Vishal Patil

Romance

4.2  

Vishal Patil

Romance

ती सध्या काय करते

ती सध्या काय करते

6 mins
818


ही कथा मी इयत्ता ६ वी मध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्या प्रेमाची जाणीव आणि अनुभव म्हणून व्यक्त केली आहे. माझ्या जीवनामध्ये प्रेम हे फक्त ऐकण्यापुरत मर्यादित होतं परंतु खरा अनुभव मला इयत्ता ६ वी मध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी आला. त्या शाळेमध्ये तसा मी नवीन नव्हतो परंतु त्या वर्षी काही नवीन विद्यार्थ्यांनी देखील प्रवेश घेतला होता. इयत्ता ६ वी चा पहिला दिवस सर्व जुने मित्र आणि नवीन चेहरे पाहायला मिळाले वर्गामध्ये शिक्षकांनी हजेरी घेण्यास सुरुवात केली. तेवढ्यात आत येऊ सर असा आवाज कानी पडला पाहिलं तर दोन विद्यार्थिनी कोमल आणि रूपाली कदाचित त्या दोघी एकमेकांच्या ओळखीच्या असाव्यात आणि त्या मुंबईमध्ये नवीनच असाव्यात . तेवढ्यात एक मधुर स्वर कानी पडला सर इयत्ता ६ वी चा वर्ग हाच आहे ना , ती म्हणजे रूपाली तीला पाहता क्षणी माझ्या मनात व पूर्ण वर्गात शांतता पसरली होती .सरांची परवानगी घेऊन त्या दोघींनी वर्गात प्रवेश केला .रूपाली ने इयत्ता ५ वी पर्यंत शिक्षण गावी पूर्ण केलं होत व मुंबई मध्ये असणाऱ्या विद्यालयामध्ये तिने नवीन प्रवेश केला होता. तो पूर्ण दिवस माझा तिच्याकडे चोरून बघण्यातच गेला व दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी कोमल आणि रूपाली ह्यां दोघींना उभं केलं आणि विचारलं तुमच्या दोघींमधून कोणाचा शाळा सोडल्याचा दाखला अजून आपल्या शाळेत जमा केला नाही ,हे ऐकताच मी मनामध्ये रूपाली चा दाखला जमा व्हावा ही इचछा मनामध्येच व्यक्त करत होतो आणि तेच घडलं कोमल च्या पालकांनी तिचा दाखला हा शाळेत जमा केला नव्हता त्यामुळे कदाचित ती पुन्हा गावी गेली असावी रूपाली मनमोकळ्या स्वभावाची असल्यामुळे ती प्रत्येकाशी बोलू लागली , ती अभ्यासात फार हुशार होती आणि मस्ती आणि टिंगल टवाळी करण्यामध्ये मी हुशार होतो म्हणजे अभ्यासात देखील बऱ्यापैकी हुशार होतो .

माझ्या मनामध्ये प्रत्येकक्षणी वाटायचं की जाऊन बोलावं तिच्याशी पण त्यावेळी मुलींशी मी कमीच बोलायचो मग कोणत्या कारणावरून तिच्याशी बोलायचं हा प्रश्न माझ्या मनात पडला होता . तोच विचार करत करत मी पाणी पिण्याच्या ठिकाणी चाललो होता तेवढ्यात खूप विचित्र प्रकार घडला तिची दरवाज्याबाहेर येण्याची वेळ आणि माझी आतमध्ये जाण्याची वेळ जणू निश्चित ठरली होती ती थोड्या घाईत होती आणि अचानक तिला माझा धक्का लागला ती जेवणाचा डब्बा स्वछ धुवुन वर्गात निघाली होती त्याचक्षणी माझा जोरात धक्का लागल्यामुळे तिचा डब्बा जोरात खाली पडला आणि जोरात आवाज झाला मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. मी डब्बा उचलून देण्याअगोदरच तिने डब्बा उचलला आणि नॉनसेन्स असा शब्द उच्चारत ती तिथून निघून गेली आणि मी देखील काहीवेळाने वर्गात गेलो .बेंचवर बसून मी मागे तिच्याकडे वळून पाहिलं तर ती रागाने माझ्याकडेच पाहत होती .मनातल्या मनात मी स्वतः वर चिडलो आणि त्यानंतर मनात असं वाटलं की संपलं सगळं मैत्री होण्यापूर्वी तिच्या मनात माझ्याविषयी तिरस्काराची भावना निर्माण झाली अशी सारखी शंका मला वाटत होती . पण तसं काहीच घडलं नाही दुसऱ्या दिवशी देखील मी चोरुन तिच्याकडे मागे पाहत होतो त्याक्षणी कदाचित ही गोष्ट तिच्या लक्षात आली असावी पहिल्यांदा तिने माझ्या मित्राला शु शु अशाप्रकारे खुणवत विचारलं तुझ्या बाजूला जो बसलाय त्याच नाव काय? त्याने माझं नाव सांगितलं विशाल , नंतर तिने मला हाक मारली त्यावेळी मला थोडी भीतीच वाटली होती पण तिने मधुर आवाजात मला पहिल्यांदा एक प्रश्न विचारला तू सारखं सारखं मागे वळून का पाहतोस त्या क्षणी मी तिला काही नाही अश्या साध्या शब्दात उत्तर देऊन मोकळा झालो. तिच्या बोलण्यावरून मनामध्ये अस वाटू लागलं की काल चुकून धक्का लागलेली घटना ती पूर्णतः विसरून गेली असावी ,

त्यानंतर आमची चांगल्या प्रकारे मैत्री झाली होती.

सहावी चं वर्ष कधी उलटून गेलं ह्याचा काही पत्ताच लागला नाही आमच्या विद्यालयामध्ये सातवी पर्यंत शिक्षण होत , पाहता पाहता सातवी च शिक्षण पूर्ण झालं शेवटचं वर्ष म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी निर्णय घेऊन निरोप समारंभ ह्या कार्यक्रमाची तैयारी सुरू केली . त्या कार्यक्रमाला जाण्याचा दिवस उजाडला आणि मी नवीन कपडे घालून तैयार झालो आणि मी वैभव च्या घरी निघालो वैभव हा माझा खास मित्र होता, आणि त्याच्याशेजारी रूपाली च घर होत . पोहोचता क्षणी मी रूपाली ला पाहिलं , त्यादिवशी तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती आणि केसामध्ये गजरा डोळ्यांच्या भोवती असणारे काजळ मी नजर चुकवण्याचा भरपूर प्रयत्न करत होतो , परंतु माझी नजर ही सारखी तिच्याकडे वळत होती हा अनुभव आणि तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही , वैभव ची तैयारी झाली आणि आम्ही निघालो . शाळेत पोहोचलो जवळ जवळ सर्वच मित्रांना ही गोष्ट माहिती होती की मी तिच्यावर प्रेम करतो , तितक्यात मुलांनी गाणी वाजवायला सुरुवात केली सर्व मुले बेभान होऊन नाचू लागली काही मित्र मुद्दाम तिला माझ्या नावाने हाक मारू लागले पण माझं नशीब ,तिच्यापर्यंत हा विषय पोहोचला नाही . तेवढ्यात सर्व शिक्षक वर्गात हजर झाले, सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा अनुभव मांडला व शिक्षकांनी देखील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, तेवढ्यात काही मित्र त्यांची कला सादर करू लागले , तेवढ्यात शिक्षकांना कोणीतरी सांगितलं रूपाली ही बघतोय रिक्षावाला ह्या गाण्यावर डान्स करणार आहे , खूप चांगल्या प्रकारे तिने डान्स देखील केला , सर्व मित्र माझ्या नावाने जेव्हा तिला हाक मारू लागले , तो कधीच न विसारण्याजोगा क्षण होता.

परीक्षा झाल्या सातवी च शिक्षण पूर्ण झालं ती तिच्या गावी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गेली मी देखील माझ्या गावी गेलो. एक गोष्ट मी ठरवली होती कोणत्याही परिस्थिती मध्ये इयत्ता आठवी साठी ती ज्या शाळेमध्ये प्रवेश घेईल त्याच शाळेमध्ये मी प्रवेश घेईन , माझ्याकडे त्यावेळी प्रशांत चा फोन नंबर होता प्रशांत हा माझा मित्र त्याच आणि माझं कधी पटलं नव्हतं आणि पटणार ही नव्हतं पण मला ती कोणत्या शाळेत प्रवेश घेणार आहे हे जाणून घेणं खूप महत्वाच वाटत होतं ते विचारण्यासाठी मी त्याला फोन करण्याचं ठरवलं , त्या कारणावरून मी खूप निराश होतो , शेवटी प्रवेश प्रक्रिया चालू झाली , आणि मी प्रशांत ला फोन केला त्याला जणू माहिती असावं मी कशासाठी फोन केला आहे त्याने समोरून मला सांगितलं की रूपाली ने कुमुद शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे . ही गोष्ट ऐकताच मी माझ्या वडिलांना कुमुद शाळेमध्ये आठवी साठी नाव नोंदवा असं सांगितलं.उन्हाळ्याची सुट्टी संपली शाळा सुरू झाल्या शाळेचा युनिफॉर्म देखील आधीच वडिलांनी शिवून ठेवला होता . शाळेचा पहिला दिवस उजाडला सकाळी शाळेमध्ये उशिरा जाणारा मी त्यादिवशी पहाटे पाच वाजता उठून सर्व तैयारी करून ठेवली होती, शाळेत पोहोचलो पहिल्या दिवशी मी अगदी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने देखील इतकी तैयारी केली नसावी कदाचित अशाप्रकारे मी त्यावेळी तैयारी केली होती शाळेचे गेट उघडण्याअगोदर अर्धा तास लवकर गेलो होतो , मित्रांची भेट झाली प्रशांत देखील भेटला त्याच्याशी बोललो , त्याचे आभार देखील मानले , गेट उघडल्या बरोबर वर्ग शोधायला मुलांनी धावपळ सुरू केली वर्ग सापडला चेतन च्या शेजारी बसलो चेतन हा माझा शाळेतीलच मित्र होता खूप शोधलं परंतु रूपाली काही दिसेना , सहज चेतन ला विचारलं रूपाली नाही आली का रे आज , त्याने हसत हसत उत्तर दिलं रूपाली, मी म्हटलं हो अरे रूपाली आज आली नाही का त्याने सांगितलं ती आपल्या शाळेत कुठे आहे ती तर नूतन विद्यामंदिर मध्ये आहे..हे वाक्य ऎकताच मी शांत झालो. शिक्षकांच्या शिकवणीला सुरुवात झाली माझे काही लक्ष लागेना , मधल्या सुट्टीमध्ये प्रशांत ला पाहिलं आणि त्याला जाऊन भेटलो त्याला मी विचारलं खोटं का बोललास माझ्याशी त्याने हसत हसत माझी खिल्ली उडवली , मी भयंकर रागात होतो , पण त्याच्याशी एकही शब्द न बोलता मी वर्गात निघून गेलो , मनातल्या मनात विचार करू लागलो हे अस का घडलं , अभ्यासात मन लागत नव्हत , मी पूर्ण बदललो होतो , मी मित्रांशी ही बोलणं कमी केलं होतं , एकटा राहत होतो , चेतन ला कळली होती माझ्या मनाची स्थिती ,त्याने मला कधीही एकटं सोडलं नव्हतं , काही दिवसांनी एकटं राहायला शिकलो होतो , आठवी , नववी ,दहावी हे शिक्षण मी त्याच शाळेमध्ये पूर्ण केलं , त्यानंतर काही दिवसांनी चेतन ने सांगितलं ती पनवेल ला राहायला गेली , त्या क्षणी देखील मी तिला विसरलो नव्हतो , आणि आज ही


वाटेवर उभा राहून

वाट तुझी पाहिली,

तू गेलीस दूर

पण तुझी आठवण जवळच राहिली.


  • समाप्त



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance