तुझी माझी कहाणी...
तुझी माझी कहाणी...
नमस्कार मित्र मैत्रिणींनो आणि वाचकांनो मी नवोदित लेखिका आहे मी पहिल्यांदा कथा लिहित आहे लेखनात काही चुका असतील तर मला सांगा मी सुधारणा करेन. ही कथा पुर्णपणे काल्पनिक आहे. ह्या कथेतील पात्र काल्पनिक आहेत.
आपल्या कथेची नायिका मधुराणी गोखले आणि नायक साहिल पाटील. साहिल राहायला सांगलीत होता आणि मधुराणी राहायला मुंबईत होती.
नुकतीच दोन तीन महिन्यांपूर्वी दोघांची भेट झाली. Instagram वर दोघांचं बोलणं सुरु होतं.
साहिल:- hi मी अकटखपॲड. साहिल पाटील. राहायला सांगलीत. मी वकील आहे. तुझ नाव काय मिस....
मधुराणी:- hello, मी मधुराणी गोखले राहायला मुंबईत मी नुकतीच job ला लागलेय.
साहिल:- बरं, काय काम करतेस तु.
मधुराणी:- मी computer operator आहे. Data entry करते.
साहिल:- बरं. आपण मित्र होऊ शकतो का? म्हणजे तुझी इच्छा असेल तरच कसला ही force नाही.
मधुराणी:- हो होऊ शकतो आपण मित्र.
साहिल:- thanks friend.
मधुराणी:- अरे वेडा आहेस का मैत्रीत thank you आणि sorry नसतं.
साहिल :- हो का. 😁
मधुराणी:- हो 😁
साहिल:- तुझ्या घरी कोण कोण असतं. माझ्या घरी मी , आई आम्ही दोघेच असतो.
मधुराणी:- माझ्या घरी मी, आई बाबा, बहीण भाऊ, काका काकी आणि आजी.
साहिल:- हो का खूप मोठं कुटुंब आहे तुझं.
मधुराणी:- हो. पण तुम्ही दोघंच तुझे वडील....
साहिल:- अग... ते.... काही वर्षांपूर्वी वारले. 😔
( वारले म्हणजे निधन झाले ) ( लेखिका )
मधुराणी:- अ... Sorry रे साहिल.
साहिल:- तु का sorry म्हणतेस 🤔
मधुराणी:- मला माहित नव्हते तुझ्या दुःखा बद्दल आणि मी नेमकं तेच विचारले.
साहिल:- अग असं काय तुला माहित नव्हते ना म्हणून तु विचारलेस ठीक आहे.
मधुराणी:- म घरचं सगळं तुच बघत असशील ना.
साहिल:- हो. आमची शेती , घराचा कारभार आणि माझ्या court case सर्व बघतो मी.
मधुराणी:- तु शेती पण करतोस. कसली शेती आहे तुमची
साहिल:- हो. ऊसाची १२ एकर ऊसाचा मळा आहे आमचा स्वतःचा. तुला शेती करायला येते की नाही ? आवडत का ?
मधुराणी:- वाह. हो मी सुद्धा शेतकऱ्याची मुलगी आहे आमची सुध्दा शेती आहे तांदूळ पिकवतो आम्ही आणि मला शेती करायला खूप आवडते.
साहिल:- अरे वाह...👌🏽
पहिला दिवस संपला.
दिवस दुसरा.
साहिल:- शुभ सकाळ 🌅 मधुराणी
मधुराणी:- शुभ सकाळ 🌅 साहिल निघालास का कोर्टात
साहिल:- हो तु निघालीस का आॅफीसला
मधुराणी:- हो.
साहिल:- बरं, सावकाश जा बोलू संध्याकाळी
मधुराणी:- हो , तु पण सावकाश जा आणि सावकाश car 🚗 चालव.
साहिल:- हो, bye 👋🏽
मधुराणी:- bye 👋🏽
दोघंही आपापल्या कामात मग्न होतात. सकाळ सरते दुपार होते. दुपार सरते कधी संध्याकाळ होते कधी याची दोघंही आतुरतेने वाट पाहत होते. ( लेखिका )
संध्याकाळ होते दोघंही एकमेकांशी बोलायला आतुर झालेले असतात. दोघंही online येतात ( लेखिका )
संध्याकाळचे ६:०० वाजले होते साहिलचा मधुराणीला massage आला.
साहिल:- Good evening 🌆 मधुराणी
मधुराणी:- Good evening 🌆 साहिल.
मधुराणी:- ☕चहा झाला का घेऊन तुझा
साहिल:- हो, तु घेतला का चहा.☕
मधुराणी:- नाही.
साहिल:- का?
मधुराणी:- मी ☕चहा नाही पित. मला आवडत नाही.
साहिल:- बरं, म तु काॅफी पितेस का.
मधुराणी:- हो.
साहिल:- बरं.
साहिल:- आजचा दिवस कसा गेला.
मधुराणी:- खूप काम होतं जरा पण शांत बसले नाही एक झालं की एक सारखं काम दमले आज खूप. तुझा आजचा दिवस कसा होता.
साहिल:- खूप दगदगीचा. एक case संपली आणि लगेचच दुसरी आली पण आता study करायचंय त्या case बद्दल.
मधुराणी:- बरं कर मग study.
साहिल:- हो करतो नंतर आता थोडावेळ विश्रांती घेतो बोलूयात आपण थोडावेळ तुला काय काम आहे का बोलू शकतेस ना माझ्याशी आता.
मधुराणी:- हो बोलेन ना.
साहिल:- तु मुंबईत एकटीच असते का की पुर्ण family.
मधुराणी:- मी एकटीच असते कामासाठी बाकी सर्व घरचे गावी असतात.
साहिल:- बरं. कोणत गाव तुझं.
मधुराणी:- कोकण 🌎
साहिल:- कोकणात कुठे मी पण होतो कोकणात शिकायला सावंतवाडी ला
मधुराणी:- हो का.
साहिल:- हो. सांग ना तु कोकणात कुठली
मधुराणी:- रत्नागिरीची मी.
साहिल:- अच्छा.
मधुराणी:- जेवलास का ? साहिल
साहिल:- हो. तु जेवलीस का? मधुराणी
मधुराणी:- हो. झोपला नाहीस अजून तू case ची study करतोयस का?
साहिल:- हो अग. तु नाही झोपलीस अजून
मधुराणी:- झोप येत नाही आहे.
साहिल:- हो का. उद्या कामाला जायच नाही का सुट्टी आहे का?
मधुराणी:- नाही रे कसली सुट्टी रविवार एकच असतो आमच्या नशिबात सुट्टीचा बाकीचे दिवस फक्त काम. जायचय उद्या कामाला.
साहिल:- बरं.
