Prajakta Shelar

Romance

3.0  

Prajakta Shelar

Romance

तुम सा ना कोई...

तुम सा ना कोई...

2 mins
160


नवीन जोडप्याचे नवीन नवीन रंग जेव्हा उंच आकाशात झेप घेत असताना त्यांना अचानक कुठे तरी आपण मागे राहिलोय याची जाणीव होऊ लागते.


आपण जोडपे तर म्हणतो पण आपण खरंच जोडपे आहोत का?? आपले तर अजून लग्नदेखील झाले नाही, "दिव्या..." 


लग्न केलं तरच जोडपे का? आपले प्रेम आहे. गेली दोन वर्ष आपण सोबत आहोत. घरातील व बाहेरच्यांनाही माहीत आहे की आपण एकत्र आहोत किंवा लग्न करणार आहोत ते. "प्रशांत..."  


तू वेगळा अर्थ घेऊ नकोस मी सहज बोलून गेले, "दिव्या..."


प्रशांत साधा भोळा मुलगा नव्हता तो थोडा डेंजरच मुलगा होता. कॉलेजमध्ये हाणामारी-भांडण हे सर्व नेहमी होत असायचं फक्त काॅलेजमध्येच नाही तर बाहेरही तो मोठ्या मोठ्या गुंडांच्या सोबत असायचा. एक दिवस एका मर्डरच्या केसमध्ये प्रशांत एकटाच पूर्णपणे अडकला व एकटाच पडला पण तो एकटा नव्हता दिव्याही त्याच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली होती. प्रशांतला या केसमधून बाहेर पडण्यासाठी दिव्याची जिवापाड धडपड चालू होती. त्यावेळी दिव्या घरच्यांच्या व बाबांच्या विरोधात उभी राहिली आणि तिच्या प्रयत्नांनी यश मिळाले व प्रशांतला तिने कसेबसे कोर्टातून बाहेर काढले. प्रशांतला घट्ट मिठी मारून दिव्या त्यावेळी फक्त एकच वाक्य बोलली.


प्रशांत आपण दोघेही लगेचच कोर्ट मॅरेज करुयात. मी नाही राहु शकत तुझ्या शिवाय प्रशांत प्लीज आपण लग्न करुयात. "दिव्या..."


हो बाबु आपण उद्याच जाऊ या कोर्टामध्ये तू अगोदर तुझे डोळे पुस बघू. "प्रशांत..."

 

सकाळ होत नाही तर प्रशांत झोपेतून उठून दिव्याकडे एकटकपणे बघत बसलेला असतो, दिव्याने सुंदर असा लाल कलरचा नाइट ड्रेस घातलेला असतो आणि केस मात्र मोकळेच असतात. तिचे ते विलोभनीय रूप बघून प्रशांत अजून एकटकपणे दिव्याकडे बघतो. अचानक केसांची एक बट दिव्याच्या चेहर्‍यावर येते प्रशांत हाताने बट न हलवता त्याच्या चेहऱ्याने बाजुला करतो तेवढ्यात दिव्या जागी होती आणि जोरात‍ प्रशांतला तिच्या अंगावर खेचते प्रशांतने बनियन घातलेली होती. प्रशांत त्या बनियनवर अजून हॅन्डसम दिसत होता. प्रशांतचे मसल्स दिव्याला अजून तिच्याकडे खेचत होते. 

 

लग्नाच्या दोन दिवसानंतर मध्यरात्रीच्या वेळी जेव्हा पूर्ण पुणे नगरी झोपेच्या आधीन गेली तेव्हा या नवीन जोडप्याने ते थांबलेले नवीन नवीन रंग पुन्हा पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट येथून उंच आकाशात भरारी (झेप) घेतली. आता खऱ्या अर्थाने ते दोघे पती-पत्नी होणार होते. जिथे कोरला जाणार होता प्रेमाचा कधीही न संपणारा प्रवास.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance