शोधात होती.

पार्टी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी final रिपोर्ट्स साठी ती ऑफिस मध्ये थांबली होती. आदित्य एका कॉलवर होता. manners ची वाट लावून श्रुती हळूच तो काय बोलतो हे ऐकायला लागली. जे ऐकले ते समजताच तिचे डोके फिरले आणि ह्याची शहानिशा करायचीच असे ठरवून तिने घरी जाणारी कॅब पकडली.

ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळीच श्रुती odc मध्ये पोचली आणि आदित्यचा शोध घेऊ लागली. तिला तो मिटिंग रूम मध्ये भेटला. तिला पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. आपण पकडले जाणार अशी भीती त्याच्या चेहऱ्यावर झळकून गेली . पण क्षणभरच!! त्यानंतर आदित्य ने तिला पकडले आणि कुठलीही संधी न देता श्रुतीच्या नाकावर क्लोरोफॉर्म चा रुमाल धरला !!!

——————————————————————–

झालं असं की अगदीच mild effect असणारं क्लोरोफॉर्म आदित्य ने वापरलं होतं. ते नाकासमोर धरताच श्रुतीची शुद्ध हरपली. त्याला काहीही सुचेनासं झालं होतं. “अरे देवा हे काय केलं मी ! अगदीच गरज पडली तर म्हणून हा रुमाल बाळगत होतो. माझं गुपित कंपनीत कुणाला कळता कामा नये. इतर कुणीही असला तर चाललं असतं. मी केलं असत manage ! पण नेमकी ही श्रुती मध्ये आली. हिचे गैरसमज झाले असणार नक्कीच! काय करू? हिला विश्वासात घेऊन सर्व खरंखरं सांगून टाकायची इच्छा होत आहे. पण ह्या सगळ्यावर माझं नियंत्रण नाहीये. कर्ता करविता कोणी वेगळाच आहे. पण मी सुचवू शकतो त्यांना. ते ऐकतील का माझं? असं ऐनवेळी मुलीच्या मोहात पडून, तिला भुलून प्लॅन मध्ये बदल नाही करता येणार मला. ही शंभर प्रश्न विचारेल. हिला सगळं सांगितलं तर प्लॅनच काय ? एरवी कोणालाही सहज उल्लू बनवतो मी. पण हिने बरोबर पकडलं!! बास आता! माझे instinct कधीही दगा देणार नाहीत. त्यानुसार मला हिला सगळी हकीकत सांगावी लागेल तरच पुढचा प्लॅन यशस्वी होईल. तिचा प्रामाणिकपणा वेळोवेळी तपासला आहे. अखिलेश काका सुद्धा खुश आहेत तिच्या कामावर आणि प्रामाणिकपणावर. पण तिचा प्रामाणकपणाच नडला मला. त्यामुळेच आज ही परिस्थीती ओढवली आहे. विचार करकरून डोक्याचा भुगा झालाय. दार बंद आहे, अजून कोणी आलंसुद्धा नाहीये ते एक बरं आहे. बोलता येईल. हिला शुद्ध येईपर्यंत बाबांना कल्पना देऊन ठेवतो. तसाही मागे एकदा बोललो होतो. अरे पण हे काय, हिला जाग आली वाटतं ”

आदित्य : ” काय गं, झाली का झोप .. असं ऑफिस मध्ये झोपतात का ? ”

श्रुती : “ए , तू fraud आहेस. ऐकला मी तुझं बोलणं. क्लायंट चे डिटेल्स, प्रोजेक्ट चे डिटेल्स कोणालातरी देत होतास तू . ह्यासाठी लवकर येतो, सगळं जाणून घेतो तू .ओळखलंय मी तुला, u cheater ”

आदित्य: “किती ओरडते ग. शांत बस. एकदम शांत! विश्वास ठेव माझ्यावर सगळं सांगतो तुला ”

श्रुती : “नाही, मी ओरडणार ! तू मला बोलबच्चन नाही देऊ शकत. छान दिसतोस म्हणून तुझा fraud नाही सहन करणार. अरे loyalty कशाशी खातात माहित आहेत का तुला ? तुझ्या ह्या handsome personality मागे एक दुष्ट शक्ती दडलेली आहे. मी हे सगळं जाऊन अखिलेश सरांना सांगणार. सोड मला”

आदित्य: “वेडी आहेस का तू ओरडायला! आणि अखिलेश काका स्वतः येत आहेत इकडेच बोलावलं आहे मी त्यांना. ”

श्रुती : “काका काय म्हणतोस, रिस्पेक्ट देणं सुद्धा विसरलास का ?”

आदित्य :”काकाच आहेत ते माझे !”

श्रुती : “अच्छा म्हणजे ते पण सामील आहेत होय तुला !! अरे देवा ह्या दुष्ट लोकांची किती मोठी साखळी आहे आणि वरपर्यंत पोखरला गेलंय सगळं!! ”

आदित्य : “हे बघ श्रुती. इतका वेळ मी शांत होतो आता बास. तू गप्प बस आणि मी काय म्हणतो ते चुपचाप ऐकून घे. तोपर्यंत एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. fraud असतो तर तुला केव्हाच शूट केलं असतं. अशी चर्चा करत बसलो नसतो इथे! ही बघ. खरी बंदूक आहे ही. जीवाची पर्वा असेल तर शांत बस आणि मी म्हणतो ते ऐकून घे फक्त. मग तू जाऊ शकतेस. मी वचन देतो की त्यानंतर तुला धक्का ही लागणार नाही आणि हवं तिथे जाता येईल, हवं ते करायला तू मोकळी ! OK ? ”

श्रुती : “हम्म .. ”

गेले तासभर आदित्य बोलत होता आणि श्रुती थक्क होऊन ऐकत होती. त्याच्याबद्दल असणाऱ्या राग आणि चीड ह्या भावना केव्हाच मावळल्या होत्या आणि त्यांची जागा आता कौतुक आणि अभिमानाने घेतली होती.

श्रुती : “एक मिनिट आदित्य, म्हणजे तू प्रत्यक्ष कंपनी चा मालक आहेस आणि अखिलेश सर तुझे काका!! नाही रे अजूनही माझा विश्वास बसत नाहीये !”

आदित्य : “किती वेळा सांगू सुंदरी, तुझा विश्वास बसावा म्हणून तुला सगळ्या घटना तपशीलवार सांगितल्या तसे पुरावेही दिले. अजून काय करू म्हणजे तुला खरं वाटेल?”

श्रुती: “Let me summarize!! तुला कंपनी बद्दल सगळं माहित आहे, अखिलेश सरांबरोबर गप्पा मारताना तुला मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, सगळे मेल्स चे BCC तुला येतात. कंपनी च्या क्लायंट बरोबर तुझे पर्सनल कॉन्टॅक्टस आहेत. तश्या मेल्स ही तू दाखवल्यास मला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनीचे मालक अभिषेक ह्यांचा अमेरिकेत जाऊन शिकून आलेला मुलगा तूच आहेस. पण कंपनीत ग्राउंड लेवलला कस काम चालतं हे बघण्यासाठी एक साधा कर्मचारी म्हणून रुजू झालास. आता संगती लागत आहे मला. काही लोकांना अचानक कंपनीतून काढून टाकण्यात आलं मागच्या काही दिवसात!! नवे clients आणि प्रोजेक्ट्स आले. माझं जोरदार increment झालं. काहींच्या कामाचं स्वरूप बदललं. हा सगळ्या तुझ्या गुप्तपणे काम करण्याचा परिणाम!! पण तुझं मुख्य उद्दिष्ट मला नाही समजलं अजून. केवळ एवढ्यासाठी तुझी गरज नव्हती , तुला तर अनुभव ही आहे अमेरिकेत कामाचा. तुझी startup सुद्धा आहे!! ती इकडे merge करायचा विचार आहे वाटतं … चांगला आहे!!”

आदित्य: “startup आहे माझी, पण मला माझा business भारतात वाढवायचा आहे. म्हणून मी इथे आलो. इथला अनुभव घेण्यासाठी. सुरुवातीला उद्दिष्ट असं काही नव्हतं. पण नंतर लोकांशी बोलत गेलो, मिसळत गेलो आणि मला बऱ्याच गोष्टी समजल्या.. सुधारणा सुचल्या, त्या मी बाबा आणि काका ह्यांच्याबरोबर डिसकस करत गेलो आणि बाकीच्या गोष्टी घडल्या. खूप काम केलं, काम करत नाही असं दाखवून सगळ्यांच्या गोटात शिरलो, खबरा काढल्या, खरोखर काम कसं चालतं हे जाणून घेतलं, खूप काही शिकलो, टेकनॉलॉजि आणि माणसं दोन्ही!! प्रत्येक प्रोजेक्ट चे code review केलं. technical pitfalls दूर केले. experts सोबत discussions केलं. आपली कंपनी छोटी आहे गं. तिचा विस्तार करायचा आहे. global प्रेझेन्स आणि रेकग्निशन मिळवायचं आहे. ह्या बाबांच्या ध्येयासाठी त्यांना मदत करत होतो इतकंच !! त्यात माझा ही फायदा झाला. माझी startup पूर्णपणे वेगळया technology आणि business goal वर काम करते ते काम तर चालू राहिलच पण आता बाबाना मदत करायची हे पक्क ठरवलंय मी. ही कंपनी त्यांनी सुरु केली, वाढवली, मी हिला अजून मोठ्या उंचीवर नेऊन ठेवणार!! हेच ध्येय आहे माझं!! ”

श्रुती: “तू हे सगळं मला का सांगितलंस?? बंदूक वगैरे काय काय नाटक केलीस?”

आदित्य : “अगं, घाबरलो मी. पहिला अनुभव ना पकडले जाण्याचा . आतापर्यंत सगळं व्यवस्थित चालू होत. तू अचानक टपकलीस . असं वाटलं सगळी मेहनत पाण्यात जाते की काय. आता कळत आहे एवढं panic होण्याची गरज नव्हती मला. तुही काही कमी नाहीस, किती बडबड केलीस , and u know what , u just called me handsome and all. ”

श्रुती : “हो ना खरंच आहे ते. पण दुष्ट शक्ती आहेत अस म्हणाले तेही खरं!!! ”

असं बोलून श्रुती हसायला लागली. आदित्य सुद्धा तिच्या हसण्यात सामील झाला.

त्याने ठरवलं होत, उद्याच्या पार्टी मध्ये हिला propose करायचं आणि म्हणायचं,

“तू तूच ती…. माझ्या हृदयाची राणी!!!! ”


-----------------------

read next parts of the story here:

https://killicorner.in/

copy and paste this link into your browser, press enter.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance