तिच्यात भेटलेला माझा पाउस
तिच्यात भेटलेला माझा पाउस
तो आला तालेवारासारखा...रुबाबात... ऐटीत...गजबजत...
ट्रेनच्या खिडकीतून का होईना...घेऊया त्याला अंगावर...
अहो... अहो... काका खिडकी बंद का करताय...?
पहिला पाऊस अन खिडकी बंद...
“ ए शहाण्या... तुला एवढी हौस आहे तर तूच येऊन बस ना इथे...
शहाणा मला शिकवतोय...”
तर कुण्या एकीने दरवाजाच मोकळा केला... पावसासाठी...
अन घेतला तळहातावर...अंगावर...चिंब चिंब पाउस...
एक हाती पाउस अन एक हाती तो...
आता खरं जुळलंय समीकरण पावसाचं...
ती...पाऊस... आणि...तो...
पहिला पाउस आला न की एकच करायचं...
मनसोक्त त्याला पाहून घ्यायाच...
हळुवार त्याच्या मिठीत जायचं...
नकळत त्याच्या स्वाधीन व्हायच...
भोवतालाच सार काही विसरायचं...
अगदी खूप खूप दिवसांनी भेटलेल्या जिवलगासारखं...

