कुंडीतील गुलाब
कुंडीतील गुलाब
1 min
191
एक खूपच नाजूक रोपटे गुलाबाचे,
हिरवळ प्रेमळ रंगाचे,
इवली इवली पाने तयास, मस्त धुंद वाढण्याच्या ध्यास,
ऊन पाऊस वारा मस्त करी त्याला,
वाढला पुष्कळ फांदया मोहरल्या कळ्यांनी,
एक कळी सुंदर फार,
फुलण्याची जिद्द तिला,
वाऱ्याने हेलावले,
उन्हाने तापवले, तरी जोमाने पाकळ्या फुलल्या कोमल,
टपोरा गुलाब थाटात उभा फांदीवर,
आयुष्याचे गुपित सांगून गेला, जगण्याचे मोल शिकवून गेला,
आले किती जरी अडथळे, थांब मी उभा आहे, थांब मी उभा आहे.
