Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Aashish Deshpande

Romance


2.5  

Aashish Deshpande

Romance


तु आणि मी

तु आणि मी

2 mins 2.0K 2 mins 2.0K

तु आणि मी..एकमेकांपासून वेगऴे..एकमेकांपासून भिन्न..पण तरीही सोबत,एकत्र..जणू दोन टोकं जी मिळून वर्तुऴ पुर्ण करतात..आपल्यात फरक कितीतरी ..अन् थोडसं साम्यही..तु हसरी..मी शांत..तुझ्या ओठांवर फुलतं हसु..माझ्या चेहेरयावर शांत स्मित..तुझे भावूक निरागस डोळे आणि लाजून झुकलेली नजर ..माझी मात्र नजर तीक्ष्ण, थेट ह्दयाचा वेध घेणारी..तुझे लांबसडक रेशमी केस..माझ्या नुसत्याच सागरांच्या लाटा..मी गोरा..तु निमगोरी..तुझी अखंड लाडीक बडबड,कधी हसणं कधी रूसणं..माझ्या ओठांना शब्दांचा वाणवा,माझी सारी भाषाच सांकेतिक, माझं बोलणं कधी नजरेतून तर कधी स्पर्शातून..तुझी देवावरची श्रद्धा अपार..माझ्यासाठी तुझी व्रत आणि उपवास..माझ्यासाठी माझं मनच मंदिर,जिथे तुझी अखंड पुजा..तुला दागिन्यांची भारी आवड..मला वाचनाच प्रचंड वेड..तु थोडीशी भित्री...मी धीट..तुला कोणाला काय वाटेल याची सतत चिंता..मी समाजाच्या बाबतीत मुळातच विद्रोही..तुझी सुंदर लाजाळूची काया..अन् माझ्या मात्र हातांमध्ये वीज..तुझा माझ्यावर विश्वास अतुट..माझं तुझ्यावरच प्रेम अथांग..तुला सण समारंभाची आवड..माझ्यासाठी तुझी सोबत म्हणजेच दिवाळी..इतका फरक तरी साम्यही काही..आपल्या दोघांनाही आवडत संगीत ऐकत ऐकमेकांच्या बाहूपाशात विसावणं..पावसात ऐकमेकांचा हात हातात घेऊन हुंदडणं..ऐकमेकांपाशी मन मोकळं करणं..सोबत मिळून चांदण्या आकाशाकडे पाहत "आपल्या" घर संसाराची स्वप्न रचणं..ऐकमेकांच्या खांद्यावर मान ठेऊन संध्याकाळचा सुर्यास्त पाहणं..जिथ आपलं प्रेम फुललं त्या जागा,त्या आठवणी जपणं..बाईकवर मनसोक्त डबलसीट फिरणं..ऐकमेकांचे श्वास अनुभवणं..ऐकमेकांपेक्षा, आपल्या प्रेमापेक्षा कशालाच महत्व न देणं..आपलं घर मिळून सजवणं..प्रेमाच्या वाटेवर हातात हात घेऊन दूरवर चालणं...पण आपल्या दोघात सगळ्यात मोठं साम्य कोणतं आहे..माहित आहे?..हेच की, आपण दोघही मानतो की इतका फरक असतानासुद्धा आपण दोघं फक्त ऐकमेकांसाठीच बनलेलो आहोत..परस्परांना पूरक आहोत..तु अधुरी आहेस माझ्याविना..आणि मी एकटा आहे तुझ्याविना..ऐकमेकांच्या सोबतीशिवाय आपली दुनिया पुर्णच होऊ शकत नाही...आणि आपलं घरटं सुद्धा...हो ना?


Rate this content
Log in

More marathi story from Aashish Deshpande

Similar marathi story from Romance