तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट
तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट
भाग १: आदिती
कधी प्रेम झालय का हो... झालं असेल तर एक नक्की सांगेन खूप छान असत प्रेम आपण त्यात वाहत जातो.प्रेमाला वयाची मर्यादा नसते ते होत आणि होत राहतं. पण वेळोवेळी बदलत जाणार ही प्रेम असत बर का. ज्यात प्रेमाचा अर्थ एकटाच शोधणारा ही असतो किंवा अधुऱ्या वाटेवर सोडून गेलेला सोबती असतो. अशाच एका प्रेमाच्या बोटीत एकटा बसलेल्या प्रेम वेड्या मुला पासून तरूण होण्या पर्यंतचा हा प्रवास तुम्हला नक्की आपल करेल.
प्रेमाला वय नसत, प्रेम हे आंधळ असत, प्रेम कधी माझं तर कधी तुझ असत. पण तरी ही प्रेम म्हणजे प्रेम असत.
मस्त मजेत जगणारा मी कधी अशाच प्रेमाच्या लफड्यात पडलो मलाच कळलं नाही. प्रेमाच लफडच म्हणणं योग आहे अस मला वाटत कारण माझं वयच काय होत? शाळेची चड्डी मध्ये असणाऱ्या मुलाला खरच प्रेम कळत का हो ??? आश्चर्यच म्हणाव अजून काय. असो.... तो दिवस आज ही आठवतो. सकाळच्या पारी वासुदेव आला गाण्याची ताल धरत तयार होऊन खांद्यावर बॅग टाकली की निघलो शाळेत.
आज शाळेचा पाहिलं दिवस होता मी नुकताच ५ वी मध्ये चांगल्या टक्क्यांनी उतिर्न होऊन ६ वी ला आलो होतो. आज पाहिला दिवस त्या मुळे थोडा कंटाळा आला होता. शाळेत न जाण्यासारखं वाटण्याच कारण सुट्टीच्या दिवसात मजा मस्ती चा आळस अजून ही तसाच होता. सुट्टीत गावहून जाऊन आल्या असल्यामुळे रंग काळाच झाला होता आणि होणार नाही तर काय. घरात कमी आणि नदीवर जास्त फिरणाऱ्या मुलांचा रंग हा स्वतःहून बदलतोच की. नवीन वर्ग आणि आपण ठरवणार तो आपला बेंच ह्यासाठी ची उत्सुकता काही वेगळीच असते. घरा पासून शाळा जवळ असल्याने कोणी सोडायला येईल अस अजिबात न्हवतच आणि सोबतीला मित्रांची टोळी असली की सकाळ एकदम बेस्ट होऊन जाते. सकाळी ७.०० च्या काट्यावर आम्ही शाळेत पोहचलो. नवीन वर्ग आणि बेंच ठरवण्यात आम्ही पटाईत होतो. आम्ही आमची टोळी घेऊन मधल्या बेंच वर जाऊन बसलो अगदी खिडकी कडच्या रांगेत जिथून अधून मधून सुंदर वारे वाहतात आणि आळस आला की बाहेर पाहायला मिळते.काही नवीन चेहरे ही पाहायला मिळत होते. आमच्या वर्गाचा शिक्षिका म्हणून वर्तक बाईंनी चार्ज घेतला. हजेरी सुरू झाली आणि पहिल्या दिवसाच्या हजेरी मध्ये आपला हजेरी क्रमांक लिहून घेणे आणि आपल्या सोबत आपला मित्र कुठे हे जाणून घेण्या मध्ये खूप मजा असते. कारण तसे पेपरच्या वेळी कोण आपल्या सोबत आहे कळत. आडनावा नुसार माझा हजेरी क्रमांक १८ होता आणि माझा आधी नेहमी शीतल असायची पण आमचा दोघांचा मध्ये एक नवीन नाव आल होत अदिती...