बोलत असताना त्यांना वेळेचे ही भान नव्हते रात्रीचे ११:४० झाले. ( लेखिका )
मधुराणी:- चल bye good night 🌃 साहिल.
साहिल:- हा bye good night 🌃 मधुराणी.
असे बोलून दोघंही शांत झोपून गेली.( लेखिका )
रविवारचा दिवस होता. मधुराणी शांत झोपली होती सकाळी ९:०० वाजता तिच्या मोबाईलवर मेसेज आला. तुम्हाला कळलेच असेल मेसेज कोणाचा होता तो ( लेखिका )
हा बरोबर ओळखले तुम्ही साहिलचाच मेसेज होता.
साहिल:- good morning 🌅 मधुराणी
मधुराणी:- good morning 🌄 साहिल
साहिल:- झाला का ग brekfast.
मधुराणी:- नाही रे. तुझा झाला का ?
साहिल:- का ग का नाही केलास brekfast. हो माझा झाला.
मधुराणी:- मी झोपले आहे रे.
साहिल:- काय 😱 तु अजुन झोपली आहे.
मधुराणी:- हो.
साहिल:- बरं.
थोडा वेळ निघून जातो दुपारी १:०० वाजता साहिल ला मधुराणी चा मेसेज येतो.
मधुराणी:- hii...
साहिल:- hii madam. झाली का झोप 😁
मधुराणी:- हो. काय रे थट्टा करतोस माझी 😒
साहिल:- नाही ग राणी.
मधुराणी:- बरं.
साहिल:- मला माहित आहे तुला एकच दिवस सुट्टी मिळते त्यामुळे आराम करायला मिळतो रोजच धावपळ सुरू असते तुझी.
मधुराणी:- हो रे.
साहिल:- मी शेतात आलोय ये आमचं शेत फिरायला. आवडेल का आमच्या शेतात फिरायला तुला.
मधुराणी:- हो का नाही आवडेल ना.
साहिल:- असं का मग लवकर ये.
मधुराणी:- मला आवडलं असतं तुमचं शेत बघायला.
साहिल :- बस इतकाच ना आता दाखवतो.
मधुराणी:- कसं? 🤔
असं साहिल बोलतो आणि मधुराणी ला video call करतो. मधुराणी call उचलते दोघंही एकमेकांना बघतात बघताच क्षणी दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात पण कुणी ही कुणालाही सांगत नाही.
दिवसातून एकदा तरी आता दोघेही video call वर बोलू लागले. एकमेकांना बघितल्याशिवाय, एकमेकांशी बोलल्याशिवाय राहवत नव्हतं त्यांना.
खूप दिवस दोघंही बोलत होते एकमेकांशी छान मैत्री झाली होती. हळूहळू दोघांचे नंबर exchange झाले. कधी call वर तर कधी WhatsApp वर दोघंही बोलू लागले.
असेच दोन महिने निघून गेले दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झाले होते. पण प्रश्न असा होता की हे आधी विचारणार कोण तरी साहिलने हिम्मत करून Directly नाही पण Indirectly मधुराणी ला विचारलं तिच्या ही मनात साहिलबद्दल प्रेम होतंच तिने ही Indirectly च सांगितलं. असेच म्हणता म्हणता काही दिवस निघून गेले. साहिलच्या घरी त्याच्या लग्नाची बोलणी सुरू झाली.
आता तुम्हा सर्वांना वाटत असेल की जर साहिल ला मधुराणी आवडत होती त्याच तिच्यावर प्रेम आहे मग त्याचे घरचे त्याच्या लग्न दुसरीकडे का बरं ठरवतायत.... ( लेखिका )
खरं तर असं आहे की साहिलने अजून त्याच्या घरी त्यांच्याबद्दल सांगितलं नाही आहे आणि लग्नाबद्दल आधी त्याला मधुराणी ला विचारायचं आहे तिच्या घरच्यांना भेटून त्यांच मन जिंकायचे आहे आणि जर मधुराणीची ईच्छा असेल तरच ह्या वर्षी लग्न करायचंय.... ( लेखिका )
चला तर पाहुयात आता साहिल मधुराणी ला भेटायला तिच्या शहरात जातोय का ? आणि तिच्या घरच्यांकडे तिचा हात आयुष्यभरासाठी मागतोय का ते.....
साहिल मधुराणीला call करतो. मधुराणी call उचलते दोघ बोलत असतात इकडचं तिकडचं बोलू लागतात.
साहिल:- मधुराणी काय करतेस ग.
मधुराणी:- काही नाही रे. तु काय करतोयस आणि तुझा आवाज का असा येतोय.
साहिल:- कसा येतोय.
मधुराणी:- काही तरी तुला पटलं नाही आहे तरी ते मनाविरुद्ध करावं लागतंय म्हणून त्रास होतो तसा आवाज वाटतोय मला आज तुझा काही झाले आहे का ?
साहिल:- हो अग.
मधुराणी:- काय?
साहिल:- आई लग्नाच्या मागे लागली आहे.😩 कसं समजावून सांगू तिला
मधुराणी:- अरे मग त्यात एवढं काय? वय आहे लग्नाच तर त्या लग्न कर असं सांगणारच ना. त्यांना पण कोणीतरी नको का घरात त्यांच्याशी संवाद साधायला.
साहिल:- हो ग तु बोलतेस ते सर्व बरोबर आहे आणि आईचं म्हणणं सुध्दा पटतं मला पण....
मधुराणी:- आता पण काय.
साहिल:- मला इतक्यात लग्न नाही करायचंय ते ही मला ज्या मुलीबद्दल माहीत नाही तिच्याशी तर नाहीच नाही.
मधुराणी:- बरं मग तस तु तुझ्या आईला सांग.
साहिल:- सगळं सांगून झालं पण ती काय ऐकत नाही माझं उद्याच मुलगी पसंत करायला जायचंय.
मधुराणी:- हो का . बरं जा
साहिल:- काय जा 😡
मधुराणी :- काय झालं चिडायला.
साहिल:- नाही करायचंय मला दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न.
मधुराणी:- दुसऱ्या कोणत्याही म्हणजे तुला कोणी आवडतं का तसं असेल तर आईला सांग ना तुझ्या.
साहिल:- जाऊ दे bye . Good night 🌃 झोपतो मी उद्या जायचंय ना .
मधुराणी:- बरं. Bye good night 🌉
आता तुम्ही म्हणाल कसा आहे हा साहिल जर स्वतः मधुराणी ने विचारले तुला कोणी आवडते का तर ह्याने का नाही तिला सांगितले की हो मला तु आवडतेस मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचंय तुझ्या सोबत आयुष्यातील चढउतार बघायचेत. ( लेखिका )
दिवस दुसरा......
सकाळ झाली आज साहिल त्याच्या आईसोबत एका मुलीच्या घरी जाणार आहेत मुलगी पसंत करायला. साहिल ची आई आज खुप खूश होती कारण आज साहिल लग्नासाठी मुलगी पसंत करणार होता.
साहिल ए साहिल चल आवरलं की नाही अजून तुझं ( साहिलची आई )
हो ग आई झालं ( साहिल )
चल मगं लवकर निघायचंय आपल्याला पाहुणे वाट बघत असतील. ( साहिलची आई )
आई असं बोलत असतानाच साहिल तिथे येतो. आज साहिलने सुट घातला होता अगदी रुबाबदार वाटतं होता. मुळातच तो रुबाबदार होता 😍. ( म्हणून तर मधुराणी त्याच्या प्रेमात पडली होती ) दिसायला देखणा, रुबाबदार.
साहिल आणि त्याची आई त्या मुलीच्या घरी जातात साहिल त्या मुलीला बघतो आणि लगेचच नकार कळवतो साहिलच्या आईला काही कळतच नाही तो असा का वागला. त्या साहिल वर खूप चिडतात पण त्या तिथे काही बोलत नाहीत आणि साहिल सोबत घरी येतात. काही दिवस निघून गेले तरी पण आई काय साहिल सोबत बोलत नाहीत. साहिल ला पण राहवत नाही त्याचं त्याच्या आईवर खूप प्रेम असतं तो तिला मनवण्याचा खूप प्रयत्न करतो.
काय वाटतं तुम्हाला साहिलची आई बोलेल साहिलशी आणि बोलली तर काय विचारेल साहिल ला मधुराणी बद्दल विचारेल आणि साहिल मधुराणी बद्दल आईला सांगेल का? हे तर आपल्याला पुढे समजेल ( लेखिका )
साहिल ची आई आज ठरवते आज काही झाल तरी साहिलशी बोलायचं काय ते मला ही समजू देत.
साहिलची आई:- साहिल मला बोलायचं आहे तुझ्याशी आज जरा लवकर ये कोर्टातून कोणती महत्त्वाची case नसेल तुझी तर.
साहिल:- हो आई.
साहिल ला विचार पडलाय की नक्की आईला काय बोलायचं असेल माझ्याशी परत लग्नासाठी दुसरी मुलगी पसंत करायला जायचंय हे तर सांगायचं नसेल ना तिला अस असेल तर मी आधीच नकार देणार नाही करायचं मला कोणा दुसऱ्या मुलीशी लग्न. आणि आईला मधुराणी बद्दल सांगेन.
याच विचारात संध्याकाळ कधी झाली हे साहिल ला समजलेच नाही ( लेखिका )
संध्याकाळी ५:३० वाजता.
साहिल:- अरे देवा! ५:३० झाले पण निघायला हवं काम तर झालेलं आहे.
साहिल ची आई:- आलास तू.
साहिल:- हो.
साहिल ची आई:- ये चहा आणि नाश्ता करून घे.
साहिल:- हो आई.
साहिल चहा आणि नाश्ता करतो. थोडा वेळ निघून जातो.
साहिल ची आई:- साहिल
साहिल:- काय आई
साहिल ची आई:- साहिल तु त्या मुलीला न बघताच नकार का बरं दिलास?
साहिल:- कारण आई मला लग्न नव्हते करायचे.
साहिल ची आई:- का ? का तुला लग्न नाही करायचे.
साहिल:- आई असं नाही की मला लग्न करायचं नाही मी लग्न करेन पण ते फक्त....
साहिल बोलता बोलता थांबतो.
साहिल ची आई:- ते फक्त काय साहिल बोल साहिल कोणी मुलगी आवडते का तुला तसं असेल तर सांग मला बोल कोण आहे ती मुलगी कुठे राहते ,काय करते ,कुठे भेटली तुला.
साहिल:- आई ती कोकणातली आहे रत्नागिरीची तीचं नाव मधुराणी गोखले. खूप गोड आहे ती शेतकरी आहे साधी सरळ आहे. आई तुला सुध्दा ती खूप आवडेल गं.
साहिल ची आई:- तीचा फोटो आहे का?
साहिल:- हो आहे ना
असं म्हणून साहिल मधुराणी चार फोटो आईला दाखवतो .
साहिल ची आई:- खुप गोड आहे. कधी जायचं मगं तिच्या घरी.
साहिल:- घरी 🤔
साहिल ची आई:- हो घरी तुमच्या लग्नाची बोलणी करायला.
साहिल:- आई ऐवढी घाई का ?
साहिल ची आई:- का म्हणजे?
साहिल:- आई मी अजून तिला माझ्या मनातले सांगितले नाही आहे तिच्या मनात ही same भावना आहेत का हे ही माहित नाही.
साहिल ची आई:- मग हे सारं कधी बोलणार तिच्याशी. जा लवकर आणि भेट तिला भेटून बोल तिच्याशी माझ्या सुनेला घेवुन ये.
साहिल:- हो आई .
साहिल:- आई thank you तु तिला स्वीकारलंस.
साहिल ची आई:- अरे thank you काय बाळा.
साहिल मधुराणी ला भेटायला तिच्या गावी जायला निघतो. लवकरच तो गावी जाऊन मधुराणी व तिच्या घरच्यांशी लग्नाबद्दल बोलणार असतो. ( लेखिका )
दिवस दुसरा.....
साहिलचा मोबाईल वर सकाळी ८:०० वाजता एक मेसेज येतो.
साहिल :- कोणी मेसेज केला असेल.
मधुराणी:- शुभ सकाळ 🌅 advocate 🤭
साहिल:- शुभ सकाळ 🌅 मधुराणी 😁
मधुराणी:- कसा आहेस.
साहिल:- बरा. तु
मधुराणी:- मी पण ठीक आहे. साहिल परवा मुलगी बघायला गेला होतास ना पसंत पडली का मुलगी तुला 😁
साहिल:- नाही.
मधुराणी:- का?
साहिल:- का म्हणजे मला नाही करायचं तिच्याशी लग्न.
मधुराणी:- बरं.
साहिल:- bye.
मधुराणी:- का रे बोलायचं नाही का माझ्याशी.
साहिल:- असं काही नाही मला खूप काम आहे केस खूप कठीण घेतली आहे मी.
मधुराणी:- बरं, bye .
साहिल मधुराणी ला काहीच सांगत नाही की तो कोकणात येणार आहे. तिच्या घरच्यांना भेटायला.
काय होईल हे पुढे पाहू. ( लेखिका )
साहिल ची आई:- साहिल कधी निघतोयस रत्नागिरीला.
साहिल:- आई उद्याच निघतोय १ महिन्याची सुट्टी टाकली आहे कोर्टात.
साहिल ची आई:- बरं केलंस.
साहिल:- ही बघ तयारी करायला घेतलीच आहे.
साहिल ची आई:- बरं चल जेवायला मग भर उरलेली bag.
साहिल:- हो आई.
साहिल व साहिल ची आई जेवन करून आपापल्या कामाला लागतात. साहिलची बॅग भरून झालेली असते. उद्या लवकर निघायचंय म्हणून तो लवकरच झोपून जातो.
सकाळ होते साहिल आवराआवर करतो.
साहिल ची आई:- साहिल झालं का रे आवरून झालं असेल तर ये नाष्टा करून घे.
साहिल:- हो आई येतो.
साहिल येतो आई त्याला नाष्टा देते तो नाष्टा करतो आणि बॅग घ्यायला रूममध्ये जातो बॅग घेऊन येतो आणि आईच्या पाया पडून निघणारच असतो तेवढ्यात साहिल ची आई त्याला थांबवते. ( लेखिका )
साहिल:- आई निघतो मी
साहिल ची आई:- थांब साहिल.
साहिल:- काय झालं आई.
साहिल ची आई:- हात ✋🏽 पुढे कर
साहिल:- का? आई
साहिल ची आई:- हत पुढे कर म्हणाले ना.
साहिल:- बरं ✋🏽
साहिल ची आई :- हे घे आणि माझी सून भेटली की तिला दे.
साहिल:- काय आहे ह्यात आई.
साहिल ची आई:- हे फक्त माझ्या सूनेसाठी आहे. ती जेव्हा भेटेल तेव्हाच हे उघड आणि मधुराणीला दे. तेव्हाच तुला सुध्दा कळेल त्यात काय आहे ते.
साहिल:- हो आई. येऊ मी आता. मी हे नक्की तुझ्या सूनेला देईन.
साहिल मधुराणी ला भेटायला खूप आतुर असतो कधी एकदा तिला भेटतोय आणि मनातील सर्व सांगतोय असं झालं होतं त्याला. या विचारात तो कोकणात आला सकाळ झाली होती. तो त्याच्या मित्राच्या घरी राहणार असतो तो मित्राच्या घरी पोहचतो.
प्रतिक हा साहिलचा college friend असतो जो कोकणातला असतो तो ही रत्नागिरीचाच असतो.
प्रतिक:- साहिल आलास तु.
साहिल:- हो कसा आहेस.
प्रतिक:- मी बरा आहे तु कसा आहेस साहिल.
साहिल:- मी बरा आहे.
प्रतिक:- ये आत ये साहिल
साहिल आत येतो. घरात सर्वांना भेटतो.
साहिल:- काका काकी नमस्कार करतो. कसे आहात तुम्ही.
प्रतिक चे आई वडील:- बाळा आम्ही बरे आहोत तु कसा आहेस किती वर्षांनी आला आहेस.
साहिल:- मी बरा आहे काका काकी. हो कामच तसं आहे की इतक्या वर्षांनी कोकणात यावे लागले.
प्रतिक:- साहिल चल तुला तुझी room दाखवतो.
साहिल:- हो चल.
प्रतिक:- साहिल ही तुझी room. आवरून घे मग बोलू आपण.
साहिल:- हो.
प्रतिक निघून जातो साहिल आवरून घेतो तो खूप दमलेला असतो रात्रभर गाडी चालवलेली असते झोप झालेली नसते त्याची म्हणून तो थोडा आराम करतो.
साहिल एक स्वप्न पाहतो.
काय असेल स्वप्न साहिलच हे पाहूयात.
दुपार होते प्रतिक साहिल ला जेवायला बोलवायला येतो तो साहिल ला उठवत असतो. साहिल एक स्वप्न पाहतो त्यात साहिल आणि मधुराणी चे लग्न झालेले असते आणि मधुराणी साहिल उठवायला आलेली असते. तो तिला जवळ ओढतो 🤗 मिठीत घेणारच असतो की तेवढ्यात..... तेवढ्यात प्रतिक ओरडतो प्रतिक:- साहिल..... काय करतोयस तु बरा आहेस ना.😂
साहिल:- प्रतिक तु..... तु काय करतोयस इथे आमच्या room मध्ये साहिल इकडे तिकडे बघतो.
प्रतिक:- आमची room ? 🤔
साहिल:- हो. तो पुर्ण Room मध्ये नजर फिरवतो म मधुराणी कुठे दिसत नव्हती.
प्रतिक:- साहिल तु कोणाला शोधतोयस.
प्रतिक:- साहिल... साहिल.... काय विचारतोय मी बोल.
साहिल:- ती.....
प्रतिक:- कोण ती ?
साहिल:- कोणी नाही ते स्वप्न होतं तर. तु का आला होतास प्रतिक.
प्रतिक:- जेवायला बोलवायला आलो होतो पण तु तर direct मला मिठी मारली.😂
साहिल:- काय 😲
प्रतिक:- हो. खरं सांग स्वप्नात नक्की कोणाला बघत होतास 🤨
साहिल:- कोणाला नाही रे , गप्प बस आता 🤫
प्रतिक:- ठिक आहे आता बसतो मी गप्प 🤐 पण नंतर मला मात्र सगळे समजलेच पाहिजे.
साहिल:- हो सांगतो नक्की.
प्रतिक:- येतोस ना जेवायला.
साहिल:- हो आलो तु हो पुढे.
जेवून होतं साहिल आणि प्रतिक बाहेर फिरायला जातात.
साहिल:- प्रतिक आपण पूर्ण रत्नागिरी फिरायला जाऊयात.
प्रतिक:- का रे?
साहिल:- असंच.
प्रतिक:- साहिल नक्की काय चालु आहे तुझं सांग मला आधी सर्व.
साहिल:- प्रतिक मी इथे मधुराणी ला भेटायला आलोय.
प्रतिक:- मधुराणी कोण मधुराणी साहिल 🤨🤔
साहिल:- प्रतिक मधुराणी माझी Instagram वरची मैत्रीण आहे हळूहळू बोलता बोलता नंबर exchange झाले, video call सुध्दा सुरू झाले. आणि मी तिच्या प्रेमात पडलो आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय. त्यासाठी मी इथे आलोय.
प्रतिक:- अच्छा, पण इथे का आलास.
साहिल:- कारण मधुराणी रत्नागिरीची आहे.
प्रतिक:- अच्छा. मला वहीणीचा फोटो तर दाखव.
साहिल:- हो नक्कीच. 😁
साहिल फोटो दाखवतो प्रतिक ला
प्रतिक:- वाह! छान आहेत की वहीणी. तुमचा जोडा ही खूप सुंदर दिसेल. अगदी लक्ष्मी नारायणा सारखा.
साहिल:- हो का. पण ती हो
बोलेल ना लग्नाला.
प्रतिक:- हो रे. चल आता आपण घरी जाऊ रात्र पण होत आली आहे. उद्या जाऊ वहीणीना भेटायला.
साहिल:- हो .
दोघंही घरी येतात जेवतात आणि झोपतात ( लेखिका )
साहिल ला मधुराणी ची आठवण येते तो तिला msg करतो.
साहिल:- मधुराणी झोपली आहेस का ग?
मधुराणी:- नाही का रे?
साहिल:- मधुराणी उद्या मला भेटायला ये ना.
मधुराणी:- कुठे? आणि कशी? 🤨🤔 तु तर ....
साहिल:- अंग मी कोकणात आलोय तु येशील ना भेटायला बोल ना मधुराणी.
मधुराणी:- तु कधी आलास पण रत्नागिरी ला आणि मला काहीच का बोलला नाहीस.
साहिल:- ते तुला suprise द्यायचं होतं गं मला म्हणून नाही सांगितलं काही तुला.
मधुराणी:- बरं.
साहिल:- बोल ना मधुराणी येशील भेटायला.
मधुराणी:- हो.
साहिल:- thank you very much 🤗
मधुराणी:- thank you का?
साहिल:- तु भेटायला तयार झालीस म्हणून.
मधुराणी:- हो का.
साहिल:- हो. पण आपण भेटणार कुठे? किती वाजता?
मधुराणी:- रत्नागिरीत मांडवी ला भेटू. दुपारी २:०० वाजता.
साहिल:- बरं चालेल. मी आता झोपतो उद्या भेटू good night dear♥️.
मधुराणी:- हा good night 🌃
झोपणार तेवढ्यात साहिल ते स्वप्न आठवतो आणि गालातच हसू लागतो आता लवकरच ते स्वप्न पूर्ण होणार म्हणून तो खूश असतो. आणि झोपून जातो उद्या ची वाट पाहत. तशी त्याला झोप येतंच नाही ( लेखिका )
सकाळ झाली. प्रतिक आणि साहिल आवरून नाश्ता करून गप्पा मारत असतात तेव्हा साहिल प्रतिक ला रात्री मधुराणी सोबत जे बोलणं झालं ते सर्व सांगतो.
प्रतिक:- तु लगेचच लग्नाबद्दल विचारू नको हा साहिल भेटल्यावर.😂
साहिल:- प्रतिक काहीही काय यार लगेच कसं बोलू.
प्रतिक:- सांगितले आधीच कारण तु तर गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहेस ना😂😂😂
साहिल:- हो का?
त्याची मस्ती मज्जा चालू असते. दुपार होते जेवून प्रतिक आणि साहिल निघतात.
ठरलेल्या वेळेत सगळे येतात साहिल आणि प्रतिक मधुराणी ला शोधू लागतात. पण मधुराणी त्यांना कुठेच दिसत नाही.
प्रतिक:- साहिल अरे कुठे आहे वहिणी. Call कर त्यांना.
साहिल:- हो करतो.
प्रतिक:- लवकर कर.
साहिल मधुराणी ला call करतो ट्रिंग ट्रिंग.........
ट्रिंग ट्रिंग........
ट्रिंग ट्रिंग....... ट्रिंग ट्रिंग........ ring तर जाते पण अजून मधुराणी ने call उचलत नाही. साहिल निराश होतो.
प्रतिक:- काय रे साहिल काय झालं?
साहिल:- ती call उचलत नाही.
प्रतिक:- अरे मग पुन्हा लावून बघ call.
साहिल:- हो बघतो.
साहिल call करणार मधुराणी ला तेवढ्यात मधुराणीच call करते साहिल ला.
मधुराणी:- sorry साहिल. मी तुझा call recieve केला नाही म्हणून sorry.....
साहिल:- it's ok. मधु कुठे आहेस तु.
मधुराणी:- मी तर इथेच आहे.
साहिल:- कुठे?
मधुराणी:- ठरलेल्या ठिकाणी.
साहिल:- अगं मी पण ठरलेल्या ठिकाणीच आहे.
मधुराणी:- बरं, मी येते तु जिथे आहेस तिथे कुठे आहेस तु .
साहिल:- इथे समुद्रकिनाऱ्याला.
मधुराणी:- बरं येते मी.
साहिल खूप खूश होतो आणि प्रतिकला सांगतो मधुराणी येतेय प्रतिक येतेय ती.
प्रतिक:- साहिल काय रे दिसते कशी तुझी मधुराणी. जरा आम्हाला ही कळू दे की .
साहिल:- ती येईल तेव्हा बघ ना प्रतिक.
प्रतिक:- ते पाहू पण तु सांग.
काय मित्रांनो तुम्हाला पण ऐकायचंय ना साहिल ची मधुराणी कशी दिसते ते. चला मग ऐकू.
साहिल:-
तिचा रंग सावळा करी घायाळ
डोळ्यात कडकत्या विजेची धार...
मुखात तिच्या मंजुळ वाणी
जणू ती मधाची थाळी...
गुलाब जणू ओठांवर हाय
हसू तिचं माझ्या काळजाचा घेतोय ठाव...
काळे घनदाट लांब केस तिचे
जणू सोन्याची हाय ती खाण...
माथ्यावर चंद्रकोर शोभते ती शिवबाची पोरं
आई एकविरेच्या भक्तीत रात्र दिवस ती लीन...
नाकातील चमकी राग आल्यावर शोभून दिसती
कानातील झुमके वाऱ्यासंग खेळती...
पायातील पैंजण रुणझुण करती
हातातील बांगड्या किनकिन करती
गळ्यात नाजूक चैन ती घालते
जणू हा सारा श्रृंगार ती फक्त माझ्यासाठीच करते...
मधुराणी वर कविता करताना साहिल स्वतः मधुराणी तिथे असावी आणि तिला बघून तिच्या सौंदर्यावर बोलतोय असंच वाटतं होतं. तो पुर्णपणे हरवला होता.
प्रतिक:- साहिल ऐ साहिल.... कुठे हरवलास .
साहिल:- दचकून... अ..... कुठे नाही.
प्रतिक:- कुठे कसे नाही तु तर मधुराणी वहिणीत पुर्णपणे हरवून गेलास. काय कविते मध्ये वर्णन केलेस त्यांचे खूपचं सुंदर.
पण वहीणी अजून आल्या का नाहीत.
साहिल:- येईल रे.
मधुराणी:- advocate 🤭 ( साहिल ला आवाज देते )
साहिल मागे वळून पाहतो आणि भानच हरपून जाते त्याचे मधुराणीने मस्त लाईट गुलाबी रंगाचा ड्रेस घालून येते. त्यावर नाजूक कानातले घातले एका हातात घड्याळ आणि एका हातात नाजूक ब्रेसलेट घालते. One side वरून घातलेली सागर वेणी आणि बाकीचे मोकळे सोडलेले तिचे लांबसडक केस कपाळी नाजूक हिऱ्याची टिकळी त्यावर कुंकु आणि ओठांवर आलेलं हसू हे सारं पुरेसे होते साहिल ला घायाळ होण्यासाठी.🤭
मधुराणी:- साहिल sorry रे उशीर झाला मला
साहिलच तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते त्याचे पूर्ण लक्ष तिच्यावर होते.
प्रतिक:- साहिल ऐ साहिल...
साहिल:- हा बोल ना
प्रतिक:- अरे कुठे लक्ष आहे तुझं
साहिल:- मधुराणीकडे असं म्हणतो आणि दचकतो म्हणजे ते मी ते तो अडकडतो.
प्रतिक:- काय 😂😂😂 साहिल विकेट गेली तुझी....
साहिल:- गप्प रे 🤫
मधुराणी गालात हसत असते साहिल ची ती अवस्था बघून 🤭🤭🤭🤭
मधुराणी:- साहिल हा कोण आहे तुझ्यासोबत तुझा मित्र की भाऊ.
साहिल:- मधुराणी ओळख करून देतो हा प्रतिक माझा मित्र.
प्रतिक:- हाय
मधुराणी:- हाय प्रतिक मी
प्रतिक:- मधुराणी गोखले माहित आहे मला.
मधुराणी:- कसं 🤔
प्रतिक:- हा साहिल यांने सांगितलेय सर्व.
मधुराणी:- अच्छा.
प्रतिक:- साहिल मी आहे गाडी जवळ ये तिकडे झालं तुझं की
साहिल:- अरे तु कुठे चालायसं थांब ना बोलूयात
मधुराणी:- हो थांब ना बोलूयात आपण सर्व मिळून.
प्रतिक:- नाही नको मधुराणी आताचा वेळ तुमचा आहे बोला तुम्ही दोघं असं बोलून प्रतिक निघून जातो.
साहिल:- मधुराणी तु खुप गोड दिसतेयस.
मधुराणी:- thank you.
साहिल:- चल फिरत फिरत गप्पा मारू.
मधुराणी:- हो.
त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा होतात आणि घरी निघतात गाडी जवळ येतात प्रतिक असतोच तिथे
साहिल:- मधुराणी तु कशी जाणार आहेस .
मधुराणी:- अरे बस ने जशी आले तशी जाणार.
साहिल:- मग तु गाडीत बस स्टॉप पर्यंत सोडतो.
मधुराणी:- अरे नको मी जाईन.
साहिल:- बस बोललो ना.
प्रतिक:- झालं का तुमचं.
मधुराणी शेवटी गाडीत बसायला तयार होते साहिल गाडी चालवतो मधुराणी त्याच्या बाजूच्या सीट वर बसते आणि प्रतिक मागे बसतो. बस स्थानक येथे गाडी तिथे थांबते तिघही उतरतात पण यायला उशीर झाल्याने बस निघून गेलेली असते.
प्रतिक:- बस तर गेली आता खूप उशिरा बस आहे.
साहिलला हे ऐकून मधुराणीची काळजी वाटते तो तिला बोलतो मी घरी येतो तुला सोडायला माझ्यामुळे तुझी बस चुकली.
मधुराणी:- अरे असं काही नाही मी जाईन जा तुम्ही.
साहिल:- नाही तु बस गाडीत तुला घरी सोडतो.
प्रतिक:- साहिल बरोबर बोलतोय मधुराणी गाडीत बस आम्ही तुला घरी सोडतो.
साहिल:- ऐक सांगतो ते गं
मधुराणी शेवटी गाडीत बसते ती रस्ता दाखवते तशी साहिल गाडी चालवतो आणि काही क्षणातच ते मधुराणीच्या गावात येतात गाडी थांबते साहिल आणि मधुराणी गाडीतून उतरतात एकमेकांना बाय करून निघतात.
साहिल आणि प्रतिक दोघंही car मध्ये बसून घरी जायला निघतात साहिल गाडीत गाणी लावतो आणि स्वतः पण गुणगुणतो तो खूप खूश असतो.
प्रतिक:- साहिल तुझं आज मन काय थाऱ्यावर नाही 😁. गाणी काय लावलीत ती गुणगुणतोयस काय. हम्म.......
साहिल:- गप्प रे काहीतरी बोलतो.
प्रतिक:- काहीतरी कुठे बोलतोय जे बघतोय तेच तर बोलतोय मी.
साहिल प्रतिकच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि गाणं गुणगुणु लागतो.
तू इस तरह से मेरी ज़िंदगी में शामिल है
जहाँ भी जाऊँ ये लगता है, तेरी महफ़िल है
तेरे बगैर जहाँ में कोई कमी सी थी
भटक रही थी जवानी अंधेरी राहों में
सुकून दिल को मिला आ के तेरी बाहों में
जहाँ भी जाऊँ ये लगता है, तेरी महफ़िल है
तू इस तरह से मेरी ज़िंदगी में शामिल है
ये आसमान ये बादल ये रास्ते ये हवा
हर एक चीज़ है अपनी जगह ठिकाने से
कई दिनों से शिकायत नहीं ज़माने से
ये ज़िंदगी है सफ़र तू सफ़र कि मंज़िल है
जहाँ भी जाऊँ ये लगता है, तेरी महफ़िल है
तू इस तरह से मेरी ज़िंदगी में शामिल है
साहिल गाण्यात इतका बुडाला होता की घर कधी आले हे त्याला कळले सुद्धा नाही. तो आज स्वतःच्या धुंदीतच होता. एकटाच हसत काय होता , गाणी काय गुणगुणत होता. तो खूप खूश होता.
रात्री उशिरापर्यंत साहिल आणि मधुराणी बोलत होते साहिल:- आज खुप छान वाटलं तुला भेटून आणि तुझ्या सोबतचा वेळ सुध्दा आवडला मला.
मधुराणी:- हो मला सुद्धा.
साहिल:- राणी आपण उद्या पण भेटू शकतो का?
मधुराणी:- उद्या का?
साहिल:- असंच.
मधुराणी:- sorry पण मी उद्या नाही येऊ शकत. चल
झोपते मी good night 🌃 sorry उद्यासाठी.
साहिल खूप निराश होतो त्याला मधुराणी पासून लांब राहायचं नसतं. तो ही आता झोपतो. हिवाळा चालू झालेला असतो. थंड वातावरणात त्याला गाढ झोप लागते आणि त्यातच त्याला पुन्हा तेच स्वप्न पडतं.
मधुराणी आणि साहिल एकत्र एका रूम मध्ये प्रेमाचे वातावरण हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ येतात. एकमेकांत गुंतून जातात. सुखाचा असा संसार चालू आहे दोघांचा मनाचा ठाव घेईल असं Background music 🎵🎶
तेरे वास्ते फलक से में चाँद लाउंगा
सोलह सत्र सितारे संग बाँध लाउंगा
चाँद तारों से कहो अभी ठहरें ज़रा
पहले इश्क लड़ा लू में बाद लाउंगा.....
सकाळ होते सुर्य उगवतो सुर्य किरणांमुळे साहिलची झोप मोडते तो जागा होतो आज पण त्याला मधुराणी ला भेटायचं असतं पण कसं याचा तो विचार करत स्वतःच आवरून घेतो आणि नाष्टा करायला जातो तिथे प्रतिक आणि त्याचे आई वडील असतात सगळे मिळून नाष्टा करतात. साहिल चा mood off आहे हे प्रतिकच्या लक्षात येते. नाष्टा झाल्यावर दोघंही अंगणात जाऊन बोलू लागतात.
प्रतिक:- साहिल काय रे काय झालं आहे.
साहिल:- काही झालं नाही आहे.
प्रतिक:- खोटं नको बोलूस खरं सांग काय झालंय.
साहिल:- अरे प्रतिक मला मधुराणीला बघायचं आहे पण ती आज भेटणार नाही.
प्रतिक:- बस इतकंच ना. अरे मग त्यात एवढं tension घ्यायची काय गरज तुला ती कुठे राहते हे माहित आहे ना आता.
साहिल:- हो पण त्याच इथे काय?🤔
प्रतिक:- अरे वेड्या मग जा तिथे तु मग होईल ना तुमची भेट आणि भेट झाली की तु तिला डोळेभरून बघ 😁
साहिल:- हो रे हे तर माझ्या लक्षातच आले नाही.
प्रतिक:- कसं येईल प्रेमात बुडाला आहेस ना 😂
साहिल:- तु आज काही म्हण पण तु खुप मोठं काम केलेस माझे thank you मित्रा.
प्रतिक:- thank you वैगेरे सोड जा तयार हो आणि मधुराणी ला भेट.
साहिल:- हो.
साहिल तयारी करतो नाही निघतो car चालू करतो थोडा वेळ झाल्यावर तो car एका ठिकाणी थांबवतो. ते एक दुकान असतं तिथून तो मधुराणीसाठी एक gift 🎁 घेतो.
काय असेल त्या gift मध्ये मधुराणी साठी समजेल समजेल मधुराणी बघेल तेव्हा आपल्यालाही समजेल.
साहिल मधुराणीच्या गावात आलेला असतो पण आता कुठे जायचे हे त्याला समजत नाही म्हणून तो तिथेच थांबातो आणि मधुराणीची वाट पाहतो.
मधुराणी तेवढ्यात तिथे येते आणि ती साहिल ची car ओळखते. साहिल तिला बघतो तो तिला भेटायला कार बाहेर येतो. पण मधुराणी त्याला भेटणं टाळते कारण तिला तिथे कोणी बघितले तर म्हणून ती घाबरून भेटायला जात नाही.
साहिल:- मधुराणी.... थांब ना........ थांब ना ....... थांब ग...... थांब
मधुराणी.... थांब ना........ थांब ना ....... थांब ग...... थांब
पण मधुराणी थांबत नाही.
साहिल आवाज देता देता पाय घसरून पडतो. मधुराणी आई ग.....
साहिल चा आवाज ऐकून मधुराणी मागे वळून पाहते तर काय साहिल पडलेला असतो. ती आता मात्र त्यांच्याकडे धावत जाते आणि त्याला उठायला मदत करते.
मधुराणी:- साहिल उठ लागलं का रे , कसा पडलास तु असे अनेक प्रश्न ती विचारत होती.
साहिल:- अग हो हो किती प्रश्न....
मधुराणी:- sorry माझ्यामुळे तु पडलास.
साहिल:- अग असं काही नाही उलट माझंच लक्ष नव्हते म्हणून मी पडलोय बाकी काही नाही.
साहिलचा पुन्हा तोल जातो आणि तो मधुराणीला मिठी मारतो ते दोघेही त्या स्पर्शाने मोहरुन जातात. बराच वेळ दोघेही एकमेकांच्या मिठीत असतात. दोघांचा स्पर्श त्यात ही थंडीची थंड हवा सोबतीला दोघंही भान विसरून जातात.
मधुराणी:- दचकून... 😳 साहिल......
साहिल भानावर येत sorry मधुराणी..... आणि तो गाडीत बसतो त्याला काही सुचत नाही.
मधुराणी ही पुरती गोंधळली होती.
साहिलच लक्ष gift वर जाते तो ते मधुराणीला देतो बाय करून लगेच निघतो.
मधुराणी साहिलच्या गाडीकडे एकटक बघत राहते. काही क्षणातच गाडी दिसेनाशी होते. ती ही घरी जाते आणि साहिलने दिलेले gift 🎁 उघडून पाहते त्यात एक सुंदर असा one piece 👗 असतो sky blue colour चा मधुराणीवर तो colour खूप छान दिसेल म्हणून त्याने तो घेतलेला असतो. मधुराणीला सुध्दा तो one piece 👗 खूप आवडतो.
आज मात्र दोघांचं काही बोलणं होतं नाही मधुराणी साहिलची खूप वाट पाहते online यायची पण तो काही येत नाही त्याला पण मधुराणीशी बोलायचं असतं पण सकाळी जे काही घडलं त्यामुळे तो बोलत नाही त्याला खूप guilty feel होतं असतं.
दोघानाही सकाळ चा प्रकार आठवतं असतो खूप वेळ दोघांनाही झोप लागतं नाही. एकमेकांच्या मिठीची, स्पर्शाची आठवण येते आणि अंगावर शहारे येता रोमांचाचे त्यात ही थंडीची थंड हवा भर घालत होती. कसे बसे दोघंही झोपता.
दुसऱ्या दिवशी साहिल पुन्हा मधुराणीला भेटायला जातो कारण त्याला काल जे काही झालं त्याबद्दल मधुराणीची माफी मागायची असते. तो तिथे जातो आणि मधुराणीला call करतो आणि यायला सांगतो मधुराणी येते तो तिच्याकडे बघत नाही ती विचारात पडते तो असं का बरं करतोय.🤔
साहिल:- sorry मधुराणी काल जे काही झालं ते मी मुद्दाम नाही गं केलं please माफ कर.
मधुराणी:- साहिल मला माहित आहे तु ते मुद्दाम नाही केलेस.
साहिल:- पण तु माफ केलेस ना मला माझ्यावर चिडली नाहीस ना तू.
मधुराणी:- मी का चिडू पण तुझ्यावर.
साहिल:- काल....
मधुराणी:- सोड तो विषय.
मधुराणीला माहित असते की साहिलने हे मुद्दाम केलेले नाही.
असाच महिना निघून जातो साहिल आणि मधुराणी एकमेकांना भेटता भेटता. आज मात्र साहिल ठरवतो की मधुराणीला लग्नाबद्दल विचारायचं आणि तिच्यावर किती प्रेम आहे हे ही सांगायचं. मधुराणी ही ह्या दिवसाची वाट पाहत होतीच.
साहिल:- मधुराणी....
मधुराणी:- बोल ना साहिल.
साहिल बोलू लागतो.
पहिल्यांदा जेव्हा पाहिलं होतं तुला
मनात vibration झालं तेव्हा...
Ringtone वाजली ह्रदयाची ,
धडधड वाढली काळजाची...
तुझा हा साधेपणा मन मोहवून गेला,
सावळा रंग तुझा वेड लावून गेला...
कळलेच नाही कधी कसे मला प्रेमात पाडून गेला....
तुझ्या रूणुझुणु पैंजणा ने घर माझे भरून जाऊ दे
तुझ्या हातावरच्या मेहंदीवर माझेच नाव उमटू दे...
तुझ्या कपाळी माझ्या नावाचं कुंकू येऊ दे
गळ्यात मंगळसूत्र माझ्या हातून घालू दे...
हातात तुझ्या हिरव्या बांगड्या घालून
नऊवारी साडीत तुला वाजत गाजत माझ्या घरी न्हेवू दे...
साताजन्मालासाठी मला तुझा होऊ दे,
शेवटच्या क्षणापर्यंत मला तुझ्यावर प्रेम करू दे...
साहिल:- मधुराणी लग्न करशील माझ्याशी....
मधुराणी हे सर्व ऐकून स्तंभ होते. तिला ही आनंद झालेला असतो.
मधुराणी:- साहिल.... ( मधुराणी लाजून 🤗) हो...
साहिल मधुराणीकडून हो ऐकल्यावर खूप खूश होतो त्याला काय करू आणि काय नको तेच कळत नाही तो मधुराणीला मिठीच मारतो आणि कपाळावर kiss 😘 करतो. मधुराणी लाजते 🤗 दोघंही घरी जातात.
साहिल आणि मधुराणी दोघेही मधुराणीच्या घरी जातात प्रेमाची कबुली घरच्यांना द्यायला ते गावात येतात मधुराणीला थोडी भीती वाटते ती भीती साहिल ला बोलून दाखवते.
मधुराणी:- साहिल मला भीती वाटतेय.
साहिल:- का आणि कसली भीती.
मधुराणी:- माझे घरचे तुला नाही बोलले तर तुझं स्थळ त्यांना आवडलं नाही तर मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय खूप प्रेम आहे रे माझं तुझ्यावर.
साहिल:- अंग वेडे असं काही नाही होणार आणि तु का घाबरते मी आहे ना मी मनवेन सर्वांना मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत माझं ही खूप प्रेम आहे तुझ्यावर. चल जे होईल ते बघू
दोघंही घरी येतात. मधुराणी घरच्यांना आवाज देते आई-बाबा, आजी या ना बाहेर सर्वांनी तुम्हाला कोण तरी भेटायला आलंय या ना. सर्वजण येतात साहिल सर्वांना नमस्कार करतो.
मधुराणीची आई:- राणी हा कोण आणि आपल्याघरी का आलाय.
मधुराणी:- आई हा....
साहिल:- मधुराणी थांब मी सांगतो. मी साहिल सांगली ला राहतो वकील आहे मी.
मधुराणीचे वडील:- बरं पण इथे आमच्याकडे काय काम?
साहिल:- मी स्पष्टच बोलतो. मी इथे तुम्हा सर्वांना भेटायला आलोय कारण माझं मधुराणीवर खूप प्रेम आहे मला लग्न करायचंय तिच्याशी आणि त्यासाठी तुमची परवानगी मागायला आलोय मी.
मधुराणीचे घरचे स्तंभ होतात काही क्षण
मधुराणीचे आई-वडील:- राणी तुला ही हा मुलगा आवडतो का?
मधुराणी:- हो. पण तुमचं मत हवंय मला आई बाबा.
मधुराणीचे आई-वडील:- हे बघ वकील तु जा इथून.
साहिल आणि मधुराणी दोघांचाही चेहरा उतरतो. साहिल निघतो आणि घरी येतो खूप विचार करतो तो तेवढ्यात त्याला त्याच्या आईचा फोन येतो.
साहिल ची आई:- साहिल बाळ काय झालं रे.
साहिल:- काय नाही आई.....
साहिल ची आई:- बाळ मी आई आहे तुझी तु नाही सांगितलंस तरी कळतं मला.
साहिल:- आई....
साहिल ची आई:- ती नाही म्हणाली का?
साहिल:- नाही गं आई ती हो म्हणाली.
साहिल ची आई:- अरे मग ही तर चांगली गोष्ट आहे ना. तिला तु मी दिलेली गोष्ट दिलीस का नाही अजून.
साहिल:- अरे हे तर माझ्या लक्षातच नव्हतं.
साहिल:- हो आई....
साहिल आईशी खोटं बोलतो कारण त्यांने जर सांगितले नाही दिले तर आईला वाईट वाटले असते.
इकडे साहिल ची आई रत्नागिरी ला येणार असते मुलाला आणि सुनेला भेटायला.
मधुराणीच्या घरी आई आणि वडील विचार करत असतात त्यांना मुलीचा आनंद ही महत्त्वाचा असतो पण ते त्या मुलाला ओळखत नसतात त्यात तो इतका लांब राहतो. मधुराणी चे वडील त्याच्या मित्रांशी याबद्दल बोलतात मधुराणीच्या वडिलांचे मित्र मधुराणीला मुलगी सारखंच लाड करतात त्यामुळे ते ही त्या मुलाचा biodata काढायला सुरुवात करतात. त्यांच्यापैकी एकाचा मित्र असतो सध्या सांगली मध्ये हे सर्व ठरवतात आपण तिथे जाऊन काय ते ठरवू. सर्व निघतात सांगली ला जायला.
सांगलीत येऊन साहिल ची सर्व माहिती काढतात त्यांना त्या मुळे तो पसंत पडतो.
गावी येऊन ते साहिल आणि मधुराणीच्या लग्नाला संमती देतात. साहिल आणि मधुराणी दोघेही खूप खुश होतात.