तिची आठवण अन हिची सोबत...
तिची आठवण अन हिची सोबत...
तिच्या आठवणीत तळमळत असताना हिचा हात हातात घेऊन बराच वेळ दोघे ही चालत राहिलो.
अचानक हिने तिचा दुसरा हात माझ्या हातावर ठेवला.
चालणं थांबलं..हीचं घर आलं होतं,बाजूलाच असलेल्या बाकावर बसलो.ही घट्ट बिलगली...आणि हीचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं.थोडंस रडत रडतच बोलली..
"ऋषी,तुला नाही का रे होणार प्रेम माझ्यावर?कधीच?"
काहीसा हळवा होत मी उत्तरलो...
"प्रेम तर आहे ग आताही,पण तिच्यावर जितकं तीव्र झालंय तितकं नाही. कदाचित ती जाईल ही कधीतरी न सांगता निघून कायमची. आयुष्यात,तशी ही ती कुठे सोबत असते?"
काहीशी हिरमुसत हीने डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं..
"I Love You परिंदे" म्हणत तशीच शांत काही क्षण घट्टपणे बिलगत एक जादू की झप्पी दिली.
"Love you too dear" म्हणत हिच्
या गालावर ओठ टेकवताक्षणीचं मनातला स्वाभिमान जागृत झाला आणि बोललो....
"तू ही जाशीलच कायमच एक ना एक दिवस सोडून तिच्यासारखच..तुम्ही मुली स्वतःला काय समजतात?चारित्र्य,शील,अश्लीलतेच्या,संस्कृतीच्या गप्पा करतात आणि एकीकडे शारीरिक सहवासासाठी तळमळतात.भलेही मी कसाही असेल...पण मनातलं स्पष्ट संपूर्ण सत्य बोलण्याची हिम्मत ठेवतो.तुम्हाला हे जमेल का?"
"झालास का तू परत सूरु?सोड न जाऊ दे.."
म्हणत हीने जोरात मिठी मारली.
हिच्या मानेवर हलकासा किस करत हळुवार आवाजातच 'Bye' म्हटलो.
"जय माणूस मित्रा" अस म्हणत मिठीतुन बाहेर पडत निघून जाणारी ही इतकी गोड हसली की पांढऱ्याशुभ्र चेहऱ्यावर 'यामी गौतम' सारखी पडणारी खळ पाहत हिच्या डोळ्यातल्या मादकतेने घायाळ झालेला मी हिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो.....
'तिच्या' आठवणीत....परतताना...!!