सुंदर आणि मोहक चेहरा,मोकळे लांब सडक केस, तेजस्वी डोळे, गुलाबी ओठ, मोहक हास्य, सुंदर नाजूक बांधा आणि कमळासारखी फुललेली नजर.केसांच्या बटानी तिचा चेहरा अधिकच खुलून दिसत होता..ती एखाद्या स्वर्गातली अप्सरे सारखी दिसत होती.तिच्या सौंदर्यापुढे सगळे फिके पडले. अशी आदिती डवरे.
डवरे ह्या आडनावामुळे ती माझ्या आधी आली होती . त्या मुळे अदिती १७ आणि मी १८ असा हजेरी क्रमांक आला होता. हजेरीला सुरुवात झाली शीतल...हजर.... अदिती हजर.... तेजस... मी उठलो आणि हजर म्हणत अदिती कडे पाहिलं. त्या क्षणी कोणी विचार केला होता की आज जी पुढे आली आहे तीच्या सोबतच कमेस्टी जुळेल.
शाळेचा पहिला दिवस खूप सुंदर गेला होता. आपल्या मित्र-मैत्रिणींना खूप दिवसानंतर पाहणं, शाळेचा गणवेश, नवीन पुस्तक, शाळेतील एकत्रित प्रार्थना, एकत्रित उठून वर्ग शिक्षकाचे स्वागत करणे. मधली सुट्टी ,शाळेतील ती मस्ती, एकत्र डबा खाणं मी खूप मिस करत होतो. शाळेचा पहिला दिवस हा नेहमी न विसरणार असतो कारण आपण फक्त वरच्या इयत्तेत गेलेलं नसतो. तर त्यासोबत आपण वयानेही मोठे होत असतो. नवीन गोष्टी, वाढते वय आणि वाढत्या वयासोबत आपली मॅच्युरिटी ही वाढत असते. काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला नव्याने पाहायला आणि अनुभवायला भेटतात. ज्यात कदाचित वयाचे भान नसतं आणि आपण फक्त त्यात वाहत चाललेलो असतो.
शाळेचे छान दिवस चालले होते. अभ्यासात चढाओढ म्हणजे आपण किती हुशार ही दाखवण्याची संधी असते आणि त्या वयात मी तरी तसा होतो. ज्याला इतर गोष्टी सोबत अभ्यास पण तितकाच आवडायचा. घरात मोठी ताई हुशार असल्याने त्या मागे मी ही हुशारच असावं हे घरच्यांना वाटण स्वाभाविकच होत. वर्गात पहिलं येणं ही गेल्या ३ वर्षांची माझी सवय झाली होती. वेळे नुसार दिवस सरले शाळा सुरू झाली आणि चाचणी परीक्षा आल्या.पेपर म्हंटल की हृदयाची धकधक आणि हाताला आलेला घाम.
सकाळी ८ वाजता पहिला पेपर होता तो ही माझा आवडती विषय माझी मायबोली मराठी आणि त्या नंतर १० वाजता २ रा चाचणी पेपर म्हणजे हिंदी. त्या मुळे मी आज जरा रिलॅक्स होतो पण पुढे जी बसली होती ती माझ्यासाठी अनोळखी होती त्या मुळे पेपराची कुजबूज करण म्हणजे अवघडच होत. दिवस सरले आणि त्या सोबत ३ दिवसांन मध्ये ७ पेपर ही संपले होते आणि पुढील आठवड्यात चाचणी परीक्षेचा रिझल्ट हाती लागणार होता.मी मात्र जाम खुश होतो कारण चांगले मार्क येणार हे नक्कीच मला माहीत होत. सर्वांना पेपर दिले गेले.मला काही विषयात २० मधून १७ च्या वर मार्क होते आणि काही मध्ये पैकीच्या पैकी आणि तो क्षण आला आणि वर्तक बाईंनी चाचणी मध्ये प्रथम कोण सांगितले.
वर्तक बाई: तर चाचणीत चांगले मार्क मिळून प्रथम आली आहे अदिती....
