सुखाची व्याख्या
सुखाची व्याख्या
एक चर्चा चालू होती बोलता बोलता सहज विषय निघाला, त्याला अमुक कंपनीत खूप मोठ्ठा जॉब लागला, खूप मेहनत घेऊन तो इथं पर्यंत पोहोचला. दुसरा म्हणला काय सुंदर बंगला बांधला त्याने, फर्निचर सर्व सुखसोयी काहीच कमी नाही. एक म्हणाला माझे सारखे टूर असतात विदेशात मला अजिबात वेळच नसतो. कामाच्या व्यापामुळे फॅमिली साठी सुद्धा वेळ काढणं मुश्किल होत आहे. माणसं तर माणसं आता बायकांही तसंच वेळच नाही मिळत ग काय करणार सतत ची सगळ्यांची तक्रार. इतकं काय मिळवायचं आहे माणसाला?? का इतका आटापिटा??
भौतिक सुखाच्या हव्यासा पोटी आज माणूस मशीन सारखा होत आहे, सगळं सगळं अगदी आलिशान, मुबलक रहावं असं च लाईफ चांगलं असतं असाच समझ आता समाजात रूढ होत आहे. पालकांना वेळ नाही म्हणून मुलांना ही या दिनचर्येंत जोडून टाकलं आहे. मुलांना बिचाऱ्यांना बालपण काय असतं??? सर्वात मस्त आयुष्य बालपण हे आपण तरी म्हणायचो त्यांना तर ते ही म्हणता येणार नाही किंबहुना त्यांना माहीतच नाही. या धावपळीच्या जीवन शैलीची इतकी जास्त सवय झाली की आता चुकून थोडा रिकामा वेळ मिळाला तर काय करू असं होत मुलांना आणि मोठ्यांना ही. मेंदूला सतत bzy राहण्याची सवय, सतत काहीतरी टार्गेट. किती अवघड अवस्था आहे ही. त्यामुळे माणसाला सतत तणावाखालीच राहण्याची सवय लागली आहे. आधी जशी चर्चा झाली की मोठ्ठ घर, गाडी नोकरी हेच सुख आहे का???? सुखाची व्याख्या नक्की काय आहे??? यावर तरी नवीन पिढी विचार करत आहे का???? समाधान, प्रेम, माया, यांचा विचार त्यांच्या मनात कधीतरी येत आहे का??? सतत ची धावपळ यामुळे नातेसंबंध, आरोग्य स्वतः चा क्वालिटी टाईम या गोष्टी कुठं तरी हरवून जात आहेत. त्यांचे दुष्परिणाम ही आता समाजात दिसू लागले आहेत.नातेसंबंध पक्के राहिले नाहीत त्यामुळे अस्थिरता, गरजे पेक्षा जास्त बर्डन, आणि हव्यास यामुळे मानवी जीवन पार होरपळून निघत आहे. या सगळ्या गोष्टी एकमेकांना जोडलेल्या आहेत ह्याचा विचार च कोणी करत नाही. इतका सुंदर मनुष्य जन्म लोकांना का नको वाटत आहे?? कितीतरी चांगल्या गोष्टी करून दुसऱ्यांना सुखावणारा मनुष्य प्राणी आज नैराश्याचा शिकार होत आहे?? कुठं तरी नक्कीच चुकत आहे, विचार करण्याचा विषय आहे. आधी एक दोन घटनांनी सुरवात होऊन हा आकडा आता दिवसेंदिवस वाढतच आहे. यशाची व्याख्या ठरवायलाच हवी. जे यश, अनिद्रा, नैराश्या कडे जीवनाला नेत आहे असं यश माणसाला सुखी कसं काय करू शकतं. भौतिक सुखच्या विरोधात नाहीये मी, पन कुठं तरी लिमिट असायलाच हवी, मरेपर्यंत धावणारा मनुष्य आनंदाची चव कधी चाखणार??? बघा विचार करा, आपणच यावर काहीतरी उपाय काढायला हवा नाहीतर, अख्ख मनुष्य जीवन या मध्ये लुप्त व्हायला वेळ लागणार नाही.