अस्वस्थ चेहऱ्या सोबत क्षणातच माझा चेहऱ्यावरील हास्य हरवले होते. कोणी तरी आपल्या वरचड आहे हे मला त्या दिवशी कळले होते. संपूर्ण वर्गात टाळ्या वाजत होत्या. तसा मी २ रा आलो होतो त्या मुळे माझासाठी ही टाळ्या वाजल्या पण अदिती पहिली कशी आली हा विचार मला सतावत होता.त्या दिवशी मला अजून एक गोष्ट कळली लाईफ मध्ये कोणी तरी हव जो तुमचा प्रतिस्पर्धी असावा. तो दिवस मी कसा बसा काढला आणि त्या दिवसा नंतर मी पक्क केलं की चाचणी ठीक आहे पण आता सहामाईक परीक्षेत प्रथम याच हे मी नक्की केलं होत.
दुसऱ्या दिवशी शाळेत संगीतासाठी गायकवाड सर विद्यार्थी शोधत होते. त्यांचा तास सुरू झाला होता आणि ते हजेरी क्रमांका नुसार एक एकाला बोलवत होते आणि पाठ्य पुस्तकातील एक कविता ज्याला त्यांनी चाल लावली होती त्या चली वर ती कविता बोलायला सांगत होते. आमच्या ग्रुप मधील कोणत्याच मुलाला त्या गायन क्लब चा हिसा न्हवत व्हायचं म्हणून खराब गायच म्हणजे नाही घेणार अस आम्ही ठरवलं होत. हजेरी नुसार अदिती ला बोलवलं ती पुढे गेली संपूर्ण वर्गात शांतता होती आणि तिने कविता म्हणायला सुरुवात केली. तिने जशी गायला सुरूवात केली तस मी तिला पाहतच बसलो तिचा आवाज खूपच गोड मधुर रम्य होता. मी तिचा स्वर गंगेत हरून गेलो होतो. त्या कवितेतील ओळी मला त्या वयात कळत न्हवत्या आणि अर्थ आमचा पैकी कोणत्याच मुलांना कळत नसावा पण तिने गायल्याने ते शब्द आणि तो मन मुक्त आवाज मनातं घर करत होता. सर्वांनी टाळ्या वाजवल्या तसा मी भानावर आलो. तेजस प्रतिस्पर्धी आहे ती विसरू नको माझं मन मला म्हणाल आणि मी ही छान गाणं गाणार अस ठरवल. आता माझी वेळ होती तस लहानपणी मला शाळेतील स्पर्धेत आवड असायचीच त्या मुळे मला गाण्याचा थोडा शॉक होता पण लहानपणी असताना आपला मित्र जिथे आपण तिथे म्हणून मी खराब गायच ठरवल होत. पण आता मात्र मी माझा बेस्ट देणार ह्या विचारांनी पुढे गेलो आणि कवितेला सुरुवात केली. सरगम पेठीच्या सुरावर मी सुर पकडले आणि गाऊ लागलो. मी गात असताना ती मला निरखून बघत होती आणि का जाणे मला ते आवडत होत. कविता संपली आणि वर्गात एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या दिवशी मी किती छान गातो हे मला पहिल्यांदा कळलं होत. माझ्यातील गायनाची कला ही कुठे तरी लपून होती हे मला खर तर त्या दिवशी अदिती बद्दल असलेल्या प्रतिस्पर्धी वृती मुळे जाणवलं होत. का जाणे पण मी खुश होतो नक्की कारण नाही सांगता येणार का. मनातल्या मनात आनंद लपवत मी माझा जागेवर जाऊन बसलो.
वेड्या मना सांगणं खुणावती का खुणा….
माझे मला आले हसू प्रेमात लपणे नाही रे….
ह्या ओळींचा अर्थ जरी लागत असला तरी त्या वयात त्या उमजण्या इतक वयच न्हवत. गायनाचा तास संपला आणि जाताना गायकवाड सरांनी सिलेक्टेड मुलांची नाव सांगितली. अदिती ,प्रतीक , मनाली,तेजस ह्यांनी मला शेवटचा तासानंतर येऊन भेटा. शाळा सुटली आणि आम्ही ४ घे गायकवाड सरांन भेटायला गेलो. मनाली आणि प्रतीक आम्ही चांगले मित्र असल्याने आम्ही एकमेकांशी बोलत गेलो आणि अदिती ही आमचा मागे येत होती. पायऱ्या उतरताना अदितीचा पाय घसरला आणि ती धडपडली. त्या क्षणी तिला बघून मला हसूच आवरल नाही आणि मी जोर जोरात हसू लागलो. आदिती माझाकडे रागाने बघत होती. पण लहानपणी ह्या सर्व गोष्टी अलड असतात त्यात भावना नसतात त्यात असतो तो फक्त आणि फक्त निस्वर्त भाबळेपणा असतो. मनाली धावत गेली आणि अदितीला उचल.
लागल तर नाही ना तुला मनालीने अदितीला सावरत विचारल.
नाही ग जरा पाय घसरला आणि तोल गेला.
ती अजून ही मला रागात बघत होती. तिला बघून मी हसन गिळल आणि दुसरीकडे बघत खाली पायऱ्या उतरू लागलो.शिक्षक रूम मध्ये जाऊन गायकवाड सरांना भेटलो आणि त्यांनी रोज प्रार्थना मध्ये वरती स्टेज वर बसून प्रार्थनेची सुरुवात करायची अस सांगितलं. होकार देऊन आम्ही तिथून निघलो जाताना अदितीच्या चेहऱ्यावरचा राग मला दिसत होता आणि कदाचित तोच क्षण आमच्या मैत्रीची सुरवात होती. राग नक्की असतो काय खरं सांगायला जावं तर आपल्या मनात एखादा विषय असलेली एक भावना किंवा आपण असं म्हणू शकतो की एखाद्या विषयीची ईर्ष्या.पण तीच ईर्ष्या कधी चांगल्या विचारांमध्ये किंवा चांगल्या भावनांमध्ये किंवा हृदयस्पर्शी भावनांमध्ये बदलत जाते हे आपलंच आपल्याला कळत नाही. पण हे सगळं होण्यासाठी गरज असते ती म्हणजे वेळेची वेळ देण्याची आणि मी ही वेळ द्यायचा ठरवलं माहित नाही कशासाठी पण त्या वेळेला मला असं वाटलं की शांत राहणं योग्य असावे.
आम्ही आमच्या वर्गात जाऊन आमच्या बॅगा घेतल्या आणि आम्ही घरी जायला निघालो. घरी जाताना माझं लक्ष फक्त आणि फक्त आदिती तिकडे होतं. तिच्या चेहऱ्यावरचा तो माझ्याविषयीचा द्वेष मला तिच्या नजरेत ही जाणवू लागला होता. पण त्या वयामध्ये कदाचित त्या काही गोष्टी समजणं अतिशय कठीण असतं कारण की आपण त्या बाल वयात असतो. आपण त्या गोष्टींना अतिशय वेगळ्या पद्धतीने घेतो. तसं आदितीच घर माझ्या घरापासून फारसं लांब नव्हतं. माझ्या आधी तिचं घर यायचं आणि तिथून पुढे डावीकडे ओळल्यानंतर माझ्या घराकडे जाण्याचा रस्ता होता.
मी घरी आलो बॅग टाकली कपडे बदलले आणि आईला म्हणालो आई खूप जोराची भूक लागली आहे काय केले जेवायला??
बटाटाची आमटी केली आहे जा पटकन हात धुवून ये आणि जेवायला बस.
जेवताना आणि जेवण झाल्यानंतर आज पूर्ण दिवस मी फक्त त्या घडलेल्या गोष्टीविषयीचा विचार करत होतो. ती जेव्हा पडली तेव्हा मी हसायला हवं होतं का? मी वागलो ते बरोबर होतं का? असे बरेचसे प्रश्न माझ्या मनात येत होते. ज्याचे उत्तर माझ्याकडे नव्हतं आणि त्या वयामध्ये असे प्रश्न पडणं खरंच योग्य असतं का? हेही मला माहित नव्हतं. पण मला प्रश्न पडले होते.
क्रमशः
-शुभम गुजर

